Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘शरद राव यांचे निर्णय अनधिकृत’

$
0
0
‘ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती’चे कार्याध्यक्ष शरद राव यांनी पुण्यातील बैठकीत घेतलेले निर्णय अनधिकृत असल्याची टीका समितीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केली.

‘पाण्यावर चालवली तरी पीएमपी तोट्यातच‘

$
0
0
पीएमपीची बस रस्त्यामध्ये बंद पडणे ही लाजिरवाणे असल्याचे आपण अधिकाऱ्यांना सांगतो...तोट्यात चालणाऱ्या लांब पल्यांच्या बसेसमध्ये डिझेल ऐवजी पाणी भरले, तरी त्याचा खर्च भरून निघणारा नाही.

महिला आरोग्यासाठी ‘एबीसीडी’

$
0
0
‘देशभरातील महिलांच्या आरोग्यासाठी अॅनिमिया, कॅन्सर, डायबेटिस या रोगांबरोबरच गर्भनिरोधकांबाबत जनजागृती आवश्यक आहे.

नर्सेसनाही हवाय ‘वेल्फेअर बोर्ड’

$
0
0
रुग्णसेवेचा वसा घेत ‘नोबल प्रोफेशन’ची ड्युटी सांभाळणाऱ्या नर्सेसना किमान हक्क, सेवा-सुविधा मिळवून देण्यासाठी सैनिक कल्याण मंडळाच्या धर्तीवर ‘नर्सेस वेल्फेअर बोर्ड’ स्थापन करण्याची जोरदार मागणी रविवारी करण्यात आली.

बोगस फेसबुक अकाउंटद्वारे तरुणीला धमकाविणारा गजाआड

$
0
0
स्थानिक न्यूज चॅनेलमध्ये नोकरी करणाऱ्याने आपल्या ओळखीच्या तरुणीचे बोगस फेसबुक अकाउंट उघडून तिला धमकी दिल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी तरुणाला अटक केली.

प्राध्यापकांच्या संपाबाबत संस्थाचालकांची मध्यस्थी

$
0
0
प्राध्यापकांच्या बहिष्कारावर तोडगा काढण्यासाठी आता ‘राज्य शिक्षणसंस्था महामंडळ’ पुढाकार घेणार आहे. महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेण्याचे आश्वासन ‘प्राध्यापक महासंघा’ला (एमफुक्टो) दिल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पाटील यांनी दिली.

आळंदीतील पुलाचे काम धोकादायक

$
0
0
आळंदी देवाची ‌येथे नव्याने उभारण्यात येत‌असलेल्या पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. ही गोष्ट वारंवार संबंधित ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली असतानाही संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख उमेश चांदगुडे यांनी केला.

विद्यापीठाकडून पोलिसच आरोपीच्या पिंजऱ्यात

$
0
0
परीक्षा विभागातील गैरप्रकारांना पुणे विद्यापीठातील पोखरलेली व्यवस्थाच जबाबदार असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले असताना, विद्यापीठाने मात्र पोलिसांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांचे जोखड उतरेल?

$
0
0
शिक्षकांना अशैक्षणिक कामांपासून मुक्त करण्याच्या शासनाच्या निर्णयाचे शिक्षक संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे. मात्र, त्याचवेळी शासनाचा हा निर्णय म्हणजे सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी केलेला उद्योग तर नाही, ना असा प्रश्नही या संघटनांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

कठीण प्रश्नांनी ‘नीट’ बोल्ड

$
0
0
मेडिकल अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रथमच घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’ अर्थात ‘नीट’ने विद्यार्थ्यांची रविवारी विकेट घेतली. साहजिकच प्रवेशासाठीचा ‘कट ऑफ’ ५० टक्क्यांपेक्षाही खाली घसरेल, अशी शक्यता आहे.

‘व्हॅट’ची खोटी वजावट घेतल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

$
0
0
प्रत्यक्ष मालाची खरेदी न करता खोटी बिले सादर करून मूल्यवर्धित कराची (व्हॅट) खोटी वजावट घेतल्याप्रकरणी तीन व्यापाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये राज्य सरकारची पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

बोगस पोलिस गजाआड

$
0
0
एरंडवणा येथील उदय सोसायटीच्या परिसरात पोलिस असल्याचे भासवून पैसे उकाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या बोगस पोलिसाला स्थानिकांनी पाठलाग करत पकडले आणि पोलिसांकडे दिले.

धन्य भाग सेवा का अवसर पाया...

$
0
0
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी केवळ सांगीतिक कार्यक्रमाला हजेरी लावण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांच्या वेदना समजून घेत त्यासाठी देणगी देऊन, ‘धन्य भाग सेवा का अवसर पाया’ अशी संवेदना दिग्गज कलावंतांनी रविवारी व्यक्त केली.

दुहेरी खून प्रकरणातील तिसरा आरोपी गजाआड

$
0
0
कोरेगाव पार्क येथील वृध्द नाग‌रिक आणि त्यांच्या सेक्रटरीच्या खून प्रकरणातील फरार आरोपीला रविवारी मुंबईत अटक करण्यात आली. पुणे आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एकत्र कारवाई करत त्याला गजाआड केले.

‘एलबीटी’साठी उरले पंधरा दिवस

$
0
0
स्थानिक स्वराज्य संस्था कराचा (एलबीटी)पहिल्या महिन्याचा भरणा करण्यासाठी आता फक्त पंधरा दिवसांचा अवधी शिल्लक आहे. येत्या २० मेपर्यंत ‘एलबीटी’ची नोंदणी आणि कराचा भरणा न करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

दुचाकी ‘पे अँड पार्क’चा नव्याने प्रस्ताव

$
0
0
लक्ष्मी रोड, टिळक रोड, जंगली महाराज रोड आणि बाजीराव रोडसह शहरातील पंधरा प्रमुख रस्त्यांवर चारचाकी वाहनांसह दुचाकींसाठीही ‘पे अँड पार्क’ योजना लागू करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सादर केला आहे.

दूध महागणार

$
0
0
राज्यात निर्माण झालेली दुष्काळी स्थिती आणि चारा टंचाईचा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दूध खरेदी दरात ३ आणि म्हशीच्या दूधात ५ रुपये दरवाढ द्यावी, असा ठराव महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ कृती समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला.

नगर जिल्ह्यात शिजला पुणे बॉम्बस्फोटाचा कट

$
0
0
पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील साखळी स्फोटांसाठी बॉम्बची जुळणी ‘इंडिजन मुजाहिदीन’ (आयएम) या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी असदुल्लाह अख्तर ऊर्फ हड्डी आणि वकास ऊर्फ अहमद यांनी नगर जिल्ह्यातील लोणी परिसरात केल्याची धक्कादायक माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात पुढे आली आहे.

स्वस्तातली कुल्फी आरोग्याला घातक

$
0
0
वाढत्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना थंडावा देणारे कुल्फीसारखे पदार्थ बनविताना आरोग्याचे निकष धाब्यावर बसविण्यात येत आहेत. परिणामी, उन्हापेक्षाही साथीच्या रोगाचे चटके बसण्याची भीती आहे. तरीही, अन्न व औषध प्रशासनाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे.

एलबीटी रद्दबाबत ‘फॅम’ आशावादीच

$
0
0
स्थानिक संस्था कराला (एलबीटी) पर्यायी नवीन स्थानिक कररचना पद्धत सुचविण्यासाठी शासन आणि फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (फॅम) तज्ज्ञांची मसुदा समिती स्थापन केल्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्याचा दावा करीत संघटनेने एलबीटी रद्द होण्याबाबत अजूनही आशावादी असल्याचे म्हटले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>