Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

जलसंवर्धनाची अंमलबजावणी नाही

$
0
0
‘महाराष्ट्राने नेहमीच जलसंवर्धनाचे उत्तम तंत्रज्ञान विकसित केले आहे, पण अंमलबजावणी मात्र झाली नाही. याच तंत्रज्ञानाचा वापर गुजरात राज्याने केला असून आज तेथील खेडी हिरवीगार झाली आहेत.

पिंपरीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक

$
0
0
पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत मुंबईत सोमवारी (सहा मे) झालेल्या बैठकीत चर्चेचे गुऱ्हाळ सुमारे तीन तास चालले. मात्र, त्यात कोणताही ठोस निर्णय झाला नाही.

‘फार्मसिस्ट’ असेल तर दुकान सुरू ठेवा

$
0
0
‘दुकानांमध्ये फार्मसिस्ट असावा ही कायद्यातील तरतूद असून त्याचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे यापुढे फार्मसिस्ट असेल तरच दुकाने सुरू ठेवावी; अन्यथा ती त्यांना बंद करावी लागतील,’ अशी भूमिका राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) राज्यमंत्री सतेज पाटील यांनी मांडली.

‘फार्मसिस्ट सक्ती’च्या ९१ प्रकरणाची आज सुनावणी

$
0
0
फार्मसिस्टची सक्ती केल्याने औषध दुकानांमध्ये केलेल्या तपासण्यांमध्ये कारवाई करण्यात आलेल्या पुणे विभागातील ९१ प्रकरणांची सुनावणी उद्या, (मंगळवारी) पुण्यात होणार आहे.

विनापरवाना ८६ हजारांचा आयुर्वेदिक औषध साठा जप्त

$
0
0
येरवडा येथील एका शॉपिंग फेस्टिव्हलमधील स्टॉलमध्ये आयुर्वेदिक औषधांसह सौंदर्यप्रसाधनाची विनापरवाना विक्री केल्याप्रकरणी सौंदर्यप्रसाधनांसह कच्च्या मालाचा सुमारे ८६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्याची कारवाई अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केली.

शाळा प्रवेशाचा ‘झेडपी’त राडा

$
0
0
‘आता कुठेही प्रवेश मिळणार नाही. आमच्या मुलांचे नुकसान करून नका,’ अशी मागणी करत कॅम्पमधील बिशप्स स्कूलमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी सोमवारी जिल्हा परिषद गाठली.

पालिकेच्या नोंदींचा अजब कारभार

$
0
0
महापालिकेच्या नगरसचिव विभागातील अनेक कर्मचाऱ्यांच्या पगार, पेन्शन आणि पदोन्नतीच्या नोंदींमधील गोंधळ नुकताच समोर आला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत यामध्ये जोरदार चर्चा झाल्यानंतर याप्रकरणी खातेनिहाय चौकशीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.

महापालिका इमारतीत रेनवॉटर हार्वेस्टिंग

$
0
0
करसवलत आणि अन्य विविध योजनांद्वारे नागरिकांना सवलत देणाऱ्या महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प मार्गी लागणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महापालिकेतून एकूण २१ लाख लिटर पाणी उपलब्ध होणार आहे.

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग

$
0
0
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार दत्तनगर येथील कौशल्या हाइट्स या इमारतीमध्ये रविवारी दुपारी घडला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस असल्याच्या बतावणीने महिलेची फसवणूक

$
0
0
कोथरूड येथील गणेशकृपा सोसायटी बसस्टॉपजवळ पोलिस असल्याची बतावणी करीत तिघा आरोपींनी एका वृद्धेला फसवून त्यांच्या एक लाख वीस हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या लुबाडल्या. माधुरी अनिल तळवळकर (वय ६४, रा. परमहंसनगर, कोथरूड) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

शिवनेरी कडेलोटावरून युवकाची आत्महत्या

$
0
0
किल्ले शिवनेरीच्या कडेलोटावरून दरीत उडी मारून २४ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. या प्रकरणी शिवनेरीवरील पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्याने पोलिसांना कळविल्यानंतर कडेलोटाखालील दरीतल्या झुडुपात पडलेला त्याचा मृतदेह सायंकाळच्या सुमारास बाहेर काढण्यात आला.

जुन्नरमधून नगरसेविका बेपत्ता झाल्याची तक्रार

$
0
0
जुन्नरमधील शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री बावबंदे या २६ एप्रिलपासून बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांचा मुलगा अभिषेक याने जुन्नर पोलिस ठाण्यात दिली आहे.

‘दादांशी चर्चा करून राजीनामा देणार’

$
0
0
राष्ट्रवादी पक्षाला जेजुरी नगर परिषदेत बहुमत आहे. पक्षाचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून ठरल्यानुसारच आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात येईल, असे नगराध्यक्षा अमृता घोणे यांनी स्पष्ट केले.

दुष्काळग्रस्तांना ‘बीजेएस’ची मदत

$
0
0
दुष्काळग्रस्त ग्रामीण भागांतील बहुसंख्य गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा होत असला, तरी पाणी साठविण्याची क्षमता नाही. त्यामुळे, १० हजार लिटर पाणी साठवणुकीची क्षमता असलेल्या टाक्या भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) सहकार्याने दुष्काळी भागांत उभारल्या जाणार आहेत.

पुणेकरांनी भरला १२ लाखांचा दंड

$
0
0
फुटपाथवर वाहने लावून पादचाऱ्यांची अडचण करणाऱ्या चार हजार ८०० बेशिस्त पुणेकरांनी गेल्या चार महिन्यात वाहतूक पोलिसांकडे १२ लाख रुपयांचा दंड भरला आहे.

जनावरांच्या छावण्यांवर ३७२ कोटी खर्च

$
0
0
पुणे विभागातील जनावरांच्या छावण्या व चाऱ्यावर आतापर्यंत ३७२ कोटी रुपये खर्च झाला असून या महिनाअखेर हा खर्च आणखी दोनशे कोटी रुपयांनी वाढणार आहे. छावण्यांमध्ये सद्यस्थितीत सव्वाचार लाख जनावरांना आश्रय देण्यात आला आहे.

शिक्षण संचालनालयासमोर आंदोलन सुरू

$
0
0
राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या तीन हजार ११५ शाळांना सरकारी मान्यता मिळावी, म्हणून महाराष्ट्र राज्य इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या सहा सभासदांनी सोमवारपासून शिक्षण संचालनालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

बोअर खोदाईला ‘कासवाचे पाय’

$
0
0
उन्हाळा संपत आला तरी विंधनविहिरी (बोअर) खोदाईचे काम अत्यंत कूर्मगतीने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे विभागात मंजूर झालेल्या ८८८ पैकी फक्त ३५२ बोअर खोदण्याचे काम आतापर्यंत पूर्ण होऊ शकले आहे.

ट्रॅव्हल एजंट असोसिएशनचा आज देशव्यापी संप

$
0
0
विमान वाहतूक कंपन्यांकडून तिकीटविक्रीसाठी मिळणारे कमिशन बंद केल्यामुळे ट्रॅव्हल एजंट असोसिएशन पुणेतर्फे आज (७ मे) बंद जाहीर करण्यात आला आहे. पुण्यासह देशभरातील ट्रॅव्हल एजंटची कार्यालये आज दिवसभर बंद राहणार आहेत. देशाबाहेर किंवा देशांतर्गत होणाऱ्या विमान प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी ७० टक्के प्रवासी आजही ट्रॅव्हल कंपन्यांवर अवलंबून आहेत.

ज्योत्स्ना भोळे जन्मशताब्दीचा शुभारंभ सोहळा पणजीत

$
0
0
ख्यातमान गायिका आणि संगीत अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ ११ मे रोजी पणजी येथे होणार आहे. दीनानाथ कलामंदिरात होणाऱ्या या सोहळ्याचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी प्रसाद सावकार यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images