Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘स्वाइन फ्लू’ने महिलेचा मृत्यू

$
0
0
स्वाइन फ्लूच्या संसर्गाने एका महिलेचा मृत्यू झाला. आतापर्यंत मृतांची संख्या १८ झाली असून नव्याने सात जणांना लागण झाली आहे. तर दोन जण व्हेंटिलेटवर आहेत. वर्षा निमगांवकर (वय ४२, रा. नवी पेठ) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.

माळेगावमध्ये बँकेवर दरोडा

$
0
0
माळेगाव येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत चोरट्यांनी जबरी चोरी केली. बँकेतून त्यांनी ९ लाख १० हजार ५०० रुपयांची रोकड लंपास केली. शटर तोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केल्यामुळे शॉर्टसर्किटने आग लागली.

बनावट सिमकार्डचा सुळसुळाट

$
0
0
बनावट कागदत्रांच्या आधारे शहरात सिमकार्डची विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेच्या दहशतवादविरोधी सेलने (पीएसटीसी) कारवाईचा बडगा उगारला. स्वारगेट चौकात सिमकार्ड प्रकरणी तिघांना अटक केली असून, शहरात अडीचशे ठिकाणी छापे घालण्यात आले आहेत.

‘हिट’ महाबळेश्वर होतंय... ‘हॉट’

$
0
0
ब्रिटिशकाळापासून थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले महाबळेश्वर आता ‘हॉट’ होऊ लागले आहे. क्षमतेपेक्षा पर्यटकांची ३१ टक्के अधिक गर्दी त्यासाठी कारणीभूत असून जगभर प्रमाणित करण्यात आलेल्या मानकांपेक्षा ७०० टनांहून अधिक ‘कार्बन फूटप्रिंट’ तयार होत आहे.

‘एनटीएस’बाबत मनसेचा आंदोलनाचा इशारा

$
0
0
राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठीचा (एनटीएस) भाषेचा पेपर इंग्रजी वा हिंदीमधूनच लिहिण्याची सक्ती करण्याच्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) धोरणाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी निषेध केला.

विविध अपघातांत तीन ठार

$
0
0
शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात एका सात वर्षांच्या मुलीसह दोघांचा मृत्यू झाला. पहिल्या घटनेत रिक्षाला कारची जोरात धडक बसल्यामुळे आईच्या मांडीवरून खाली पडलेल्या सात वर्षीय मुलीच्या अंगावरून त्या वेळी भरधाव वेगाने आलेल्या कारचे चाक गेल्यामुळे जागीच मृत्यू झाला.

पक्षनेत्या व नगरसेविकेच्या वादामुळे सभा तहकूब

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पक्षनेत्या मंगला कदम आणि नगरसेविका शमीम पठाण यांच्यात पक्षाच्या बैठकीत झालेल्या वादामुळे पालिकेची सर्वसाधारण सभा तहकूब करण्याची वेळ महापौरांवर आली. त्याचे खापर महापालिकेच्या आयुक्तांवर फोडण्यात आले.

‘डीपी’च्या मुदतवाढीला मुख्यमंत्री अनुकूल

$
0
0
जुन्या पुण्याच्या विकास आराखड्याला (डीपी) हरकती आणि सूचना देण्यासाठी मुदतवाढ देण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुकूलता दर्शवली असल्याचे खासदार वंदना चव्हाण यांनी शनिवारी सांगितले.

दुष्काळग्रस्तांसाठी लाखाची मदत

$
0
0
युवक कॉँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. रोहित टिळक यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके यांच्याकडे निधीचा धनादेश देण्यात आला.

‘रॅम्बो’ सरसावले दुष्काळग्रस्तांसाठी

$
0
0
‘नागरिकांच्या करमणुकीसाठी आम्ही सर्कशीतून दररोज धम्माल करीत असलो तरी राज्यातील दुष्काळाची आम्हाला जाणीव आहे.

पालिका शाळांच्या खासगीकरणास विरोध

$
0
0
महापालिकेच्या बालवाड्या आणि प्राथमिक शाळांचे कंपनीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी पुणे मनपा कामगार युनियन, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा आणि इतर समविचारी संघटनांनी शनिवारी महापालिकेसमोर धरणे आंदोलन केले.

प्रा. खासगीवाले यांचे निधन

$
0
0
जुन्या पिढीतील कामगार कायदा सल्लागार प्रा. वामन गणेश खासगीवाले (वय ७७) यांचे अल्प आजाराने गुरूवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. गरवारे आणि मॉडर्न कॉलेज येथे प्राध्यापक म्हणून खासगीवाले यांनी प्रदीर्घ काळ काम केले.

मिलिंद जोशींचा (‘ना)राजी’नामा

$
0
0
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रमुख कार्यवाह प्रा. मिलिंद जोशी यांनी शनिवारी त्यांच्या दोन्ही पदांचा राजीनामा दिला. या संस्थांच्या कामासाठी पुरेसा वेळ देऊ शकत नसल्यामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मनसेचा रडीचा डाव

$
0
0
विरोधी पक्षनेतेपद गेल्यानंतर मनसेने ‘रडीचा डाव’ सुरू केला आहे. सध्या महापालिका भवनात असलेले पक्ष कार्यालय लहान असल्याने काँग्रेसचे कार्यालय देण्याची मागणी मनसेने महापौरांकडे केली आहे.

मतिमंद मुलीवर बलात्कार

$
0
0
सहा महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या मतिमंद मुलीवर (वय २२) वॉर्डबॉयने बलात्कार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. मात्र, हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी वॉर्डबॉयकडे पैशाची मागणी करून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केला.

‘नव्याने पाहिले पुण्याचे हेरिटेज’

$
0
0
‘पुण्यातच एवढी सारी महत्त्वाची ठिकाणे आहेत?... आजपर्यंत पाहायची वेळच आली नाही...सर्वच वास्तूंचे सौंदर्य दिमाखदार आहे; पण त्याला योग्य पद्धतीने जपण्याची आवश्यकता आहे... ‘हेरिटेज वॉक’ची कल्पनाच अप्रतिम आहे...

कोणीही उठतो; आरोप करतो...

$
0
0
‘आजकाल कोणीही उठतो आणि आपल्यावर आरोप करतो, अशी स्थिती आली आहे... !’ इंदारपूरचे वक्तव्य, सिंचन घोटाळा आणि मुंबईतील बेनामी सदनिका अशा वेगवेगळ्या विषयांवरून गेल्या काही दिवसांमध्ये टीकास्त्रांचा सामना करण्याची वेळ आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही व्यथा व्यक्त केली आहे.

तर १ मेपासून रिक्षावाले रस्त्यांवर

$
0
0
रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र सामाजिक सुरक्षा मंडळाची नेमणूक न केल्यास येत्या एक जुलैपासून रस्त्यांवर उतरण्याचा इशारा अॅ‌टो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे कार्याध्यक्ष शरद राव यांनी रविवारी दिला. ‘हकीम समितीनुसार १ मेपासून रिक्षा प्रवास दरात वाढ झाली पा‌हिजे,’ अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

टिंगरेनगरमध्ये मंगळसूत्र हिसकावले

$
0
0
टिंगरेनगर येथे घराच्या आवारात देवपूजेसाठी फुले तोडत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंग‍ळसूत्र आणि साखळी हिसकावण्याचा प्रकार घडला. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

‘पानशेत पूरग्रस्तांना डीपीमध्ये न्याय हवा’

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीतील विकास आराखडा तयार करताना पानशेत पूरग्रस्तांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत गाळेधारकांनी हरकती-सूचना नोंदविण्याचे आवाहन विविध संघटनांकडून करण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images