Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दिल्लीतील अत्याचाराविरोधात पुण्यात निषेध रॅली

$
0
0
दिल्लीत पाच वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अत्याचाराचा शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी रविवारी रॅली काढून निषेध केला. मुलींना संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

‘राजा’माणसाचे कर्तृत्व उलगडताना...

$
0
0
‘त्यांनी’ केवळ चित्रपटच काढले नाहीत, तर कुंभाराने मातीला आकार द्यावा, तसे कलाकारांना घडवले. इतकेच नव्हे तर, या कलाकारांना माणूस म्हणून कसे जगायचे याचेही धडे दिले... अशा शब्दांत राजा परांजपे यांचे कर्तृत्व त्यांनीच घडविलेल्या कलावंतांनी रविवारी उलगडले.

बेशिस्त ३०० वाहनांवर कारवार्इ

$
0
0
लक्ष्मी रस्त्यासह शहरातील प्रमुख रस्त्यांवर बेशिस्तपणे पार्किंग केलेल्या तीनशे मोटारींवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. या मोटारचालकांकडून एका दिवसात ३६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहर वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी ही माहिती दिली.

सोन्यासाठी अजूनही ४-५ दिवसांचे वेटिंग

$
0
0
सोन्याचा भाव घसरल्यापासून सराफ बाजारातील खरेदीचा उत्साह कायम आहे. अनपेक्षित मागणी वाढली असल्याने सोन्याच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे अजूनही सोन्यासाठी बुकिंगच सुरू आहे.

छोटा सा झटका जोर से लगे

$
0
0
महापालिकेच्या रस्ते खोदाई शुल्कात काही प्रमाणात कपात झाल्याने शहरातील वीजग्राहकांना सोसावा लागणारा दरवाढीचा भार प्रतियुनिट पंधरा पैशांहून पाच ते दहा पैशांवर येण्याची शक्यता आहे.

बाबा आढाव आणि राव यांच्यात दुफळी

$
0
0
राज्यातील रिक्षा संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या अॅटो रिक्षाचालक मालक संघटना संयुक्त कृती समितीमधील अंतर्गत वाद रविवारी उफाळून आला. या वादात एका पदाधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली असून, येत्या तीन महिन्यात संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता आहे.

आल्हाददायक हवेने पुणेकर सुखावले

$
0
0
दिवसभर सुसह्य ठरणाऱ्या उन्हाच्या झळा अन् सायंकाळनंतर पहाटेपर्यंतचा सुखद गारवा... हा ‘फील’ उकाड्याने घामाघूम करणाऱ्या एप्रिलमध्ये मिळत असल्याने आल्हाददायक पुणेरी हवेचा अनुभव पुणेकर पुन्हा घेत आहेत.

आमदार-खासदार Vs ‘माननीय’

$
0
0
शहराच्या विकास आराखड्यातील तरतुदींच्या मुद्यांवरून शहरातील आमदार-खासदार आणि महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे. महापालिकेत सत्तेवर असलेल्या दोन्ही काँग्रेसमधील लोकप्रतिनिधीच परस्परांच्या विरोधात तोफा डागू लागले आहेत.

८ वर्षांच्या मुलीचा बारामतीत विनयभंग

$
0
0
शेजारी राहणाऱ्या आठ वर्षांच्या बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विवेक रमेश जाधव (वय ३०) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. वसंतनगर भागात तो राहातो.

आरक्षणावरील बांधकामे सासवडमध्ये अनियमितच

$
0
0
सासवड शहर विकास आराखड्यातील औद्योगिक वापराच्या भूखंडावरील निवासी व व्यापारी बांधकामे नियमित करण्यात येणार नसल्याचे मुख्याधिकारी शीला पाटील यांनी रविवारी सांगितले.

अत्यल्प छेदाद्वारे कृत्रिम भिंगरोपण शक्य

$
0
0
मोतीबिंदूच्या ऑपरेशनमध्ये आता नव्या पद्धतीने १.८ मिमी एवढ्या कमी आकाराच्या डोळ्याच्या पडद्याचा काप घेऊन त्याद्वारे कृत्रिम भिंगरोपण करणे शक्य झाले आहे. त्यामुळे पेशंटच्या चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो.

मृतदेहांची अदलाबदल; नातेवाईकांना मनस्ताप

$
0
0
हॉस्पिटलमधून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणाऱ्या मृतदेहांची अदलाबदल झाल्याचे लक्षात आल्याने रविवारी शहरातील दोन कुटुंबांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला आणि मनस्ताप सहन करावा लागला. रूबी हॉल हॉस्पिटलमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे सुमारे दोन तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

ऑनलाइन परीक्षेवर ‘टेक्नॉलॉजी’चा रूसवा

$
0
0
सर्व्हरमधील तांत्रिक अडचणींमुळे रविवारी ऑनलाइन होणार असलेली बायोटेक्नॉलॉजी एलिजिबिलिटी टेस्ट (बीईटी) आयत्या वेळी रद्द करण्यात आली. त्यामुळे बाहेरच्या अनेक शहरांतून पुण्यात परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांवर मनस्तापाची पाळी आली.

शिक्षण हक्क कायदा आढाव्यासाठी बैठक

$
0
0
राज्यभरात शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या शिक्षण खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी रविवारी पुण्यात बैठक घेतली. शिक्षण खात्यातील संचालक पातळीवरील अधिकाऱ्यांसोबतच राज्यभरातील शिक्षणाधिकारी या बैठकीसाठी हजर होते.

‘ई-पीजी पाठशाला’ तून ७७ विषयांचे अभ्यासक्रम

$
0
0
पदव्युत्तर पातळीसाठी देशभर चांगल्या दर्जाचे अभ्यासक्रम तयार करण्याच्या दृष्टीने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पाऊल उचलले आहे. त्यासाठी आता ‘ई-पीजी पाठशाला’ हा नवा उपक्रम सुरू झाला आहे.

इथे अल्पसंख्यांकांना स्थान नाही

$
0
0
शहरातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची महत्त्वाची जबाबदारी असणाऱ्या ‘बड्या’ संस्थांच्या शाळा अल्पसंख्याक समाजालाच आपल्या दारात उभे करत नाहीत.

‘हेरिटेज’ ची कल्पना भन्नाट

$
0
0
हेरिटेज वॉकची कल्पना खरोखरच भन्नाट आहे... हा उपक्रम अजून मोठ्या स्तरावर होण्याची आवश्यकता आहे... पुण्याचा इतका महत्त्वपूर्ण वारसा नव्या पिढीला कळण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा आहे... अशा सूचना आणि प्रतिक्रिया नोंदवत पुणेकरांनी ‘हेरिटेज वॉक’ या उपक्रमाचे कौतुक केले.

आज आणि उद्या बाजारपेठ बंद

$
0
0
स्थानिक संस्था करातील (एलबीटी) काही तरतुदी शिथिल करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा शासन निर्णय (जीआर) त्वरित काढण्यात यावा, या मागणीसाठी राज्यभरातील व्यापारी आज आणि उद्या (सोमवार आणि मंगळवार) बंद पाळणार आहेत.

इच्छुक उमेदवारांना कानपिचक्या

$
0
0
आमदारकीच्या उमेदवारीसाठी आतापासून बाशिंग बांधलेल्या जुन्नरमधील इच्छुकांना शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख गजानन किर्तीकर यांनी चांगलेच फटकारले. ‘आधी पक्षाचे काम करा आणि मग उमेदवारीचा विचार करू,’ असे त्यांनी या इच्छुकांना सुनावले.

‘एलबीटी’ रद्दच करा

$
0
0
‘स्थानिक संस्था कर (एलबीटी) पद्धतीत लावण्यात आलेल्या जाचक अटी त्रासदायक ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे त्या रद्द करण्यात यावा,’ असा सूर वसंत व्याख्यानमालेतील परिसंवादात रविवारी काढण्यात आला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images