Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

स्वाइन फ्लूचे पेशंट वाढण्याची भीती

$
0
0
दिवसा प्रचंड उकाडा आणि रात्री हवेत गारवा या वातावरणातील बदलाचा फटका पुणेकरांना बसत असून, त्यामुळे सर्वाधिक श्वसनाचे विकार बळावत असल्याचे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञांनी नोंदविले. त्यामुळे उन्हातून घरात आल्यावर त्वरित थंड पाणी न घेण्याचा सल्ला दिला आहे.

आरोप राजकीय हेतूनेचः कलमाडी

$
0
0
पुण्यात पार पडलेल्या कॉमनवेल्थ यूथ गेम्समधील कथित गैरप्रकारांबाबत लोकलेखा समितीच्या अहवालाबाबत खासदार सुरेश कलमाडी यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेडली ते बेग व्हाया ISI

$
0
0
जर्मन बेकरीत स्फोटाच्या घटनेचा आढावा घेताना डेव्हिड कोलमन हेडली या लष्करे तैयबाच्या दहशतवाद्याला विसरता येणार नाही. मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार असलेल्या हेडलीने जर्मन बेकरी आणि कोरेगाव पार्क भागातील संवेदनशील ठिकाणांची २००८ आणि २००९मध्ये टेहळणी केली होती.

हिमायत बेगला फाशीच

$
0
0
शांत-सुसंस्कृत पुण्याच्या छबीवर दहशतवादाची जखम करणाऱ्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणी मिर्झा हिमायत बेग याला गुरुवारी विशेष कोर्टाने फाशीची शिक्षा ठोठावली. ‘बेगचे दहशतवादी कृत्य मानवतेला काळिमा फासणारे आहे.

‘डीपी’च्या नियोजन समितीवर तुपे, तांबे आणि छाजेड

$
0
0
जुन्या पुण्याच्या विकास आराखड्याचे (डीपी) भवितव्य आता नियोजन समितीच्या हाती असून, या समितीवर अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे आणि स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांची, तर काँग्रेसतर्फे अभय छाजेड यांची नियुक्ती गुरुवारी सर्वसाधारण सभेत करण्यात आली.

लोणार:साडेपाच लाख वर्षांपूर्वीचे

$
0
0
महाराष्ट्राचेच नाही तर संपूर्ण देशाचे नैसर्गिक वैभव असणाऱ्या लोणार विवराच्या वयासंबंधी नुकतेच नवे संशोधन प्रसिद्ध झाले असून, या संशोधनानुसार लोणार विवाराचे वय पाच लाख ७० हजार वर्षे असल्याचे आढळून आले आहे.

१० ची पुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी

$
0
0
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या अभ्यासक्रमावर आधारित पुस्तके त्वरित उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार मोहन जोशी यांनी विधान परिषदेत केली. एप्रिल महिना संपत आला असतानाही दहावीच्या विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुस्तके उपलब्ध नसल्याविषयी जोशी यांनी नाराजी व्यक्त केली.

‘श्रीमंत दगडूशेठ’ ट्रस्टतर्फे जय गणेश आपत्ती निवारण अभियान

$
0
0
राज्यातील तीव्र दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने ‘जय गणेश आपत्ती निवारण अभियाना’ला रामनवमीच्या मुहूर्तावर शुक्रवारपासून सुरुवात केली. या अभियानांतर्गत पाच गावे दत्तक घेण्यात येणार असून, पशुधन वाचविण्यासाठी चारा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

सिंचन व्यवस्थापन समितीचा आंदोलनाचा इशारा

$
0
0
जलसंपदा खात्याच्या सिंचन व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांना नियमित वेतन न मिळाल्यास २९ एप्रिल पासून सर्व कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र कर्मचारी संघटनेने दिला आहे.

वातानुकूलित बोगीची शेतकऱ्यांकडून मागणी

$
0
0
पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात तयार होणारा शेतमाल अन्य राज्यांमध्ये पाठवण्यासाठी रेल्वेने स्वतंत्र वातानुकूलित बोगीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.

घरफोडी करणारी टोळी गजाआड

$
0
0
गुन्हे शाखेच्या युनिट दोनने घरफोडी करणाऱ्या तिघा आरोपींना अटक करून, त्यांच्याकडून पाऊण किलो सोन्याच्या दागिन्यांसह साडेएकवीस लाख रुपयांचा जप्त केला आहे. या आरोपींनी पुणे शहरात ४७ घरफोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

सल्लागार ‘तुपात’; विकासकामे ‘सुपात’

$
0
0
महापालिकेकडून विविध विकासकामांसाठी आणि त्यांच्या नियोजनासाठी सल्लागारांची नेमणूक करण्यात येते. त्यांच्या सल्ल्यांसाठी जनतेकडून कररूपाने गोळा करण्यात आलेले करोडो रुपये खर्चण्यात येतात.

विश्रांतवाडी-दिघी नाका ‘BRT’साठी २.५ कोटी

$
0
0
विश्रांतवाडी ते दिघी जकातनाका या ‘बीआरटी’च्या मार्गासाठी केंद्र सरकारने ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनर्निर्माण योजने’अंतर्गत (जेएनएनयूआरएम) अडीच कोटी रुपये राज्य सरकारकडे पाठवले आहेत.

शिवकाळातही राज्यकर्त्यांना होती अन्नसुरक्षेची जाणीव

$
0
0
शिवाजी महाराजांच्या काळातही दुष्काळाचे सावट असायचे. तेव्हा शेतकऱ्यांची जमीन नांगरली जावी, याची काळजी महाराजांनी घेतली. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही अन्नसुरक्षेची खबरदारी त्यांनी घेतल्याचे दिसून येते, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केले.

दोन दशकांनंतर तिने शोधले आपुलकीचे नाते

$
0
0
‘श्रीवत्स’मधून एकोणीस वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये दत्तक गेलेल्या अनिताला आपले मूळ शोधण्याचा ध्यास लागला होता... जन्मदात्या आईने रस्त्यावर सोडून दिल्यानंतर, जीवदान देत ‘श्रीवत्स’मध्ये दाखल करणाऱ्या ‘पालकां’चा शोध घ्यायचा होता. अखेर या शोधमोहीमेची शुक्रवारी यशस्वी सांगता झाली.

‘बीडीपी’ आरक्षणाबाबत नाराजी कायम

$
0
0
समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यातील ‘बीडीपी’ आरक्षणाबाबत राष्ट्रवादीच्या बहुसंख्य नगरसेवकांमध्ये नाराजीचे वातावरण कायम असून, या बाबत वरिष्ठ नेत्यांनीच लक्ष घालण्याचे निवेदन शुक्रवारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आले.

अद्यापही नाहीच व्यापा-यांची माघार

$
0
0
स्थानिक संस्था करातून (एलबीटी) सवलती देण्याबाबत विविधमंडळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या घोषणेचे शासन निर्णयात (जीआर) रूपांतर होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.

व्यापारीकरणाला सानेवाडीकरांचा विरोध

$
0
0
औंध येथील सानेवाडी या निवासी भागात सुरू असणाऱ्या व्यापारीकरणाच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली असली तरी त्याकडे काणाडोळा करण्याची भूमिका प्रशासन घेत आहे.

आयुर्वेद कॉलेजना रिक्त पदांचे दुखणे

$
0
0
प्राचीन औषधशास्त्राचे ज्ञान समाजातील तळागळापर्यंत पोहोचिवण्याचे काम करणाऱ्या अनुदानित आयुर्वेद महाविद्यालयांमध्ये गेल्या २७ वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे काही महिन्यांत सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनच्या (सीसीआयएम) होणाऱ्या पाहणीत शिक्षकांअभावी कॉलेजची मान्यता रद्द होण्याची भीती व्यक्त होत असून महाविद्यालयांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.

रॉकेलचा कोटा घटला

$
0
0
राज्याला दिल्या जाणाऱ्या रॉकेलच्या कोट्यात केंद्र सरकारने ४० टक्के घट केल्यामुळे रेशनकार्डधारकांना चालू महिन्यांपासून कमी रॉकेल मिळणार आहे. रॉकेलच्या कोट्यामध्ये कपात केल्यामुळे नागरिकांना आता प्रती व्यक्ती एक लिटर याप्रमाणे रॉकेल मिळणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images