Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

अंतिम युक्तिवादासाठी २५ एप्रिलपर्यंत मुदत

$
0
0
नदीपात्रात रस्ता करण्याबाबत सुरू असलेल्या जनहित याचिकेवर महापालिका, जलसंपदा विभाग आणि अर्जदारांनी येत्या २५ एप्रिलपर्यंत अंतिम युक्तिवाद सादर करावा अशा सूचना हरित लवादाने दिल्या आहेत.

प्रोफाइल अपडेट करण्याची मुदत वाढविणार नाही

$
0
0
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्वपरीक्षेसाठी यापूर्वी नोंदणी केलेल्या सुमारे ४० हजार उमेदवारांचे प्रोफाइल अद्याप अपडेट झालेले नाही.

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने १४ नागरिकांची फसवणूक

$
0
0
रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने नवी खडकीतील १४ नागरिकांना साडेआठ लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी एका ठगाला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे.

नागरिकांना वेठीस धरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा इशारा

$
0
0
‘एलबीटी’च्या नावाखाली किराणा मालाची दुकाने बंद ठेवत नागरिकांना वेठीस धरणाऱ्या दुकानदारांवर कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

‘एनडीए’तील शिवरायांच्या पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण

$
0
0
पुणे महापालिकेतर्फे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण येत्या शुक्रवारी (१९ एप्रिल) केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे.

बहुतांश मागण्या मान्य

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधात बंदचे हत्यार उपसलेल्या व्यापाऱ्यांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधिमंडळात केली.

‘एनटीएस’मध्येही मराठीवर अन्याय

$
0
0
केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) स्थानिक भाषांवर झालेल्या अन्यायाचे प्रकरण ताजे असताना आता राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतही (एनटीएस) मराठीसह स्थानिक भाषांवर अन्याय होत आहे.

नियोजन समिती सदस्यांसाठी निवडणूक?

$
0
0
शहराच्या विकास आराखड्याचे भवितव्य ठरविणाऱ्या नियोजन समितीवरील सदस्यांची निवड आणि विरोधी पक्षनेतेपदावरील नियुक्ती यावरून महापालिकेत राजकीय डावपेच रंगू लागले आहेत.

शिक्षण मंडळ बरखास्त करा

$
0
0
सहल घोटाळ्याबाबत पालिका आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीने मंडळावर ठपका ठेवला असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शिक्षण मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी सुराज्य संघर्ष समितीच्या विजय कुंभार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

‘पे अँड पार्क’ दुचाकींना तूर्त नाही

$
0
0
शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुचाकींनाही ‘पे अँड पार्क’ लागू करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस वगळता अन्य पक्षांनी बुधवारी विरोध केला. त्यामुळे हा विषय पुढे ढकलण्यात येऊन त्याचा फेरप्रस्ताव सादर करावा, असा आदेश प्रशासनाला देण्यात आला.

बेगला आज होणार शिक्षा

$
0
0
शांत आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी दहशतवादी मिर्झा हिमायत बेगला आज, गुरुवारी शिक्षा ठोठाविण्यात येणार आहे.

आज तरी सरकार उदार होणार?

$
0
0
दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जर्मन बेकरी स्फोटाचा छडा लावल्याबद्दल ‘एटीएस’ला जाहीर केलेली पाच लाख रुपयांची बक्षिसी अजूनही राज्य सरकारच्या तिजोरीतच आहे.

विद्यार्थी पुण्यात मारहाणीचा धनी

$
0
0
केवळ गडचिरोली जिल्ह्यातून आला म्हणून थेट नक्षलवाद्यांशी संबंध जोडत, समाजकल्याण विभागाच्या हॉस्टेलमध्ये मारहाण झाल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने केली. या संदर्भात कारवाई सोडाच, त्या विद्यार्थ्यालाच धमकावून हॉस्टेलबाहेर काढण्यात आले.

‘LBT’साठी ‘इन्स्पेक्टर राज’ नाही

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू झाल्यानंतर ‘इन्स्पेक्टर राज’ येईल, नोंदी पाहण्यासाठी दुकानांमध्ये घुसखोरी केली जाईल, नियमांच्या नावाखाली दहशतीचे वातावरण निर्माण होईल, अशी व्यापाऱ्यांना वाटणारी भीती पूर्णपणे निराधार ठरवीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘एलबीटी’चा मार्ग सुकर केला.

छोटेसे पाऊल... वारसा जपण्यासाठीचे

$
0
0
हेरिटेज म्हणजे नक्की काय? वारसा कशाला म्हणायचे? या जुन्या गोष्टी जपून ठेवण्याची, त्यांचा विचार करण्याची खरेच गरज आहे का?... गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात ‘पुणे सुपरफास्ट’ या उपक्रमांतर्गत ‘महाराष्ट्र टाइम्स’ने या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीचा प्रवास सुरू केला.

हिमायत बेगला फाशीची शिक्षा

$
0
0
शांत आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात जर्मन बेकरीत झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी दहशतवादी मिर्झा हिमायत बेग याला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी कोर्टाने त्याला दोषी ठरविले होते. विशेष न्यायाधीश एन. पी. धोटे यांनी बेगला शिक्षा सुनावली.

‘एफटीआयआय’ फिल्म फेस्टिव्हलचे आज उद्घाटन

$
0
0
‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’तर्फे (एफटीआयआय) आयोजित पहिल्या ‘नॅशनल स्टुडंट फिल्म फेस्टिव्हल’चे उद्घाटन प्रख्यात मल्याळम चित्रपट दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर शाजी करुण यांच्या हस्ते होणार आहे.

सोलापूर, नागपूरसाठी जादा गाड्यांचे नियोजन

$
0
0
उन्हाळी सुटीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने गोरखपूर, हबीबगंज, बिलासपूर, नागपूर आणि सोलापूरसाठी जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

जर्मन बेकरी स्फोटातील तक्रारदार गायबच

$
0
0
जर्मन बेकरी स्फोटाची तक्रार देणारे प्रवीणकुमार पंत हे गेल्या एक वर्षांपासून गायब असून, तपास यंत्रणांना त्यांचा कुठलाही थांगपत्ता लागलेला नाही. पंत हे जर्मन बेकरीत दहा वर्षांपासून कॅशिअरची नोकरी करत होते.

‘समाजकल्याण’तर्फे विद्यार्थी मारहाणीची चौकशी

$
0
0
येरवडा येथील समाजकल्याण विभागाच्या होस्टेलवरील बारावीच्या विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीच्या तक्रारीची वस्तुनिष्ठ चौकशी करण्याचे आदेश विभागाने गुरुवारी दिले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images