Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुण्यात अवघे २५ डॉक्टर ‘बोगस’

0
0
राज्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट असताना पुण्यासारख्या मेट्रोसिटीत केवळ गेल्या २२ वर्षांत अवघे २५ बोगस डॉक्टर आढळल्याची आश्चर्यजनक माहिती पुढे आळी आहे.

निमआराम एसटींना लोणावळा थांबा

0
0
लोणावळ्याहून पुण्या-मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने स्वारगेट-मुंबई दरम्यान धावणाऱ्या सुमारे ३२ निमआराम गाड्या लोणावळ्याला थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे-जम्मू थेट विमानसेवेची मागणी

0
0
जम्मू काश्मीर, अमरनाथ, वैष्णवदेवी, श्रीनगर या भागाला पुणे विभागातून दरवर्षी तीन लाखापेक्षा अधिक पर्यटक भेट देतात.

पाच अल्पवयीन मुलींचा विनयभंग

0
0
सिंहगड रोडवरील किलबिल नाट्य रंगभूमी येथे नृत्य शिकण्यासाठी येत असलेल्या अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या नृत्य शिक्षकाला दत्तवाडी पोलिसांनी गजाआड केले. या शिक्षकाने पाच मुलींचा विनयभंग केल्याची प्राथमिक माहिती तपासात निष्पन्न झाली आहे.

मालक असूनही कुत्री बेवारस

0
0
परदेशातून लाखो रुपये किमतीची कुत्री आणून घरी पाळण्याचे प्रमाण पुण्यात वाढले असताना, पुण्यामध्ये किती विदेशी कुत्री आहेत, याची स्वतंत्र माहिती पुणे महापालिकेकडे नाही.

जप्त गाड्यांसाठी आता डंपिंग ग्राउंड

0
0
वाहतूक सुधारणांवर दोन कोटी रुपये खर्च करण्याबरोबरच वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या हजारो गाड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी शहराबाहेर डंपिंग ग्राउंड करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

टीडीआर वाटप फेरबदलास नकार

0
0
टीडीआर वाटप प्रकियेत फेरबदलाचा महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांचा प्रस्ताव नगररचना संचालकांनी नामंजूर केला आहे. १९९५ नंतर ताब्यातील आरक्षित जागांच्या मोबदल्यात टीडीआर देण्याचा महापालिकेचा प्रस्ताव सार्वजनिक हिताविरोधातील असून, तो मंजूर करू नये, अशी शिफारस नगररचना संचालकांनी राज्य सरकारकडे केली आहे.

जिल्हा परिषदेतर्फे जलयुक्त गाव अभियान

0
0
पावसाळ्यात पडणारा प्रत्येक थेंब साठवून ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने जलयुक्त गाव अभियान हाती घेण्यात आले आहे.

एजन्सींनीच विकले ‘ब्लॅक’ने सिलिंडर

0
0
शहरात सिलिंडरची टंचाई नसल्याचा दावा ऑइल कंपन्यांनी केला असला, तरी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात सिलिंडरची नोंदणी केलेल्या अनेक ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत गॅस न मिळाल्याने नवीन आर्थिक वर्षातील सिलिंडर घेण्याची वेळ आली आहे.

आता स्टेशनवरील अनधिकृत फ्लेक्स ‘लक्ष्य’

0
0
शहराच्या हद्दीत असलेल्या रेल्वे स्टेशनमधील अनधिकृत फ्लेक्स आता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून लक्ष्य केले जाणार आहेत. रेल्वे स्टेशनच्या आवारातील अनधिकृत फ्लेक्सचे रेल्वेकडून सर्वेक्षण केले जाणार असून, त्यानंतर रेल्वे आणि महापालिका प्रशासन संयुक्तपणे कारवाई करणार आहे.

जोर का झटका... धीरे से

0
0
वीजपुरवठ्याच्या कामांसाठी रस्तेखोदाई केल्यास महावितरणला सवलतीचा दर लागू करण्याचा निर्णय मंगळवारी महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे शहरातील सुमारे पाचशे कोटी रुपयांची वीज सुधारणांची कामे मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

‘पीएमपी’च्या ताफ्यात पुन्हा भाडेतत्त्वावरील बस

0
0
पुणे महानगर परिवहन मंडळाने (पीएमपी) भाडेतत्त्वावर घेतलेल्या २७३ बसेसचे भाडे देताना पीएमपी प्रशासनाच्या नाकीनऊ येत असतानाच ५०० भाडेतत्त्वावरील बसेस घेण्याचा प्रस्ताव ‘पीएमपी’ने संचालक मंडळासमोर ठेवला आहे.

विविध भाषा अभ्यासाची संधी एकाच छताखाली

0
0
विविध भाषांमधील भेदाभेद दूर करून त्यांच्या एकत्रित अभ्यासाला चालना देण्यासाठी पुणे विद्यापीठात आता ‘बहुभाषिक संशोधन केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे.

बारा पेट्रोल पंप चोवीस तास सुरू

0
0
रात्रीच्या वेळी वाहनात अचनाक इंधन भरण्याची वेळ आल्यास लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने २४ तास इंधन मिळण्याची सुविधा बारा पंपावर उपलब्ध करून दिली आहे; तसेच नव्या सात पंपांवर सीएनजी भरण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

‘रुपी’ राष्ट्रीयीकृत बँकेत विलीन करण्याची मागणी

0
0
रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेवर निर्बंध घातल्याने खातेदारांची गैरसोय होत असून नोकरदार, निवृत्ती वेतनधारक यांच्यासह छोट्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

भीमाशंकरचे रिसॉर्ट गावकऱ्यांच्या ताब्यात

0
0
भीमाशंकर अभयारण्य पर्यटनाला प्रोत्साहन आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळावा या उद्देशाने वन विभागाने स्थानिक ‘ग्रामपरिसर विकास समिती’ला रिसॉर्ट सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे.

बिबट्याची कातडी विकणाऱ्याला अटक

0
0
बिबट्याचे कातडे पुण्यात विक्रीसाठी घेऊन आलेल्या एका तरुणाला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी प्रवीण उर्फ पव्या मनोहर पाटील (वय २२, रा. ओंकार बिल्डिंग, कर्नाटक) याला अटक करण्यात आली आहे.

वन्यप्राणी आपले ‘सख्खे शेजारी’

0
0
माणसे वस्तीत आणि वन्यप्राणी जंगलात किंवा टेकड्यांवर राहतात…. असे आपण सतत ऐकत आलो आहोत, पण ग्रामीण भागात परिस्थिती वेगळी असून, माणूस आणि वन्यप्राणी ‘सख्खे शेजारी’ असल्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत.

डॉ. अलेक्झांडर गिब्सन यांच्या निवासस्थानाला ‘हेरिटेज’ दर्जा

0
0
भारताचे पहिले वनसंरक्षक डॉ. अलेक्झांडर गिब्सन यांचे जुन्नर तालुक्यातील हिवरे उद्यानात असलेले निवासस्थान वनविभागाकडून ‘हेरिटेज वास्तू’ म्हणून घोषीत करण्यात आले आहे.

नावीन्यपूर्ण उत्पादनांची ‘तांबट शाळा’

0
0
पारंपरिक कला जपत असतानाच तिला आधुनिकतेचा साज देत पुण्यातील साडेतीनशेहून अधिक वर्षांची तांबट आळी पुन्हा एकदा नव्या रूपांत ग्राहकांसमोर आली आहे. तांबट कारागिरांनी तयार केलेल्या आधुनिक उत्पादनांना देशभरातील कॉर्पोरेट कंपन्यांबरोबरच परदेशातूनही मागणी वाढत आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images