Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पाणीकपातीची ट्रेन पुणे स्टेशनवर

$
0
0
सुटीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला रेल्वे प्रशासनाला पुणे स्टेशनवर पाणीकपातीच्या संकटाला तोंड द्यावे लागणार आहे.

अनधिकृत बांधकामांवर पिंपरीमध्ये बुलडोझर

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी जाहीर केल्यानुसार अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला पुन्हा वेग आला आहे. त्याअंतर्गत काळेवाडी येथे पूररेषेतील तसेच व्यावसायिक स्वरूपाच्या सात अनधिकृत इमारती शुक्रवारी (१२ एप्रिल) पाडण्यात आल्या.

बेकायदेशीर सोनोग्राफीप्रकरणी ३० डॉक्टरांचे निलंबन

$
0
0
बेकायदेशीर सोनोग्राफी करीत गर्भलिंग निदान कायद्याचा भंग केल्याप्रकरणी विविध पॅथीच्या साठपेक्षा अधिक डॉक्टरांवर महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी) कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यापैकी तीस डॉक्टरांचे व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ अभियानाला सुरुवात

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ‘राष्ट्रवादी आपल्या दारी’ या अभियानाला सुरुवात करण्यात आली असून, शुक्रवारी हडपसर विधानसभा मतदार संघातील नागरिकांशी संपर्क साधण्यात आला.

कॅन्टोन्मेंटमध्ये ‘एलबीटी’ दुप्पट

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डातील व्यापाऱ्यांना एकाच मालावर दोन वेळा ‘एलबीटी’ (लोकल बॉडी टॅक्स) भरावा लागणार आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट भागातील रहिवाशांना अनेक वस्तू दुप्पट कर लावून मिळणार आहेत.

... तर ‘इस्मा’ लावणार कसा?

$
0
0
धान्यासह खाद्यान्न वस्तूंची खरेदीच व्यापारी करणार नसतील, तर विकण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे अत्यावश्यक सेवा कायदा (इस्मा) त्यांना कसा लावता येईल, असा प्रश्न व्यापारी परिषदेत उपस्थित करण्यात आला.

मार्ग बदललेल्या नाल्यांची माहिती प्रशासन देणार

$
0
0
शहरातील किती नाल्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत, त्याची माहिती प्रशासनाने देऊन नाल्यांच्या सद्यस्थितीबाबत माहिती सादर करण्याचा निर्णय शहर सुधारणा समितीच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला.

इंजिनीअरिंग कॉलेजचा सध्या सुळसुळाट

$
0
0
‘सध्या सर्वत्र इंजिनीअरिंग कॉलेजेसचा सुळसुळाट झाला आहे. या कॉलेजेसमध्ये गुणवत्ता, अभ्यासक्रम याला महत्त्व राहिलेले नाही. फक्त काही कॉलेज आपला दर्जा टिकवून आहेत.

राज्यात उकाडा तीव्र

$
0
0
शहर आणि परिसरात शुक्रवारी उन्हाचा चटका वाढला. शहरात पारा चाळीशीच्या घरात पोहोचला, तर लोहगावमध्ये तो टप्पा ओलांडला गेला. पुढच्या दोन दिवसांत उन्हाची काहिली कायम राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

‘एमपीएससी’साठी १७ एप्रिलपर्यंत मुदत

$
0
0
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेकरता ज्या उमेदवारांनी अद्याप आपल्या प्रोफाइलमधील माहिती अद्ययावत केलेली नाही, त्यांच्यासाठी ही माहिती अद्ययावत करण्याची मुदत १७ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली आहे.

‘प्रॉपर्टी कार्ड’साठी आणखी प्रतीक्षा

$
0
0
पुण्यासह अन्य महापालिकांच्या हद्दीमधील भूमापनाचे काम नगर भूमापन अधिकाऱ्यांअभावी रखडले आहे. परिणामी, नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड मिळण्यास विलंब होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रवादीच्या प्रदेश चिटणीसावर गुन्हा

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस विजय शेवाळे आणि त्यांच्या दहा साथीदारांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि खोटी कागदपत्रे तयार करून अपहार केल्याचा गुन्हा चिंचवडगाव पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.

विकास आराखड्याचे विसर्जन

$
0
0
बिल्डरांच्या हिताचा आणि मध्यमवर्गींच्या विरोधात असलेल्या विकास आराखड्याला (डीपी) विरोध करण्यासाठी पुणे बचाव समितीने डीपी विसर्जन मिरवणूक काढून ‘डीपी’च्या प्रतीचे मुठा नदीत विसर्जन केले.

पुणेकर हेमीलची ‘नासा’त भरारी

$
0
0
अवकाशशास्त्रज्ञ बनून ‘नासा’सारख्या ख्यातनाम संस्थेत संशोधन करण्याचे स्वप्न पुण्यातील हेमील मोदी या चोवीस वर्षीय तरुणाने साधले आहे.

सोने थोडेसे स्वस्त

$
0
0
युरोपीय युनियन युरोपातील आर्थिक अडचणीतील देशांना सोन्याची विक्री करण्यास सांगण्याची शक्यता असल्याचा परिणाम सोन्याच्या भावावर झाला असून, शुक्रवारी देशातील सराफ बाजारात सोने दहा ग्रॅममागे पाचशे रुपयांनी घसरून २९,०२५ रुपयांवर आले.

मुख्यमंत्र्यांची शिष्टाई फसली

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या दिलाशानंतरही स्थानिक संस्था कर, एलबीटी रद्द करण्याच्या व्यापाऱ्यांच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. होलसेल व्यापारी १५ एप्रिलपासून वस्तूंची खरेदी थांबविणार असून, २२ एप्रिलपासून राज्यव्यापी बेमुदत बंदही करण्यात येणार आहे.

विज्ञान पुस्तकांचा खजिना होणार खुला

$
0
0
मुंग्या, वटवाघळांच्या चरित्रापासून ते जीवरसायनशास्त्र, जनुक विज्ञान, जीवविज्ञानापर्यंतच्या विविध विषयांवरील संशोधनाची अद्ययावत माहिती देणारी दुर्मिळ, प्रसिद्ध वैज्ञानिक पुस्तके आणि ग्रंथाचा खजिना रविवारपासून (आज) विज्ञानप्रेमींसाठी खुला होणार आहे.

बाबासाहेबांनी दलितांमध्ये स्वाभिमान जागृत केला

$
0
0
‘जात, वर्ण आणि वर्गापलीकडे जाऊन समाजाची घडी बसविणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजातील लोकांना स्वाभिमानाने जगण्याचा धडा दिला,’ असे मत केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी शनिवारी व्यक्त केले.

उरळी कचरा डेपोची आग कायम

$
0
0
उरळी देवाची कचरा डेपोला लागलेली आग आठ दिवस होत आले, तरी विझत नसल्याने येत्या सोमवारपासून संपूर्ण शहराला कचऱ्याची समस्या भेडसावणार आहे. गेल्या रविवारी दुपारी कचरा डेपोमध्ये आग लागली आहे.

वीजबिल दुरुस्ती २४ तासांत

$
0
0
वीजबिलांची दुरूस्ती-२४ तास..., बिघाड दुरूस्ती-तीन तास...आणि नवे कनेक्शन- एका महिन्यात.....! राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणसाठी नवी कृती मानके (स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स) तयार केली आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images