Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

गरिबांना नाकारणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई

$
0
0
राज्य सरकारकडून विविध सोयीसुविधा पदरात पाडूनही गरिबांना सवलतीत उपचार न देणाऱ्या पुण्यातील धर्मादाय हॉस्पिटलवर कारवाई करण्याचा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी शनिवारी दिला.

शो-रुमच्या झगमगाटामागे पुस्तके हरविली...

$
0
0
शहरातील एखादा भाग पुस्तकांसाठी, एखादा भाग हार्डवेअरसाठी, तर एखादा भाग खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असणारच; पण पुस्तकांच्या दुकानांची जुनी ओळख पुसून नव्या युगाच्या लाइफस्टाइलचा ‘लूक’ फर्ग्युसन कॉलेज रोडने घेतला आहे.

‘बंद’च्या घोषणेने ग्राहकांची पुन्हा धावपळ

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) विरोधात व्यापाऱ्यांनी पुन्हा ‘बंद’चा पवित्रा घेतल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सामान्यांची धावपळ सुरू झाली आहे. हॉटेल्स, कँटीन, मेसचालकांकडूनही जिन्नसांना मोठी मागणी असल्याने ग्राहक ‘वेटिंग लिस्ट’मध्ये आहेत.

विद्यापीठात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

$
0
0
लॉच्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेला होणाऱ्या विलंबाच्या निषेधार्थ मनोज माने या तरुणाने शनिवारी सकाळी पुणे विद्यापीठात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रातील प्राथमिक उपचारांनंतर त्याची प्रकृती स्थिर झाली आहे.

पाषाणमध्ये तणाव

$
0
0
चुलतभावांकडूनच प्रतीक रामचंद्र निम्हण या १९ वर्षांच्या तरुणाची शुक्रवारी पाषाणमध्ये हत्या झाल्यानंतर या परिसरात तणावाचे वातावरण होते. या प्रकरणी तक्रार दाखल करणारा तरुण कीर्ती काळे याच्या काळे हाइट्स येथील राहत्या घराखाली प्रतीक निम्हण त्याच्या तीन मित्रांशी शुक्रवारी रात्री गप्पा मारीत बसला होता.

राजकीय पूर्ववैमनस्यातून खून

$
0
0
राजकीय वैमनस्यातून पाषाणमध्ये प्रतीक रामचंद्र निम्हण या १९ वर्षाच्या तरूणाची त्याच्याच चुलतभावांनी शुक्रवारी रात्री गोळ्या घालून खून केला. माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांच्या चेतन व तुषार या दोन मुलांसह नऊ जणांवर खूनप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकीय वादांचा बळी

$
0
0
मागील वर्षी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचे पडसाद अजूनही पाषाण परिसरात उमटत आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर या परिसरातील राजकीय वाद धुमसू लागले आहेत. त्यातूनच शुक्रवारी रात्री प्रतीक निम्हण या तरुणाचा बळी घेण्यात आला.

लक्ष्मण मानेंचा आरोप खोटा!

$
0
0
लक्ष्मण माने यांनी आपल्यावर केलेला आरोप धादांत खोटा, बिनबुडाचा असल्याचे प्रा. हरी नरके यांनी म्हटले आहे. स्वतःवर दाखल झालेल्या गंभीर गुन्ह्यांवरून लोकांचे दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी हा आरोप केल्याचे प्रत्युत्तर नरके यांनी दिले आहे.

वादळी पावसाचे राज्यात ४ बळी

$
0
0
शनिवारी मराठवाडा व विदर्भासह सोलापूर जिल्ह्यात वादळी पावसाने हजेरी लावली. नागपूर व बीड जिल्ह्यांत झालेल्या वादळी पावसात चार जणांचा मृत्यू झाला.

झेंडूच्या सदोष रोपांप्रकरणी कंपन्यांना लाखाचा दंड

$
0
0
धायरी येथील शेतकऱ्याला झेंडूची सदोष रोपे दिल्याप्रकरणी सिजेंटा इंडिया लिमिटेड आणि स्विफ्ट अॅग्रो केमिकल्स अॅन्ड न्युट्रियंट्स लिमिटेड या कंपन्यांना एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश पुणे जिल्हा ग्राहक न्याय मंचाने दिला आहे.

पाण्याच्या टँकरची दरवाढ मागे घ्या

$
0
0
पाणी टँकरसाठी महापालिकेने जाहीर केलेले दर सर्वसामान्यांना परवडणारे नाही. हे दर तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. पालिकेने अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी जुन्या कॅनॉलद्वारे शेतीसाठी सोडावे, अशी मागणीही पालिका आयुक्त महेश पाठक यांच्याकडे केली.

एसटी कामगारांना १३ टक्के पगारवाढ

$
0
0
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कामगारांना यंदा १३ टक्के पगारवाढ देण्याच्या निर्णयावर शुक्रवारी शिक्कामोर्तब झाले. मार्चअखेरच्या मूळ वेतनातच ही वाढ दिली जाणार आहे. एसटी कामगारांच्या वेतनाबाबत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली.

अनधिकृत बांधकामांवर महर्षीनगरमध्ये कारवाई

$
0
0
बांधकाम नियंत्रण विभागाच्यावतीने महर्षीनगर येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई झाली. यावेळी संबंधितांकडून विरोध करण्यात आल्याने पोलिस बंदोबस्तात कारवाई पूर्ण करण्यात आली.

‘रामबाण’ औषधे देऊन गंडा

$
0
0
डायबेटिस, अर्धांगवायू, हृदयरोग, लठ्ठपणासारखे दुर्धर आजार आयुर्वेदिक औषधांच्या रामबाण मात्रेने बरा करण्याच्या नावाखाली काही ‘बोगस’ डॉक्टरांनी नागरिकांकडून लाखो रुपयांची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

भूमी अभिलेख विभागाला २५ कोटी रुपयांचा निधी

$
0
0
जमिनीची मोजणी कर‌ताना येणाऱ्या अडचणी दूर करून अचूक जमीन मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाला आवश्यक असलेली पन्नास टक्के इलेक्ट्रॉनिक्स टोटल स्टेशन (ईटीएस मश‌िन) मिळणार असल्याचे जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सांगितले.

सामाजिक संवेदनेद्वारे महामानवाला अभिवादन

$
0
0
दुष्काळग्रस्त गावांतील लोकांना मदतनिधी, गरिबांना फळांचे वाटप, मिरवणुका अशा विविध उपक्रमांद्वारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

पुस्तकांची मेजवानी अन् साहित्यिकांचा मेळा

$
0
0
विविध विषयांवरील पुस्तके आणि काव्यसंग्रह शहरात नुकतेच प्रकाशित झाले. त्याचबरोबर साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ योगदान दिलेल्या ज्येष्ठ साहित्यिकांचा गौरवही करण्यात आला.

हास्याच्या साखरगाठींत सोहळा गोड झाला

$
0
0
‘द. मा. मिरासदार व त्यांच्या पिढीतील इतर विनोदी साहित्यिकांनी महाराष्ट्राला नेहमी खळखळून हसविले. मात्र, त्यांच्यानंतर सध्या कोणत्याही विनोदी साहित्यिकाचे नाव समोर येत नाही. ही दरी खूप मोठी आहे,’ अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रविवारी व्यक्त केली.

तमाशा पंढरीत झाली २ कोटींची उलाढाल

$
0
0
तमाशा पंढरी समजल्या जाणाऱ्या नारायणगावात यात्रोत्सवांच्या शुभारंभाच्या सुपाऱ्यांची जवळपास दोन कोटींची उलाढाल झाली. दुष्काळामुळे यंदा तमाशांची मागणी कमी झाल्याचे दिसून येत आहे.

वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू

$
0
0
पुरंदर येथील वाघ डोंगर परिसरात एका चिंकारा जातीच्या हरिणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने प्राण्याचा जागीच मृत्यू झाला. सासवडचा हा भाग वन विभागाच्या ताब्यात असून, येथे रोज पाण्याच्या शोधार्थ हरणांचे कळप येत असतात.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images