Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे रविवारपासून चित्रपट महोत्सव

$
0
0
राजा परांजपे प्रतिष्ठानतर्फे १४ ते २० एप्रिल दरम्यान चौथ्या राजा परांजपे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवादरम्यान परांजपे यांच्या चित्रपटांसह विविध सांगीतिक कार्यक्रमांचा आस्वाद पुणेकरांना घेता येणार आहे.

खर्च नको, साधेपणा हवा

$
0
0
‘साधेपणा हे वाङ्मयीन व्यवहाराचे व्यवच्छेदक लक्षण आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून केवळ भपकाच्या आहारी चाललो आहोत. त्यामुळे, संमेलनावर खर्च करण्यापेक्षा साधेपणा जपा’, असा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष प्रा. रा. ग. जाधव यांनी गुरुवारी दिला.

माईर्स एमआयटीने अनुभवली 'लता'मय सायंका‍ळ

$
0
0
'ओम नमोजी आद्या...' या स्वरांसह गायत्री मंत्राचा घोष गुरुवारी घुमला अन् विश्व शांती संगीत कला अकादमीच्या वास्तूत उद्घाटनाची सायंकाळ ‘लता’मय झाली. माईर्स एमआयटीच्या लोणी येथील अकादमीचे उद्घाटन लतादिदींच्या हस्ते रुद्रवीणेची तार छेडून करण्यात आले.

कम्प्युटर वापराचे 'मराठीकरण' हवे

$
0
0
भारतात कम्प्युटरचा सर्वाधिक वापर इंग्रजी भाषेमध्ये आहे. देशातील लोकांसाठी भारतीय भाषांमध्ये त्याचा वापर करता यावा यासाठी सीडॅक सारख्या संस्थांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

सोशॉलॉजीची अॅन्सरकी चुकली?

$
0
0
पुणे विद्यापीठाने नुकतीच जाहीर केलेली सोशॉलॉजी विषयासाठीची सेट परीक्षेची अॅन्सरकी पूर्णपणे चुकीची असल्याची तक्रार ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांनी बुधवारी केली. उमेदवारांनी त्याविषयीचे निवेदन विद्यापीठाच्या सेट विभागाकडे सादर केले.

खबरदार जर भुरटेगिरी करुनि...

$
0
0
परिसरात वाढलेल्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी 'बी द चेंज'चा नारा देऊन लोकमान्यनगरमधील नागरिकांनी पुढाकार घेत 'सीसीटीव्ही' बसविले. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या नागरी पुढाकाराच्या आदर्शनाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

मुहूर्त पाडवा, नाही खरेदी तोटा

$
0
0
सोने, फोर व्हीलर, टू-व्हीलर, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स... पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीचा उत्सव साजरा करीत उत्साही पुणेकरांमुळे गुरुवारी बाजारपेठ फुलली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफरच्या रूपाने बाजारपेठ सज्ज झाली होती.

'एमए'ला आता मिळणार 'क्रेडिट'

$
0
0
कॉलेज केंद्रांवरील पदव्युत्तर वर्गांमध्ये क्रेडिट सिस्टिमच्या अंमलबजावणीसाठी एमए भाग १ चे अभ्यासक्रम आता तयार झाले आहेत. या अभ्यासक्रमांना लवकरच विद्यापीठाच्या अॅकेडेमिक कौन्सिलची मान्यता मिळणार असून, त्या माध्यमातून क्रेडिट सिस्टिमच्या आधारे विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाला सुरुवात होणार आहे.

फौजदारासह पाच पोलिस निलंबित

$
0
0
रक्तचंदनाचे साठा केल्याच्या प्रकरणी, तसेच ‘इस्पात’ कंपनीवर दरोडा पडत असताना दरोडेखोऱ्यांशी संपर्क साधल्याच्या प्रकरणी पुणे ग्रामीणच्या फौजदारासह पाच पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या दोन प्रकरणांबाबत आलेल्या अहवालांनंतर पोलिस अधीक्षक मनोज लोहिया यांनी सोमवारी ही कारवाई केली.

अजितदादा निर्लज्जं सदा सुखी

$
0
0
वारंवार मागणी करुनही उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देणारे अजित पवार म्हणजे 'निर्लज्जं सदा सुखी' आहेत, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. जाणते राजे शरद पवार आणि मुख्यमंत्री हेच पवार यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेतील, अशी मला आशा असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.

LBTचा 'लाख'मोलाचा तिढा सुटला

$
0
0
स्थानिक स्वराज्य संस्था करासाठी (एलबीटी) नोंदणीची एक लाख रुपयांची किमान मर्यादा वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी दिली. या निर्णयाने ७० ते ८० टक्के छोट्या व्यापाऱ्यांनी ‘एलबीटी’च्या नोंदणीतून सुटका होणार आहे.

तरुणाचा खून करणाऱ्या सहा जणांना जन्मठेप

$
0
0
म्हशीचा धारा काढत असताना दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणांना हॉर्न वाजवू नका असे सांगणाऱ्या तरुणाचा खून केल्याप्रकरणी आणि एकाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी सहाजणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

‘सूर्यदत्ता’तर्फे रिक्षाचालकांना इंग्रजीचे प्रशिक्षण

$
0
0
रिक्षाचालकांना इंग्रजी भाषेचे आणि कॉम्प्युटरचे शिक्षण देण्यासाठी ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’तर्फे मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तीन बॅचमध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया यांनी सांगितले.

कॅन्सरवरील उपचारांसाठी बॉक्सिंगचा पंच!

$
0
0
इव्हेंट मॅनेजमेंटचे वेगवेगळे फंडे आणि त्याचे यशापयश आपण अनेकदा अनुभवले असेल. पण, मैत्रीचे नाते जपत, आपल्या मित्राच्या जीवावर बेतलेल्या प्रसंगातून त्याला बाहेर काढण्यासाठी एखादा इव्हेंट करायचा कोणी विचार करेल का? नाही ना.

सोनसाखळी चोरीचे १६ गुन्हे उघडकीस

$
0
0
पुणे गुन्हे शाखेच्या सोनसाखळी विरोधी पथकाने हडपसर, शिवाजीनगर, लोणी काळभोर, लोणावळा, मुंब्रा, निरा या ठिकाणी छापे घालत दहा सोनसाखळी चोरांना अटक केली असून, सोनसाखळी चोरीचे सोळा गुन्हे उघड झाले आहेत.

सामान गहाळ केल्याप्रकरणी दंड

$
0
0
पुण्याहून हैदराबादकडे पोहचविण्यासाठी ट्रान्सपोर्ट कंपनीला दिलेली मोटार सायकल आणि इतर घरगुती सामान कंपनीने गहाळ केल्याप्रकरणी जिल्हा ग्राहक मंचाने मोटारसायकलची किंमत व्याजासह तक्रारदाराला परत देण्याचा आदेश दिला आहे.

हेरिटेज’मध्ये हॉटेल अन् ‘सीआयडी’ही

$
0
0
पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंमध्ये (हेरिटेज) आता मंदिरे, लेण्यांबरोबरच पोलिस चौकी, हॉटेल्सचीही भर पडली असून ८५ ठिकाणांना महापालिकेने अधिकृतपणे ‘हेरिटेज’चा दर्जा दिला आहे.

तुळशीबागेत १० वर्षांच्या मुलीचा विनयभंग

$
0
0
तुळशीबागेतील सोनी फॅशन या कपड्याच्या दुकानात खरेदीसाठी गेलेल्या दहा वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार गुरुवारी घडला. मुलीशी असभ्य वर्तन करणाऱ्या कामगाराला विश्रामबाग पोलिसांनी पोलिसांनी अटक केली आहे.

फलटणच्या रेक्टरच्या चौकशीची मागणी

$
0
0
फलटण येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या रेक्टर मुलींना पोषण आहारापासून वंचित ठेवत असून या मुलींकडून श्रमाची कामे करवून अन्याय केला जात असल्याची तक्रार स्वतंत्र भारत पक्ष आणि शेतकरी संघटनेने केली आहे.

शहर व ग्रामीण भागांत रस्त्यांचे जाळे

$
0
0
शहर आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल साडेसहा कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून पोलिस आयुक्तालयाच्या कामावरही ७४ लाख रुपयांचे बजेट टाकण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images