Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

४१ कर्मचा-यांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह

$
0
0
पोलिस महासंचालकांकडून पोलिस खात्यातील प्रशंसनीय सेवेबद्दल, नक्षलग्रस्त भागातील सेवा; तसेच क्लिष्ट व थरारक गुन्ह्यांच्या तपासाबद्दल देण्यात येणारे सन्मानचिन्ह पुण्यातील ४१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाहीर झाले आहे.

प्राध्यापकांचा बहिष्कार कायम

$
0
0
प्राध्यापकांच्या मागण्यांसंदर्भात शासनाकडून घोषणा करण्यात येत असल्या, तरी त्याविषयी कोणतीही अधिकृत आणि लिखित माहिती प्राध्यापकांना देण्यात आलेली नाही.

ऑनलाइन परीक्षेच्या दर्जाबाबत शंका

$
0
0
‘ऑनलाइन परीक्षेतील प्रश्नांचा दर्जा, परीक्षेची गुणदान पद्धत आणि परीक्षेसाठीच्या पर्यवेक्षकांचा प्रश्न सोडविल्याशिवाय इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला ऑनलाइन परीक्षा पद्धत लागू करू नये,’ अशी मागणी पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी केली आहे.

स्वारगेट-पिंपरी मेट्रो एप्रिलमध्ये

$
0
0
स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या मेट्रोमार्गाच्या प्रस्तावाला या महिन्यातच राज्य मंत्रिमंडळाची मान्यता देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी दिले. पुढील महिन्यात हा प्रस्ताव केंद्राकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविण्याची हमीही त्यांनी दिली.

‘स्वाइन फ्लू’ने एकाचा मृत्यू

$
0
0
स्वाइन फ्लूच्या संसर्गाने लातूर येथील एकाचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये मंगळवारी मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या लाळेचा अहवाल बुधवारी प्राप्त झाल्याने त्यात त्यांना लागण झाल्याचे निदान झाले. प्रकाश इश्वरराव मल्हारी (वय ४५, रा. येन्की, ता. उदगीर, जि. लातूर) असे मृत्यू पावलेल्या पेशंटचे नाव आहे.

निगडीत ६४ किलो गांजा जप्त

$
0
0
निगडी जकात नाक्यासमोर गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. फॉर्च्युनर गाडीतून ६४ किलो गांजाची विक्री करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या छाप्यात उघड झाला आहे.

बेदरकार एसटी चालक माने दोषी

$
0
0
एसटीची बस पळवून पुण्यातील रस्त्यावर मृत्यूचे थैमान घालत नऊजणांचा बळी घेणारा ड्रायव्हर संतोष मारुती माने याला कोर्टाने बुधवारी दोषी ठरविले. खून, सदोष मनुष्यवध, खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरविणे हे त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप कोर्टाने ग्राह्य धरले. मानेच्या शिक्षेचा निर्णय सोमवारी जाहीर केला जाणार आहे.

काँग्रेसजनांचे ‘चलो मुंबई’

$
0
0
महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद दृष्टिपथात आल्यामुळे काँग्रेसजनांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. कायद्यानुसार काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनाच हे पद मिळणे आवश्यक असल्याने यामध्ये स्वतः लक्ष घालून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी दिले.

बनावटगिरीमुळे झाकोळले ‘सौंदर्य’

$
0
0
केस गळती थांबविण्यासाठीचे ‘लिव्होन हेअर गेन’ आणि सौंदर्य खुलविणाऱ्या ‘ओले क्रिम’सारख्या महागड्या सौंदर्यप्रसाधनाच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेत मूळ उत्पादनासारखेच कमी किमतीचे उत्पादन बाजारात आणून ग्राहकांच्या फसवणुकीचा प्रकार सुरू आहे.

स्नेहा सपकाळची ‘एनसीसी’तून सैन्यात निवड

$
0
0
पुण्याच्या स्नेहा बाळकृष्ण सपकाळची भारतीय सैन्य दलाच्या एनसीसी एंट्रीअंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी निवड झाली असून, ती अखिल भारतीय गुणवत्ता यादीत तिसरी आली आहे.

पाठ्यपुस्तकांचा दर्जा राखण्यासाठी नॅशनल टेक्सबुक कौंसिल?

$
0
0
शासकीय यंत्रणेबाहेरच्या शाळांसाठीची पाठ्यपुस्तके आणि त्याला पर्याय म्हणून उपलब्ध पुस्तकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘नॅशनल टेक्स्टबुक कौंसिल’ या यंत्रणेची निर्मिती लवकरच करण्यात येणार आहे.

फळबागांसाठी पहिला हप्ता लगेचच

$
0
0
राज्यातील भीषण पाणीटंचाई असलेल्या भागातील फळबागा वाचविण्यासाठी आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेलेल्या विशेष पॅकेजची चारशे कोटी रुपयांची रक्कम राज्याला मिळाली आहे.

वैद्यकीय उपचारांसाठी अर्थसाह्याचे आवाहन

$
0
0
डायबेटिस, किडनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या प्राजक्ता प्रमोद कुलकर्णी यांच्यावर उपचारासाठी दरमहा अठरा हजार रुपये खर्च येत आहे. आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने त्यांना उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.

दोन स्वतंत्र अपघातांमध्ये दोघे ठार

$
0
0
हडपसर येथे हॉटेल कावेरीसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी पहाटे अडीच्या सुमारास घडली तर हिंजवडी येथे दुचाकीस्वाराला ट्रकने चिरडल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला आहे.

‘शून्या’तून ‘निधी’ उभारण्याचा ‘बीएसएनएल’चा ‘उपक्रम’

$
0
0
सरासरी एक हजार रुपये बिल येणाऱ्या अमोल दाते यांना गेल्या महिन्यात तब्बल एक लाखाहून अधिक रुपयांचे बिल आले. वारंवार तक्रारी करूनही भारत संचार निगम लिमिटेडकडून (बीएसएनएल) त्यात सुधारणा करण्यात आली नाही.

एमपीएससी परीक्षेमुळे प्रशासन अडचणीत

$
0
0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलल्याने लाखो परीक्षार्थींनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, ही परीक्षा पुढे गेल्याने जिल्हा प्रशासनाची मात्र डोकेदुखी वाढली आहे.

पोलिस असल्याच्या बतावणीने महिलेची फसवणूक

$
0
0
पोलिस असल्याच्या बतावणीने एका महिलेचे ९० हजार रुपयांच्या दागिन्यांची फसवणूक केल्याचा प्रकार खराडी येथे झेन्सार कंपनीसमोर बुधवारी सकाळी घडला. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंपाना ‘एलबीटी ’ लावल्यास संप

$
0
0
कोणताही पेट्रोल पंप लोकल बॉडी टॅक्सअंतर्गत (एलबीटी) नोंदणी करणार नसल्याचा निर्णय पेट्रोल डीलर्स असोसिशनने घेतला आहे; तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात त्रास दिल्यास त्वरित संप पुकारला जाईल, असा इशारा असोसिएशनने दिला आहे.

सेट टॉप बॉक्सला मुदवाढ

$
0
0
शहरात असलेला सेट टॉप बॉक्सचा तुटवडा लक्षात घेऊन केबलग्राहकांना सेट टॉप बॉक्स बसविण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पंधरा एप्रिलपर्यंत केबलग्राहकांनी सेट टॉप बॉक्स बसवून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

रस्ते विकासाच्या खर्चाचे ‘उड्डाण’

$
0
0
स्वारगेट येथे उड्डाणपूल उभारण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) सादर केलेला प्रस्ताव पाहून महापालिकेचे प्रशासन हबकले आहे. महापालिकेने केलेल्या खर्चाच्या अंदाजाच्या तुलनेत एमएसआरडीसीचा प्रस्ताव प्रचंड महागडा ठरत आहे
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images