Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

साहित्य दिंडी पुन्हा पुण्यात?

$
0
0
साहित्य महामंडळ पुण्यात दाखल झाल्यावर होणारे पहिले साहित्य संमेलन हे पुण्याच्या पंचक्रोशीतच होण्याची चिन्हे आहेत. आगामी संमेलनासाठी पिंपरी-चिंचवड आणि सासवड येथून निमंत्रणे आली असल्याने चार वर्षांनी पुन्हा एकदा संमेलनाचा सोहळा अनुभवण्याची संधी पुणेकरांना जवळच्या टप्प्यात उपलब्ध होईल.

आयपीलच्या पार्कींगचे भाडे घेणार

$
0
0
गहुंजे येथील सुब्रोतो राय सहारा स्टेडियममधील आयपीएल क्रिकेट सामन्यांसाठी सरकारी गायरान जमिनीवर होणाऱ्या पार्कींगची भाडेआकारणी करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे.

इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

$
0
0
‘इन्फोसिस’ कंपनीमध्ये फायनान्स विभागात काम करणाऱ्या एका तरुणाने गुरुवारी रात्री डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. विवेक लक्ष्मीनारायण पोतदार (वय २९) असे या तरुणाचे नाव आहे.

परीक्षा पुढे गेली.... समस्या सुटली

$
0
0
‘परीक्षा पुढे गेल्याने आमच्या वेदनेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न आयोगाने केला आहे. आयोगाने आपली कार्यक्षमता वाढविली तर वारंवार घडणाऱ्या अशा घटना टाळता येणे शक्य आहे...’,

अनधिकृत बांधकामांना पिंपरीत सुविधा बंद

$
0
0
अनधिकृत बांधकामांना यापुढील काळात पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते याप्रकारच्या सुविधा न देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी शुक्रवारी (पाच एप्रिल) जाहीर केला. त्यामुळे मार्च २०१२ नंतरच्या अनधिकृत बांधकामांना आळा बसेल, असा दावा करण्यात येत आहे.

चालताय... ? टेन्शन खल्लास...!

$
0
0
रोजच्या धावपळीच्या जगण्यात विविध कामांचे ‘प्रेशर’ आणि ‘डेडलाइन’ पाळण्याच्या घाईमुळे मानसिक ताण वाढून ‘बीपी’ला आमंत्रण मिळते. परंतु, त्याला नियंत्रित करण्यासाठी एकाही रुपयाचा खर्च न करता रोज एक तास चालत राहण्याचा स्वस्तातील उपाय वैद्यकतज्ज्ञांनी दिला आहे.

वाड्यांतील रहिवाशांचे घरांचे स्वप्न राहणार अधुरे

$
0
0
शहरातील वाड्यांच्या जागेवर इमारती उभ्या करण्याच्या बदल्यात आतापर्यंत दोन एफएसआय देण्यात येत होता. मात्र, जुन्या शहराच्या विकास आराखड्यात (डीपी) तो दीड एफएसआय करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामुळे वाड्यांतील रहिवाशांचे घरांचे स्वप्न अधुरे राहणार आहे.

बेमुदत बंदमुळे हॉस्पिटलचे कँटीन ‘अत्यवस्थ’

$
0
0
‘एलबीटी’च्या जाचक तरतुदींना विरोध करण्याच्या नावाखाली व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा फटका सर्वसामान्यांसह शहरातील हॉस्पिटलनाही बसत आहे. परिणामी हॉस्पिटलमधील पेशंटना वेळेवर देण्यात येणारा नाश्ता, दुपारच्या आणि संध्याकाळच्या जेवणावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

...सांगा, आम्ही पोट कसे भरायचे ?

$
0
0
दिवसभराच्या हमालीतून मिळणाऱ्या चार पैशातून संसाराचा गाडा ओढणाऱ्या हमालांची ‘ढकलगाडी’ आता व्यापाऱ्यांच्या बंदमुळे थांबली आहे. परिणामी, सलग पाच दिवस काम थांबल्याने हमालांच्या घरातील चूल बंद होण्याची वेळ आली आहे.

‘एलबीटी’चा वाद चिघळण्याची चिन्हे

$
0
0
सामान्य पुणेकरांचे अतोनात हाल होत असतानाही पाचव्या दिवशी दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सरकारच्या निर्णयात बदल होईपर्यंत आम्ही बंदबाबत ठाम असल्याचे त्यांनी जाहीर केले.

‘एलबीटी’ रद्द करून ‘व्हॅट’वर १ टक्का कर

$
0
0
‘लोकल बॉडी टॅक्स’ (एलबीटी) रद्द करून मूल्यवर्धित करावर (व्हॅट) एक टक्का जादा कर घ्यावा. त्यातून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेला वर्षाकाठी दोन हजार कोटी रुपयांचा कर मिळेल, असा पर्याय व्यापाऱ्यांनी मांडला.

पुणे ‘एटीएस’मधील पोलिस कर्मचा-याला अटक

$
0
0
दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे युिनटमध्ये नोकरीस असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पत्नीला माहेरकडून पैसे आणण्यासाठी त्रास देण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

फ्लेक्स काढून टाकण्याची मागणी

$
0
0
शहरातील फ्लेक्स हटवण्याबाबत हायकोर्टाने काढल्यानंतरही पुणे शहरातील होर्डिंगवरील फ्लेक्स काढण्यात आलेले नाहीत. हा कोर्टाचा अवमान असून असे फ्लेक्स त्वरित हटविण्यात आले नाहीत, तर आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडतर्फे देण्यात आला आहे.

चेटीचंड उत्सव येत्या गुरुवारी

$
0
0
सिंधी समाजाचे दैवत असलेल्या साई झुलेलाल यांच्या १०६२ व्या जयंतीनिमित्त सिंधू सेवा दलातर्फे येत्या गुरुवारी (११ एप्रिल) चेटीचंड उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

एप्रिलमध्ये सायकल खरेदीचे टेंडर

$
0
0
दरपत्रक व राज्य सरकारच्या समन्वयाअभावी गेल्या शैक्षणिक वर्षात सायकल मिळू न शकलेल्या विद्यार्थिनींना आता जूनमध्येच सायकल वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. राज्य सरकारच्या दरकराराची वाट न पाहता ही खरेदीची निविदा एप्रिलमध्येच मंजूर करण्यात येणार आहे.

पोलिसांना गृह सचिवांची तंबी

$
0
0
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये अनधिकृत बांधकामे आणि अपघातात वाढ होत आहे. महापालिका प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांनी हे प्रकार न रोखल्यास संबंिधतांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देत राज्याचे गृह सचिव अमिताभ राजन यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

विनयभंग प्रकरणी डॉक्टरवर गुन्हा

$
0
0
आईला उपचारास घेऊन गेलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी सिंहगड रोडवरील डॉक्टरवर दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी सिंहगड रोडवरील २७ वर्षीय तरुणीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पानशेत लवकरच ‘हॉट डेस्टिनेशन’

$
0
0
सिंहगडाबरोबरच पानशेत हे देखील पुणेकरांसाठी लवकरच सहलीसाठी ‘हॉट डेस्टिनेशन’ ठरणार आहे. केंद्र सरकारने पानशेतच्या विकासासाठी शुक्रवारी ३ कोटी ६० लाख रुपये मंजूर केले असून या निधीतून तेथे अॅक्वाटिक पार्क उभारण्यात येणार आहे.

मारणे-घायवळ टोळीत पुन्हा गँगवॉर

$
0
0
कुख्यात गुंड गजानन मारणे आणि नीलेश घायवळ यांच्या टोळ्या पुन्हा परस्परांशी भिडल्या असून, कोथरूड येथे हॉटेल सृष्टीसमोर किरकोळ वादातून मारणे टोळीतील गुडांनी घायवळ टोळीच्या गुंडाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी घडला.

‘बंद’विरोधात सरकार सरसावले

$
0
0
स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात व्यापारीवर्गाने पुकारलेल्या बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांचे होत असलेले हाल पाहून प्रशासन सरसावले आहे. जीवनावश्यक वस्तूंसह धान्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी शहरात अत्यावश्यक सेवा कायदा (इस्मा) लागू करण्याची तयारी राज्य सरकार करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images