Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पॅराग्लायडरना परवानगी आवश्यक

$
0
0
पुणे विमानतळ परिसरात डिसेंबर महिन्यात दोनदा पॅराग्लायडरच्या उड्डाणाचा प्रकार उघडकीस आला आहे. पुणे पोलिसांनी पॅराग्लायडरना आकाशात झेप घेण्यासाठी परवानगी बंधनकारक केली असून त्याबाबत सोमवारी आयुक्तालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बाबूराव चांदेरेंची मुले अखेर शरण

$
0
0
शिवाजीनगर कोर्टातील वकिलाला मारहाण करून पसार झालेली स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांची दोन्ही मुले आणि भाचे मंगळवारी दुपारी चतु:श्रृंगी पोलिसांपुढे शरण आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. एम. पिंगळे यांनी चौघाही आरोपींना पाच एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दीड हजार शाळांची मान्यता रद्द?

$
0
0
पटपडताळणीमध्ये दोषी आढळलेल्या राज्यभरातील १ हजार ४०४ शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांनी दिली. बंद होणाऱ्या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त होण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन सुरू झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सेट टॉप बॉक्सचा तुटवडा

$
0
0
दूरसंचार निगम प्राधिकरणाने (ट्राय) ने एक एप्रिलपासून अॅनालॉग सिग्नल पाठविणे बंद केल्याने शहरातील लाखो ग्राहकांची केबल सेवा बंद पडली आहे. ‌प्रक्षेपण सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या ‘सेट टॉप बॉक्स’चा तुटवडा असल्याने केबलचालकांबरोबरच ग्राहकांना देखील मनस्ताप सहन करावा लागत आहे.

राखीव पाणी १५ जुलैपर्यंतच

$
0
0
पुणेकरांना दरमहा सव्वा टीएमसी याप्रमाणे १५ जुलैपर्यंतचे पाणी खडकवासला धरणात राखीव ठेवण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. उन्हाळी पिके आणि पिण्यासाठी अनुक्रमे तीन आणि दोन टीएमसी अशी पाच टीएमसीची दोन आवर्तने कालव्यातून सोडण्यावर शिक्कामोर्तब झाले.

संतोष मानेवर हत्येचा गुन्हा

$
0
0
पुण्यात बेदरकारपणे बस चालवून नऊ जणांना चिरडणा-या एसटी चालक संतोष माने विरोधात हत्येचा गुन्हा सिद्ध झाला आहे. ही घटना घडली तेव्हा संतोष माने हा संपूर्ण भानावर होता, असे पुणे सेशन कोर्टाने सुनावणी दम्यामान म्हटले आहे.

मृत्यूचे थैमान घालणारा एसटीचालक संतोष माने दोषी

$
0
0
एसटीची बस पळवून पुण्यातील रस्त्यावर मृत्यूचे थैमान घालत नऊजणांचा बळी घेणारा ड्रायव्हर संतोष मारुती माने याला कोर्टाने बुधवारी दोषी ठरविले. खून, सदोष मनुष्यवध, खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरविणे हे त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप कोर्टाने ग्राह्य धरले. मानेच्या शिक्षेचा निर्णय सोमवारी जाहीर केला जाणार आहे.

वाहतूक पोलिस होणार ‘हायटेक’

$
0
0
शहरातील बेशिस्त वाहतुकीमध्ये शिस्तीचा सुपरफास्ट बदल घडविण्यासाठी वाहतूक पोलिस अत्याधुनिक साधनांसह सज्ज होत आहेत. त्यासाठी स्पीडगनपासून सर्व सुविधायुक्त ‘ट्रॅफिक मोबाइल व्हॅन’ खरेदीचा दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला देण्यात आला आहे.

प्रकल्पांच्या स्थगितीचा मुद्दा सरकारनेच खोडून काढला

$
0
0
सरकारी जागांवरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना स्थगिती असल्याचा ‘एसआरए’च्या प्रतिज्ञापत्रातील मुद्दा स्वतः राज्य सरकारनेच खोडून काढल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही परस्परविसंगत माहिती कोर्टापुढे कशी सादर झाली, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

बहुसंख्य ड्रायव्हर व्याधींच्या कचाट्यात

$
0
0
संतोष माने प्रकरणानंतर एसटी प्रशासनाने केलेल्या आरोग्य तपासणीत पुणे विभागातील स्वारगेट आणि शिवाजीनगर बसस्थानकांमध्ये ८९ ड्रायव्हरना ब्लडप्रेशर आणि डायबेटिस असल्याचे निष्पन्न झाले आहे.

समस्यांच्या ‘ट्रॅफिक’मध्ये कर्मचारी जाम

$
0
0
ड्युटीवर वेळेवर आलं तरी गाडी मिळत नाही, दुरुस्तीअभावी अनेक गाड्या बंद आहेत, गाडी उशिरा मिळाली की ड्युटी संपायला वेळ लागतो, अशा अनेक प्रश्नांचा तोंड देत आपल्याला रोजचा दिवस काढावा लागत आहे.

खडकी भागातील व्यवहार सुरळीत

$
0
0
एलबीटी रद्द करण्याच्या मागणीसाठी खडकी भागातील व्यापाऱ्यांनी एक एप्रिल रोजी एक दिवसाचा बंद पुकारला होता. गेले दोन दिवस येथील व्यवहार सुरळीत सुरू आहेत.

‘बंद’मुळे जेवण बेचव

$
0
0
व्यापा-यांच्या बंदमुळे घराघरातील किचनमधील घरगुती वस्तू संपल्याने स्वयंपाक करताना गृहिणींना आखडता हात घ्यावा लागत असून, विशेषत: तेल आणि मसाल्याचे पदार्थ संपल्याने ‘फोडणी’विनाच स्वयंपाक उरकावा लागत आहे.

पुणेकरांचे हाल सुरूच

$
0
0
‘लोकल बॉडी टॅक्स’विरोधातील (एलबीटी) आंदोलनाला पाठिंबा देऊन दोन दिवस बंदपासून लांब राहिलेल्या दुकानदारांना बुधवारी व्यवहार बंद ठेवण्यास भाग पाडण्यात आले. त्यामुळे बंदच्या तिसऱ्या दिवशीही शहरातील दुकाने कडकडीत बंद राहिली. त्यामुळे पुणेकरांचे हाल सुरूच आहेत.

जुनाट पंखे, कचरा, दुर्गंधी

$
0
0
तुटलेले लॉकर्स... खिळ‌खिळ्या पेट्या... जुनाट पंखे... कचरा... पान आणि तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या भिंती... शौचालयातील पाण्याची गळती... दुर्गंधी... आणि मिळेल तेवढ्या जागेत चार पाच तास विश्रांती घेणारे ड्रायव्हर आणि कंडक्टर...

उन्हाची काहिली वाढली

$
0
0
शहर आणि परिसरात दुपारी उन्हाची तीव्रता अंशतः वाढली असली, तरी कमाल तापमान ३६ अंशांच्या दरम्यान कायम आहे. राज्यात विशेषतः मराठवाड्यात उन्हाची काहिली वाढली असून, सर्वाधिक ४१.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद नांदेड येथे झाली आहे.

‘दाखल्यांचे अर्ज एका छत्राखालीच घ्या’

$
0
0
मुलांना आवश्यक असलेले दाखले शाळेतच देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांचे अर्ज स्विकारण्यात यावेत, अशी मागणी पालकांच्या वतीने करण्यात आली आहे.

भांडार विभागावर कॅमे-यांची करडी नजर

$
0
0
महापालिकेमध्ये घडलेल्या बकेट घोटाळ्यानंतर नायडू हॉस्पिटलजवळील भांडार विभागावर कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे. विशेष म्हणजे या विभागात होणारे संभाषणही कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड होणार आहे.

वेबसाइट क्रॅश आणि उमेदवार हँग!

$
0
0
‘आम्ही आता परीक्षेसाठीची उजळणी करायची, की फॉर्म भरायला तास-तास सायबर कॅफेवर घालवायचे हेच समजेनासं झालं आहे...सायबर कॅफे रात्री बंद असतात, म्हणून आम्ही मित्रांनी मिळून डोंगल आणलं आणि लॅपटॉपवरून फॉर्म भरायला सुरुवात केली.

व्यापा-यांचा बंद सुरूच

$
0
0
स्थानिक कराबाबत (एलबीटी) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि व्यापाऱ्यांमधील चर्चा निष्फळ ठरली असून, व्यापाऱ्यांचा बेमुदत बंद आज चौथ्या दिवशीही सुरूच राहणार आहे. मात्र, संबंधित अधिकारी ‘एलबीटी’तील अटी समजून घेणार असून, त्यानंतर शुक्र्रवारपर्यंत लेखी आदेश देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images