Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतरच तोडगा?

$
0
0
‘एलबीटी’ला कडाडून विरोध करीत पुण्यातील व्यापाऱ्यांनी सोमवारी पाळलेला कडकडीत बंद आणि त्यांना इतर संस्था-संघटनांकडून मिळणाऱ्या प्रतिसादानंतर आता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे.

चला, थोडेसे चालूया...

$
0
0
प्रत्येक नागरिकाला चालण्याचा संदेश देण्यासाठी येत्या सात एप्रिलला जागतिक आरोग्य दिनानिमित्त डॉक्टरांनी ‘पुणे वॉकेथॉन’ हा उपक्रम हाती घेतला आहे. सात एप्रिलपासून ‘पुणेकरांनो चला, थोडेसे दररोज एक तास चालत जाऊ या...’ असा संकल्प ‘पुणे डॉक्टर्स चॅरिटेबल ट्रस्ट’ करणार आहे.

चिऊताईची ‘प्रॉपर्टी’ मुंबई-पुण्यातच...

$
0
0
महाराष्ट्रातील चिमण्यांची संख्या वेगाने घटत असताना मुंबईत राज्यातील सर्वाधिक चिमण्या वास्तव्यास आढळत असल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. दुसऱ्या क्रमांकावर पुणे शहर आहे.

‘एसटीआय’च्या प्रतीक्षा यादीची मागणी

$
0
0
राज्य लोकसेवा आयोगाने नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या विक्रीकर निरीक्षक (एसटीआय) मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याबरोबरच परीक्षेची प्रतिक्षा यादीही (वेटिंग लिस्ट) त्वरीत जाहीर करण्याची मागणी उमेदवारांनी लोकसेवा आयोगाकडे केली आहे.

‘OBC’ अधिका-यांच्या पाल्यांना ‘नॉन क्रिमीलेअर’ सहज उपलब्ध

$
0
0
इतर मागासवर्ग (ओबीसी) गटात असलेल्या पालकांपैकी कोणीही एक किंवा दोघेही सरकारी नोकरीत असल्यास त्यांचे वेतन व शेतीचे उत्पन्न वगळून इतर मार्गाने मिळणारे उत्पन्न हे साडेचार लाखांपेक्षा कमी असेल, तर त्यांच्या पाल्यांना ‘नॉन क्रिमीलेअर’चे प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तक्रार निवारणासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज

$
0
0
शिक्षण हक्क कायद्यासंदर्भातील (आरटीई) तक्रार निवारणासाठी शहर, तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर स्वतंत्र अधिकृत यंत्रणेची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी ‘बालहक्क कृती समिती’तर्फे करण्यात आली आहे.

शिक्षण विभागाचा दावा चुकीचा, कार्यकर्त्यांचा म्हणणे

$
0
0
शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगली कामगिरी झाल्याचा डंका शिक्षण विभागाकडून सध्या वाजवला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात या अंमलबजावणीचे तीन-तेरा वाजल्याची टीका संबंधित कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

इंजिनीअरिंग निकालाच्या घोळावरून आता कोर्टबाजी

$
0
0
इंजिनीअरिंग पुनर्मूल्यांकनाचा घोळ सोडविण्यासाठी पुणे विद्यापीठाने नेमलेल्या अडसूळ समितीने ‘नो चेंज’ म्हणून सांगितलेला निकाल विद्यापीठाने बदलला. परिणामी, इंजिनीअरिंग निकालाविषयीच्या परीक्षा विभागाच्या गोंधळात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे.

बाबा बोडकेसह पाच जण निर्दोष

$
0
0
कुख्यात गुन्हेगार आणि अरुण गवळी टोळीतील पुण्यातील भाई प्रदीप सोनवणे खून प्रकरणात बाबा बोडकेसह पाचजणांची सबळ पुराव्याअभावी कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांच्या कोर्टाने हा निकाल दिला.

विद्यार्थी मिळविण्यासाठी ब्रिटनची एक्स्चेंज ऑफर

$
0
0
शिक्षणानंतर नोकरीसाठी थांबण्याची मुभा बंद केल्याने ‘यूके’मध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचा प्रवाह आटला आहे. त्याचा आणि आर्थिक मंदीचा बसत असलेला दुहेरी फटका कमी करण्यासाठी ‘यूके’तील शैक्षणिक संस्था आता भारतातील संस्थांशी सहकार्य करार करून ‘स्टुडंट्स एक्स्चेंज’च्या मार्गाने विद्यार्थी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘कॅप’मुळे पेपर तपासणी वेळेत?

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षांच्या यशस्वी आयोजनापाठोपाठ आता विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने पेपर तपासणीच्या कामांसाठी कंबर कसली आहे. त्यासाठी आवश्यक ‘सेंट्रलाईज्ड असेसमेंट प्रोग्राम’ अर्थात ‘कॅप’च्या यशस्वी आयोजनासाठीचे सर्व नियोजन विभागाने पूर्ण केले आहे.

निवडणूक निकालावरून राडा

$
0
0
पंचायत निवडणूक निकालावरून वेल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान, या घटनेची फिर्याद देण्यासाठी पोलिस दूरक्षेत्रात गेलेल्या कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करून सरकारी वाहनांची तोडफोड केली.

वाळूमाफियांची अकरा वाहने जप्त

$
0
0
साकोरी येथे कुकडी नदीच्या पात्रात बेकायदा वाळूउत्खनन प्रकरणी जुन्नरचे तहसीलदार दिगंबर रौंधळ यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने केलेल्या कारवाईत पोकलेन, जेसीबी, ट्रक, ट्रॅक्टर अशी दोन कोटी रुपये किमतीची अकरा वाहने जप्त करण्यात आली.

गुंगीचे औषध देऊन बलात्कार

$
0
0
थंड पेयातून गुंगीचे औषध देऊन युवतीवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. सुनिता परशुराम जोशी असे गुन्हा दाखल केलेल्या महिलेचे नाव आहे.

ओढणी ठरली जीवघेणी

$
0
0
दुचाकीवरील महिलेची ओढणी शेजारील दुचाकीच्या आरशाला अडकून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली. आगाखान पॅलेससमोर झालेल्या या अपघातात महिलेच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारी घडला.

बैठक न घेताच केला ‘कालवा’

$
0
0
पुणेकर ५० टक्के पाणीकपात सहन करत असताना पाटबंधारे खात्याने कालवा समितीची बैठक न घेताच उसासाठी उन्हाळी आवर्तन सुरू करून याबाबतची मानके धाब्यावर बसवली आहेत.

प्राध्यापकांना थकबाकी मिळणार?

$
0
0
सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी देणे असलेल्या रकमेसाठी गेल्या दोन महिन्यांपासून संपावर असलेल्या प्राध्यापकांना अपेक्षित घोषणा होण्याची चिन्हे आहेत. फरकाच्या पंधराशे कोटींपैकी राज्य सरकारच्या वीस टक्के वाट्याबाबत मंगळवारी विधिमंडळात घोषणा करणार असल्याचे उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी ‘मटा’ला सांगितले.

मतदार फोटो ओळखपत्रांसाठी मदत केंद्रांची स्थापना

$
0
0
मतदार यादीत नाव आहे, मात्र ओळखपत्रात फोटो नाही, अशा नागरिकांना फोटो ओळखपत्र देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदार मदत केंद्रे (व्होटर हेल्प सेंटर) सुरू केली आहेत. शहरासह जिल्ह्यात २८ ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात आली असून ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये नाहीत, अशाच मतदारांचे फोटो या केंद्रांमध्ये काढले जाणार आहेत.

'त्यानेच' केला बलात्कार अन् खून

$
0
0
नयना पुजारी खूनप्रकरणातील आरोपी विश्वास कदमने नयना पुजारी हिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्यानंतर खून केल्याची माहिती आपल्याला फोनवरून दिल्याची साक्ष आरोपींच्या एका मित्राने मंगळवारी कोर्टात दिली.

एक्स्प्रेस वेला ब्रायफेन रोपचे कवच

$
0
0
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाहनांच्या अतिवेगामुळे दुभाजक ओलांडून व तोडून जीवघेणे भीषण अपघात होतात. अशा अपघातांना लगाम घालण्यासाठी रस्ते विकास महामंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या पवना चौकी ते ओझर्डे दरम्यानच्या पहिल्या टप्प्यातील ब्रायफेन वायर रोप क्रॅश बॅरियरचे काम पूर्ण झाले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images