Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पीडित महिलांची मानसिकता समाजाने समजावून घ्यावी

$
0
0
‘दिल्लीतील बलात्कारानंतर अशा घटना रोखणारा कायदा केला. त्यातून पीडित महिलेच्या शारीरिक स्थितीचा विचार झाला. परंतु, त्या काळातील तिच्या मानसिकतेचा विचार कोठेच करण्यात आला नाही.

ई-गव्हर्नन्समध्येही ‘श्रीमंत’

$
0
0
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ई-गव्हर्नन्स प्रोजेक्टचे देशपातळीवर कौतुक झाले आहे. या पालिकेचा आदर्श नजरेसमोर ठेवून अन्य महापालिकांनी अनुकरण करावे, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. त्या अनुषंगाने ई-गव्हर्नन्सच्या बाबतीत युवादिल ठरलेल्या या पालिकेचा व्यवस्थेचा हा आढावा…

प्लीज एंटर... ऑनलाइन

$
0
0
ऑनलाइन व्यवहारांमुळे सर्वांचीच सोय होत असली, तरी एखादी व्यवस्था ऑनलाइन केली म्हणजे आता सगळ्या गोष्टी सुरळीतच होणार, असा समज नेहमीच गैरसमज ठरतो. परंतु, त्याकडे योग्य लक्ष दिले गेल्यास या व्यवस्थेने ग्राहकांचाच नाही, तर सरकारी व्यवस्थेचाही फायदाच होणार आहे.

ऑनलाइन ...नॉट फाउंड

$
0
0
ऑनलाइन व्यवस्था स्वीकारली, तर फायदे होतातच; पण त्यातील दोष दूर करण्यापूर्वी ती राबविण्याचा अट्टाहास झाला, तर ‘एंड युजर’चा होतो फुटबॉल. म्हणून, ऑनलाइनच्या अंमलबजावणीपूर्वी काही पथ्ये पाळायलाच हवीत....

कार, खासगी जीपना टोलमाफी शक्य

$
0
0
रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीच्या एकूण खर्चापेक्षा कित्येक पटीने टोल वसुली होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर आता ‘व्हीव्हीआयपी’ कोट्यातील सवलतीच्या बहाण्यानेही सर्वसामान्यांकडून टोलची लूट केली जात आहे.

आजचा दिवस... बदलांचा!

$
0
0
एरवी केवळ नवीन आर्थिक वर्षात पदार्पण करणारा एक एप्रिल यंदा भलताच ‘हॅपनिंग’ ठरतो आहे. यंदाचा ‘एप्रिल फुल्ल’ केवळ व्यापाऱ्यांची रोजनिशीच नव्हे, तर पुणेकरांच्या दैनंदिन जीवनातही बदल घडविणारा ठरणार आहे.

शहरातील जकात होणार इतिहासजमा

$
0
0
महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेली जकात अखेर आजपासून इतिहासजमा होत आहे. मात्र, पुण्यासह राज्यातील बहुतांश शहरांमधून अस्तंगत होत असलेल्या जकातीला ऐतिहासिक महत्व आहे.

हक्काच्या शिक्षणाच्या अटी अद्याप कागदावरच

$
0
0
‘शिक्षण हक्क कायद्यां’तर्गत विविध अटींची पूर्तता करण्यासाठी शासनाने शिक्षण संस्था आणि संस्थाचालकांना दिलेली मुदत रविवारी संपली. मात्र, त्यानंतरही राज्यातील अनेक शाळा या अटींची पूर्तता करण्यात अपयशीच ठरल्याचे ‘प्रथम’ने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे.

‘एलबीटी’ नोंदणीत पुणे आघाडीवर

$
0
0
‘लोकल बॉडी टॅक्स’च्या (एलबीटी) नोंदणीमध्ये पुण्याने राज्यात आघाडी घेतली आहे. व्हॅटअंतर्गत नोंदणी झालेल्यांसह (डीम्ड रजिस्टर्ड) ६१ हजार व्यावसायिकांना आज (सोमवारी) प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे.

खडकीत जूनपासून ‘एलबीटी’

$
0
0
पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या धर्तीवर खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीतसुद्धा एलबीटी लागू करण्याचा निर्णय शनिवारी (३० मार्च) झालेल्या बोर्डाच्या विशेष बैठकीमध्ये घेण्यात आला.

एका फॉर्मवर अॅडमिशन फत्ते

$
0
0
वेगवेगळ्या कॉलेजांचे अर्ज आणा... प्रत्येक ठिकाणी हेलपाटे मारा... लिस्टमध्ये नाव लागतंय की नाही, यासाठी ताटकळत थांबा... या सर्वांना छेद देणारी अकरावी अॅडमिशनची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया म्हणजे ‘ऑनलाइन’ व्यवस्थेची उत्तम रिझल्टसह पास झालेली टेस्ट आहे.

२० टक्के केबलग्राहक वा-यावर

$
0
0
सेट टॉप बॉक्स बसविण्यासाठी केंद्र सरकारने कोणतीही मुदतवाढ न दिल्याने सोमवारपासून (१ एप्रिल) केबलसेवा बंद पडणार आहे. यामुळे राज्यातील पाच शहरांतील २० ते २२ टक्के, तर पुण्यातील पंधरा ते वीस टक्के केबल ग्राहक टीव्हीच्या आनंदाला मुकणार आहेत.

PSI वर दरोडेखोरांचा खुनी हल्ला

$
0
0
अकोले येथे सराफी पेढीवर दरोड्याच्या प्रयत्नात गोळीबार करून पळणाऱ्या दरोडेखोरांच्या शोधासाठी ओतूर परिसरात नाकेबंदी करणाऱ्या पोलिसांवर दरोडेखोरांनी खुनीहल्ला केला. त्यात ओतूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास चिकाटे गंभीर जखमी झाले.

साहित्य कारभार आता शहरातून

$
0
0
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय सोमवारपासून (१ एप्रिल) पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेत स्थलांतरित होत आहे. परिषदेच्या वास्तूतच महामंडळाचे कामकाज होणार असले, तरी पदाधिकाऱ्यांसाठी येत्या आठवडाभरात स्वतंत्र व्यवस्था कार्यान्वित झाल्यावरच महामंडळाच्या कारभाराला गती प्राप्त होऊ शकणार आहे.

एलबीटीविरुद्ध आजपासून तीव्र लढा

$
0
0
‘लोकल बॉडी टॅक्स’विरोधात (एलबीटी) व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे आजपासून (सोमवारी) शहरातील व्यवहार थंडावण्याची चिन्हे आहेत. भरीस भर म्हणून पेट्रोलपंपचालकांच्या लाक्षणिक बंदचाही परिणाम होण्याची शक्यता आहे.

पुणेकरांसाठी आज 'सोनियाचा दिनु'

$
0
0
सोन्याचांदीवरील जकातीच्या तुलनेत ‘एलबीटी’चे दर प्रचंड कमी झाल्यामुळे पुणेकरांसाठी सोने तोळ्यामागे साडेसातशे रुपये, तर चांदी प्रतिकिलो दीड हजार रुपयांनी स्वस्त होणार आहे.

पाडव्याला आंबा ‘उतरणार’

$
0
0
अवेळी पाऊस आणि खराब हवामानामुळे फळांचा राजा रूसण्याचा अंदाज असताना आतापासूनच तो बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागला आहे. परिणामी, त्याचा ‘भाव’ही उतरला असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांना स्वस्तात त्याची चव चाखता येणार आहे.

आजही बाजारपेठ बंद

$
0
0
लोकल बॉडी टॅक्सच्या (एलबीटी) विरोधात व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत बंदमुळे शहरातील बाजारपेठा सोमवारी पूर्णतः बंद होत्या. नवीन आर्थिक वर्षाच्या आणि आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार राहिल्याने पुणेकरांचे हाल झाले.

पिंपरी- चिंचवडमध्येही ‘LBT’चे दर जाहीर

$
0
0
स्थानिक संस्था करासाठीच्या (एलबीटी) वस्तूंची यादी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सोमवारी जाहीर केली. त्यानुसार अंमलबजावणीला प्रारंभ केला आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी आणि एलबीटीचे प्रमुख अशोक मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जकात नाके पडले सुनेसुने...

$
0
0
तब्बल दीडशे वर्षांनंतर शहरातील हजारो व्यापारी-वाहतूकदार आणि महापालिकेनेही जकातीशिवाय पहिला दिवस अनुभवला. जकात रद्द झाल्यामुळे शहरातील सुमारे पन्नास जकातनाक्यांवर वाहनांच्या रांगांचे चित्र पाहायला मिळाले नाही.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>