Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

क्रीडा पुरस्कारांना गालबोट

$
0
0
पुणे महापालिकेच्या क्रीडा समितीच्या वतीने देण्यात आलेल्या पहिल्या क्रीडा पुरस्कार वितरण कार्यक्रमाला गालबोट लागले. क्रीडा पुरस्कारांची निवड करताना अन्याय झाल्याची तक्रार करून खेळाडू आणि त्यांच्या पालकांनी महापालिका भवनात मूक निदर्शने केली.

उद्यापासून प्रॉपर्टी टॅक्सची बिले

$
0
0
पुणे महापालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्सच्या बिलांचे वाटप एक एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. टॅक्स भरण्यासाठी क्षेत्रीय कार्यालय आणि नागरी सुविधा केंद्रांबरोबरच एचडीएफसी बँकेच्या शाखांमध्येही भरणा करता येणार आहे.

१३३ कोटींचे बुडीत कर्ज माफ

$
0
0
कॉसमॉस बँकेची वसूल न होऊ शकणारी १३३ कोटी रुपयांची दीर्घकालीन थकीत कर्जे माफ (राइट ऑफ) करण्यास बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शनिवारी मान्यता देण्यात आली. ही कर्जे माफ केली तरी बँकेच्या आर्थिक परिस्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही.

‘मामाचा गाव’ यंदा ऑप्शनला

$
0
0
राज्यावर आलेल्या दुष्काळाचा फटका केवळ शेतीलाच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या कृषी पर्यटनालाही बसला आहे. पाण्याच्या टंचाईमुळे आम्ही उन्हाळ्यात नाही, पावसाळ्यात सहलीला येतो, असे कारण देत पर्यटकांनी ‘मामा’चे गाव असलेल्या कृषी पर्यटनाला यंदा ‘ऑप्शन’ला ठेवले आहे.

रोजंदारीवरून ‘सॅलरी’कडे...

$
0
0
जकातीमधून तेराशे कोटी... बांधकाम परवानगीतून ६५२ कोटी आणि मिळकतकरापोटी ६४० कोटी... गेल्या आर्थिक वर्षात महापालिकेला या मोठ्या स्रोतांमधून अडीच हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

जलसंधारणाच्या कामाने फुलला ‘रानमळा’

$
0
0
कोरड्या रख्खं दुष्काळातही काही गावांमध्ये पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करून नंदनवनं फुलली आहेत. गावकऱ्यांनी केलेल्या अनेक वर्षांच्या कष्टातून पाण्याच्या बाबतीमध्ये हे भाग स्वयंपूर्ण झाले आहेत. अशाच काही गावांच्या या यशोगाथा...

दुष्काळ निवारणासाठी ‘एनजीओ’ना मदतीचा हात

$
0
0
राज्यातील स्वयंसेवी संस्थांना दुष्काळ निवारणाच्या कामात विविध प्रकारे मदतीचा हात देण्याचा निर्णय रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीने घेतला आहे. त्यासाठी नागरिकांसह विविध संस्थां-संघटनांना मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

वाहतूक गुणवत्तेसाठी ‘जनवाणी’ची मोहीम

$
0
0
पुणेकरांच्या प्रवासाच्या सवयी कोणत्या आहेत, त्यांच्या नेमक्या गरजा काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी ‘जनवाणी’ संस्थेतर्फे १५ एप्रिल ते २० मे दरम्यान शहरातील विविध भागांमध्ये सर्वे करण्यात येणार आहे.

मेंदू, मणक्याच्या उपचारासाठी जर्मन संस्थेची मदत

$
0
0
मेंदू, मणक्याच्या आजाराचे निदान, उपचाराच्या जागृतीसाठी पुण्यातील सायनेप्स ब्रेन- स्पाइस फाउंडेशनला सहकार्य करणार असल्याची घोषणा जर्मनचे सिग्मंड ओपेरकुक, सिग्मंड पेट्रा, रॉल्फ शॉक यांनी रविवारी केली.

दृष्टिहिनही अनुभवणार ‘नक्षत्रांचे दिवस’

$
0
0
दूरदर्शनच्या सुवर्णकाळाचे स्मरणरंजन करणाऱ्या ‘नक्षत्रांचे दिवस’ या पुस्तकाच्या ब्रेल आवृत्तीचे नुकतेच प्रकाशन झाले. अरुण काकतकर यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन ‘स्नेहांकित’ या दृष्टिहीनांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक सदस्या परिमला भट यांच्या हस्ते करण्यात आले.

‘कॅम्पस मेकओव्हर’चे स्वप्न ‘ओव्हर’

$
0
0
पुणे विद्यापीठामध्ये डॉ. नरेंद्र जाधव कुलगुरू असल्यापासून सुरू असलेल्या ‘कॅम्पस मेकओव्हर’च्या प्रयत्नांना यंदाही यश लाभण्याची चिन्हे नाहीत. विद्यापीठाच्या यंदाच्या बजेटमध्ये इमारत बांधकामे, सुविधा आणि सुधारणांसाठी थेट ८० कोटी ५६ लाख रुपयांची एकूण तरतूद करण्यात आली आहे.

पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा ‘उतरणार’

$
0
0
अवेळी पाऊस आणि खराब हवामानामुळे फळांचा राजा रूसण्याचा अंदाज असताना आतापासूनच तो बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागला आहे. परिणामी, त्याचा ‘भाव’ही उतरला असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकरांना स्वस्तात त्याची चव चाखता येणार आहे.

मेथी, पालक महाग; कोथिंबिर स्वस्त

$
0
0
उन्हामुळे आवक कमी होऊन भाज्या महाग होण्याची भीती असतानाच काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दोडका, काकडी, वांग्याचे भाव उतरले आहेत. दरम्यान, कोथिंबीरही स्वस्त झाली आहे. मेथी आणि पालकच्या जुडीचा भाव सहा रुपयांवरुन १० रुपयांवर पोहोचला आहे.

बीडीपी आरक्षण टाकून टेकड्या वाचवा

$
0
0
समाविष्ट २३ गावांच्या विकास आराखड्यात ‘सी-डॅक’ अहवालाप्रमाणे बीडीपीचे आरक्षण टाकले आहे. त्याप्रमाणे पालिकेने जुन्या हद्दीतील प्रारूप विकास आराखड्यामध्ये शहरातील टेकड्यांवर ‘बीडीपी’ आरक्षण टाकून पर्यावरण वाचवावे, अशी मागणी ‘बीडीपी हरकती सूचना चर्चासत्रा’मध्ये करण्यात आली.

दिवेगावात ‘आरटीओ’च्या नव्या ऑफिसचा मार्ग मोकळा

$
0
0
पुरंदर तालुक्यातील दिवेगावात ‘आरटीओ’चे नवे ऑफिस सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. गावकऱ्यांनी या निर्णयाला ‘ग्रीन सिग्नल’ दाखवला असून, पुढील वर्षभरात ऑफिस सुरू होण्याची चिन्हे आहेत. परिणामी, पुणे ‘आरटीओ’तील कामाचा भार हलका होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे २४ एप्रिलला आंदोलन

$
0
0
पगारवाढीचा तिढा सुटत नसल्यामुळे येत्या २४ एप्रिल रोजी एसटी कर्मचारी राज्यभर चक्का जाम आंदोलन करणार आहेत. पगारवाढीच्या कराराचा प्रश्न अनेक दिवसांपासून सरकार दरबारी प्रलंबित असून, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, त्यामुळे हे पाऊल उचलण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सांगितले.

आरोग्य अधिका-यांना मिळणार ४ वर्षांचा ‘बूस्टर’

$
0
0
आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, सिव्हिल सर्जनसह संचालकांपर्यंतच्या विविध वरिष्ठ पदांवरील अधिकारी निवृत्त होत असल्याने अधिकाऱ्यांची खात्यात कमतरता निर्माण झाली आहे.

भोर नगरपरिषद निवडणूक आरक्षण जाहीर

$
0
0
भोर नगरपरिषदेच्या शिवाजी सभागृहांत रविवारी सकाळी उपविभागीय प्रांत अधिकारी संजय आसवले यांच्या अध्यक्षतेखाली पंचवार्षिक निवडणुकीची आरक्षण सोडत काढण्यात आली.

मावळ ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व

$
0
0
मावळातील ग्रामपंचायत निवडणुकीत ११ पैकी सात ग्रामपंचायतींवर कमळ फुलले असून, भाजपला सत्ता प्रस्थापित करण्यात यश आले आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या वडगाव-ग्रामपंचायतीत शहर विकास समितीचे आठ, भाजपाचे सहा शिलेदार विजयी झाले. त्यात भाजपाचे संतोष उर्फ बापू वाघवले हे चौथ्यांदा विजयी झाले.

‘विरोधकांच्या अनामत रकमा जप्त करू’

$
0
0
दोन वर्षांपूर्वी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करीत २० कोटी रूपयांची कामे केली. विरोधी पक्षांच्या तुलनेत अधिक कामे केली असल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीति विरोधकांच्या अनामत रकम जप्त करून सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवू, असा विश्वास आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>