Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दुष्काळग्रस्तांसाठी अपंगाचा पुढाकार

$
0
0
‘व्हीलचेअर’वरून कोल्हापूर ते पुण्यापर्यंतचा २२६ किलोमीटर प्रवासादरम्यान दुष्काळग्रस्त भागातील जनतेला मदतीचा हात देण्यासाठी मदत गोळा करण्याचा संकल्प अपंग तरुणाने सोडला आहे.

तारण नोंदणीसाठी ई-रजिस्ट्रेशन

$
0
0
कर्जाच्या बदल्यात ठेवले जाणारे तेवढ्याच रकमेच्या मालमत्तेचे तारण आता नोंदणीकृत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नोंदणीसाठी ई-रजिस्ट्रेशनची सुविधा देण्यात आली असून दुय्यम निबंधक कार्यालयात न जाता ही नोंदणी करणे शक्य होणार आहे.

‘एमपीएससी’ परीक्षेला ‘व्हायरस’

$
0
0
एमपीएससीची पूर्व परीक्षा अवघ्या चार दिवसांवर असताना या परीक्षेचा अर्जच पुन्हा भरण्याची सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिल्याने उमेदवारांचा मनस्ताप वाढला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जांचा डेटा असलेल्या सर्व्हरमध्ये ‘व्हायरस’चा शिरकाव झाल्याने ही यंत्रणाच ‘करप्ट’ झाल्याची कबुली ‘एमपीएससी’ने दिली आहे.

ठशाविनाही ‘आधार’ नोंदणी होणार

$
0
0
आधारची नोंदणी करण्यासाठी केंद्रांवर आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे तसेच लहान मुलांच्या बोटाचे ठसे येत नसतील तर त्यांना परत न पाठविता त्यांची नोंदणी करा, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने सर्व केंद्रप्रमुखांना दिल्या आहेत.

‘शाळेतच दाखला’ योजनेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0
अॅडमिशनसाठी आवश्यक असलेले दाखले शाळेतच मिळावेत, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शिबिराला पहिल्याच दिवशी सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सोमवारी दिवसभरात ५०० हून अधिक अर्ज विद्यार्थ्यांनी दाखल केले.

खडकवासला धरणातील गाळ काढण्याचे काम सुरू

$
0
0
ग्रीन थंब आणि भूमाता ब्रिगेड यांच्यातर्फे खडकवासला येथील धरणालगतचा गाळ काढण्याचे काम चालू आहे. या उपक्रमाला नुकतीच कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी भेट दिली.

सायन्स काँग्रेसमधील चैतन्य वाढविणार

$
0
0
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आणि इंडियन सायन्स काँग्रेसचे आजीव सदस्य असलेल्या डॉ. सर्जेराव निमसे यांची २०१५ मध्ये होणाऱ्या १०२ व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. सायन्स काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून होणाऱ्या कार्याचे नियोजन त्यांनी ‘मटा’शी बोलताना स्पष्ट केले.

प्राध्यापकांच्या संघटनेकडून कुलगुरूंबाबत अपशब्द

$
0
0
पुणे विद्यापीठामार्फत २००४ ते २०१२ या काळात प्राध्यापकपदी रुजू झालेल्या पीएचडीधारक उमेदवारांची कोणतीही माहिती विद्यापीठाकडून संकलित करण्यात आलेली नसल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे

बोर्डाच्या नोंदींत कॉपीचा ‘दुष्काळ’

$
0
0
गणित-इंग्रजी पेपरच्या वेळी राजरोसपणे कॉपी होत असल्याचे प्रसारमाध्यमांनी प्रकाशात आणले असले, तरी बोर्डाच्या आकडेवारीनुसार एरवी हजारोंच्या संख्येने होणारी कॉपी यंदा शेकड्यातच झाली आहे.

आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार

$
0
0
वानवडी येथे आठ वर्षांच्या लहान मुलीवर तिच्याच ओळखीच्या नऊ आणि चौदा वर्षांच्या दोघा मुलांनी बलात्कार केल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला. लष्करी क्वाटर्सजवळील मुलांच्या उद्यानामध्ये हा प्रकार घडला.

‘एलबीटी रद्दच झाला पाहिजे’

$
0
0
लोकल बॉडी टॅक्सला (एलबीटी) नव्हे तर, त्यातील जाचक अटींना विरोध असल्याचे सांगणाऱ्या व्यापाऱ्यांनी आता ‘यू टर्न’ घेतला असून, ‘एलबीटी’च रद्द करायला हवा, अशी मागणी लावून धरली आहे. या भूमिकेमुळे आज (बुधवार) मुख्यमंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता कमी आहे.

कात्रज डेपोसाठीच्या प्रक्रियेला वेग

$
0
0
स्वारगेट उड्डाणपुलाच्या कामासाठी स्वारगेट येथील एसटी डेपो हलवून कात्रज येथे नेण्यात येणार असल्याने त्यासाठी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) पुणे महापालिकेला याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

साखर कारखान्यांना दिलासा

$
0
0
इन्कम टॅक्स वसुलीसाठी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना पाठविण्यात आलेल्या डिमांड नोटिशींना येत्या ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. पुण्याचे ‘अॅडिशनल इन्कमटॅक्स कमिशनर’ टी. चाकोमणी यांनी हा आदेश काढला आहे.

जादूटोणा विरोधी कायद्यासाठी जेलभरो

$
0
0
सरकारच्या नाकर्तेपणामुळे जादूटोणा विरोधी कायदा अद्याप मंजूर होत नसल्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्ते ११ ते १४ एप्रिल दरम्यान सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असून, १६ एप्रिल रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे जेलभरो आंदोलन करणार असल्याचे समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सांगितले.

एसआरए नियमांचे उल्लंघन

$
0
0
कर्वेरोडवरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये लाभार्थींना पुरेशा सुविधा न देता नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप दोघा नगरसेवकांनी मंगळवारी केला आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

‘खंबाटकी’च्या सुलभतेसाठी बोगद्याचा प्रस्ताव

$
0
0
पुण्याहून साताऱ्याकडे जाताना खंबाटकी घाटात वाहनचालकांचा प्रवास सुलभ व्हावा, म्हणून याठिकाणी एक ते दीड किलोमीटर अंतराचा बोगदा तयार करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी प्राधिकरणाच्या मुख्यालयाकडे पाठवण्यात आला असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

वादग्रस्त महोत्सव रकमेत ७५ टक्क्यांची ‘बचत’

$
0
0
चहूबाजूंनी टीकेचा भडीमार झाल्यानंतर युवक करियर आणि पर्यावरण महोत्सवाच्या खर्चात तब्बल ७५ टक्क्यांची बचत करून महापालिकेने आगळावेगळा ‘विक्रम’ केला आहे. पूर्वी दोन्ही महोत्सवांचे मिळून असलेले ४७ लाख रुपयांचे नियोजन टीकेनंतर थेट १२ लाखांपर्यंत घसरले आहे.

‘अग्रणी’चा प्रवाह पुन्हा वाहणार

$
0
0
अनेक वर्ष दुष्काळ अनुभवलेल्या सांगली जिल्ह्यातील खानापूर येथील ग्रामस्थांनी आता ‘अग्रणी’ नदीच्या पुनरूज्जीवनाचा संकल्प केला आहे. जलबिरादरी संस्थेचे अध्यक्ष मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुढीपाडव्यापासून (११ एप्रिल) या उपक्रमाला सुरूवात होणार आहे.

मोहन जोशी यांची पसंती ‘समीप रंगमंचा’ला

$
0
0
‘टीव्ही मालिका, महागाई आदी कारणांनी प्रेक्षक नाटकांपासून दुरावतो आहे. अशा परिस्थितीत नाटकांसाठी समीप रंगमंच महत्त्वाचे आहेत. समीप रंगमंचांची पुण्यात वाढणाऱ्या संख्येचा राज्यभरातही प्रसार होणे आवश्यक वाटते,’ असे मत अखिल भारतीय नाट्यपरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मोहन जोशी यांनी व्यक्त केले.

दुष्काळग्रस्तांना ‘युक्रांद’ची मदत

$
0
0
दुष्काळाची गंभीर समस्या असणाऱ्या बीड आणि जालना जिल्ह्यात काम करण्यासाठी युवक क्रांती दलाच्या (युक्रांद) कार्यकर्त्यांची दहा जणांची पहिली टीम आठ एप्रिल रोजी रवाना होणार आहे, असे जाहीर करण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images