Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दिरंगाईची किंमत रू ५९ कोटी

$
0
0
हडपसर, कात्रजकडून येणाऱ्या वाहनांमुळे जेधे चौकात होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या स्वारगेट उड्डाणपुलाचे बजेट पुन्हा वाढले असून, कामाच्या दिरंगाईमुळे खर्च ५९ कोटी रुपयांनी वाढला आहे.

उद्योगजगताकडून व्हावा सामाजिक भल्याचा विचार

$
0
0
‘आर्थिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे, एवढाच उद्योगजगताचा मर्यादित उद्देश असता कामा नये. समाजासाठी चांगले काय करता येईल, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. चांगल्या भारतासाठी राजकारण, शिक्षण आणि उद्योगजगत यांनी आपापली जबाबदारी उचलून लढा द्यावा,’ असे मत ‘इन्फोसिस’चे संस्थापक डॉ. नारायणमूर्ती यांनी व्यक्त केले.

बिल्डर, नेत्याच्या वादात पोलिस

$
0
0
पुणे शहरातील एका बिल्डरची सध्या एका राजकीय नेत्याबरोबच चांगलीच जुंपली आहे. या वादात एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने उडी मारली असून, अखेर हा तिढा ‘दादा’ नेत्याच्या दरबारात गेला आहे.

पार्किंगची समस्या डीपीमुळे ‘जैसे थे’च

$
0
0
जुन्या पुण्याच्या हद्दीत पार्किंगची समस्या असताना, मध्यवस्तीसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार होती. मात्र, विकास आराखड्यामध्ये (डीपी) मध्यवर्ती परिसर आणि उपनगरी भाग यासाठी पार्किंगची नियमावली सारखीच करण्यात आली आहे.

अधिका-यांनी मनात आणले तर...

$
0
0
जातीचे, नॉन क्रिमीलेअरचे दाखले मिळविण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांना तलाठी कार्यालयापासून प्रांत कार्यालयाचे उंबरे अनेक महिने झिजवावे लागतात. एवढे करूनही एखादे कागदपत्र गहाळ झाल्यास पुन्हा पहिल्यापासून सर्व प्रक्रिया करावी लागते.

सरकारी कार्यालयांचा बागुलबुवा

$
0
0
परवा एक मैत्रीण आपल्या पुण्यातील एका क्षेत्रीय कार्यालयात गेली होती. (काय करणार, जन्म दाखल्याचं काहीतरी काम आल्याने जावंच लागलं!), त्यावेळी तिथे किमान एक अख्खा दिवस जाईल, अशा मानसिक तयारीने ती गेली होती आणि काम होऊन अवघ्या १० मिनिटांत बाहेर पडल्यावर तिला इतकं आश्चर्य वाटलं की भेटेल त्याला सरकारी कार्यालयातली ही ‘जादू’ सांगत होती!!

फॉर्म सोपा का नसतो ?

$
0
0
सरकारी कार्यालयात कोणतेही व्यक्तिगत काम घेऊन जाणाऱ्या प्रत्येकाचे सहजगत्या काम होईल, याची शाश्वती कोणालाच देता येत नाही. खुद्द सरकारी अधिकाऱ्यांनादेखील असाच अनुभव दुसऱ्या खात्यात येतो. नियमांवर बोट ठेऊन त्यानुसारच कामे होतील, अशा अविर्भावात बोलणारे सरकारी अधिकारी संबंधित अर्जासोबतचे कागदपत्रे बरोबर आहेत की नाही हे तपासण्याचा सोपस्कार करतात.

नियमांचा चक्रव्यूह

$
0
0
नियमांचे जंजाळ निर्माण करून सर्वसामान्यांना गोल गोल फिरविण्यात नोकरशाहीचा हात कोणी धरू शकणार नाही. भारतात काही कायदे हे सगळीकडे समान आहेत, तर काहींबाबतचे कायदे राज्याराज्यांत वेगवेगळे आहेत.

कारखाली सापडून विद्यार्थ्याचा मृत्यू

$
0
0
परीक्षा असल्याने मित्राकडे नोट्स आणण्यास गेलेल्या सातवीतील विद्यार्थ्याचा ‘सीआयडी’ अधिकाऱ्याच्या कारखाली सापडल्याने मृत्यू झाला. सिंहगड रोडवर शुक्रवारी सकाळी माणिकबागेजवळ शुक्रवारी हा अपघात झाला.

भाडे थकविल्याने गाड्या बंद करणार

$
0
0
पुणे महानगर परिवहन मंडळाने (पीएमपी) भाडेतत्त्वावर घेतलेल्या २७३ बसगाड्यांचे भाडे गेल्या दीड महिन्यापासून थकविल्याने संबंधित कंत्राटदारांनी तीन एप्रिलपासून या गाड्या बंद करण्याचा इशारा दिला आहे.

बेकरीत होरपळून कामगाराचा मृत्यू

$
0
0
जनवाडीतील कुसाळकर पुतळा चौकाजवळ असलेल्या बंगलोर अय्यंगार बेकरीत मध्यरात्री लागलेल्या आगीत कामगाराचा होरपळून मृत्यू झाला. महेश शंकर पगडी (वय १६, रा. कर्नाटक) असे या कामगाराचे नाव आहे. बेकरी मालकावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा अध्यक्षांकडून सरकारला घरचा आहेर

$
0
0
शिक्षणहक्क कायद्याच्या अंमलबजावणीची तारेवरची कसरत करणाऱ्या शिक्षण विभागाला विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडूनच घरचा आहेर मिळाला आहे. ‘शिक्षणहक्क कायदा लागू होऊनही त्याच्या अंमलबजावणीसाठीची पूर्वतयारी आपल्याकडे दिसत नाही,’ अशी टीका त्यांनी केली.

प्राध्यापकांच्या बहिष्कारावर शरद पवारांची मध्यस्थी

$
0
0
प्राध्यापकांच्या परीक्षेवरील बहिष्कारावर तोडगा काढण्यासाठी आता केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. या प्रश्नात मध्यस्थी करताना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. पल्लम राजू यांच्यासमवेत येत्या सोमवारी (१ एप्रिल) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

जखमी तरुणीला मदत ‘फायरब्रिगेड अॅम्ब्युलन्स’ची

$
0
0
संकटात सापडलेल्या लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या फायर ब्रिगेडची वर्दीवर निघालेली गाडी शनिवारी सकाळी अपघातात जबर जखमी झालेल्या तरुणीसाठी अॅम्ब्युलन्स झाली.

खूनप्रकरणी तिघांना अटक

$
0
0
विश्रांतवाडी जवळील उद्यानात धारदार शस्त्राने एकाचे शिर धडावेगळे करून खून केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मयत आणि आरोपी यांच्यात प्रवाशांच्या बॅगेतील चोरलेल्या पैशांच्या वाटणीवरून खून करण्यात आल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली.

‘एलबीटी’मध्ये सोने-चांदीवरील कर घटविला

$
0
0
जकातीऐवजी लागू होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था करामध्ये (एलबीटी) सोन्याचांदीला प्रचंड झळाळी लाभली आहे. पूर्वीच्या तीन टक्के दराच्या जागी आता सोन्याचांदीच्या दागिन्यांना ०.५० टक्के आणि न घडविलेल्या सोन्या-चांदीवर ०.१० टक्के इतकाच कर लागू करण्यात आला आहे.

काम बंद आंदोलनाला वकिलांचा प्रतिसाद

$
0
0
बाणेर येथील वकील अॅड. अशिष ताम्हाणे यांच्यावर झालेल्या खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे बार असोसिएशनतर्फे पुकारण्यात आलेल्या काम बंद आंदोलनात शिवाजीनगर जिल्हा न्यायालय आणि तालुका न्यायालयातील वकिलांनी सहभाग नोंदविला.

चांदेरेंची दहशत संपविण्याची मागणी

$
0
0
बाणेर येथे नगरसेवक चांदेरे यांच्या कुटुंबीयांची दहशत थांबविण्यात यावी; तसेच वकिलावर हल्ला करणा-या आरोपींना दोन दिवसात अटक करण्यात यावी अन्यथा पोलिस आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे.

खडकवासला कालव्यातून शेतीसाठी विसर्ग

$
0
0
टंचाईच्या काळात खडकवासला धरणाच्या मुठा कालव्यातून साडेतेराशे क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी आणि उन्हाळी पिकांसाठी कालव्याद्वारे पावणेतीन टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.

नव्या बीआरटी मार्गाचा डीपीत प्रस्ताव

$
0
0
सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी राबवण्यात आलेल्या कात्रज ते हडपसर या बस रॅपिड ट्रान्झिटच्या (बीआरटी) पायलट प्रकल्पाचा बोजवारा उडाल्याचा अनुभव पुणेकरांनी घेतल्यानंतरही जुन्या पुण्याच्या विकास आराखड्यात (डीपी) आणखी २३ मार्गांवर बीआरटी राबवण्याचे सुचवण्यात आले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>