Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

खडकीतील एलबीटी वसुली पालिकेकडे?

$
0
0
खडकी कँन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतून एलबीटी वसूल करण्याचे अधिकार बोर्ड पुणे महापालिकेलाच देण्याची शक्यता असून, त्यावर शनिवारी (३०मार्च) होणाऱ्या बोर्डाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे.

एकतर्फी प्रेमातून युवतीवर अॅसिड हल्ला

$
0
0
एकतर्फी प्रेमातून युवतीवर अॅसिड हल्ला केल्याची घटना सव्वा महिन्यांपूर्वी कृष्णानगर स्पाईन रस्त्यावर घडली होती. या प्रकरणी युवतीने गुरुवारी (२८ मार्च) रात्री उशिरा पोलिसांमध्ये तक्रार दिली असून, युवकाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे.

‘एक्स्प्रेस वे’वर अपघातात एकाचा मृत्यू

$
0
0
‘एक्स्प्रेस वे’वर सडवली गावच्या हद्दीत रस्ता ओलांडताना कारची धडक बसून एका स्थानिक शेतक-याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या दरम्यान झाला.

बोरवणकरांच्या मुलाला मारहाणप्रकरणी आणखी तिघांना अटक

$
0
0
कारागृह विभागाच्या अतिरिक्त महासंचालक पुणे शहर पोलिस दलाच्या माजी पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या मुलाला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत नऊजणांना अटक करण्यात आली आहे.

दारू पिण्याच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण

$
0
0
दारू पिण्याच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करत छातीवर नाचून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

बलात्काराचा गुन्हा दाखल

$
0
0
लग्नाच्या अमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाला लग्न न करण्यास दबाब आणणाऱ्या त्याच्या वडिलांनाही सहआरोपी करण्यात आले आहे.

एक कोटीचा व्होडाफोनला दंड

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिकेने व्होडाफोन कंपनीला एक कोटी १७ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ३१ मार्चपर्यंत दंडाची रक्कम भरण्याचे आदेशही पालिकेने व्होडाफोन कंपनीला दिले आहेत.

रेल्वे बोगद्याला ट्रकची धडक

$
0
0
पुणे-मुंबई रस्त्यावरील खडकी पोलिस स्टेशनच्या समोर असलेल्या रेल्वे बोगद्याला सिमेंट मिक्सर ट्रकने शुक्रवारी (२९ मार्च) धडक दिल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर, रेल्वे वाहतूक संथ गतीने सुरू ठेवण्यात आली आहे.

विमानतळासाठी प्रतीक्षा नकाशांच्या मंजुरीची

$
0
0
खेड चाकण परिसरातील विमानतळाच्या नियोजित जागेची पाहणी करण्यासाठी आलेल्या विमानतळ प्राधिकरणाच्या टेक्निकल समितीने विमानतळाच्या धावपट्टीचे नकाशे राज्य शासनाकडे सादर केले. या नकाशांना मंजुरी मिळाल्यानंतर विमानतळाच्या उभारणीला अंतिम मंजुरी मिळणार आहे.

महसूल कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

$
0
0
कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या मागणीसाठी पुणे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने येत्या १ एप्रिलपासून आंदोलन पुकारले असून, पदोन्नतीचा निर्णय लवकर न झाल्यास बेमुदत लेखणी बंदचा इशारा दिला आहे.

केबल तुटल्यानेच इंटरनेट स्लो

$
0
0
सा-या जगाला इंटरनेटच्या माध्यमातून जोडणा-या समुद्राखालील काही केबल तुटल्याने इंटरनेट सेवेवर बुधवारी रात्रीपासून परिणाम झाला आहे. हा सायबर हल्ला असल्याची अफवा पसरल्याने जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

‘देव भावाचा भुकेला, तुका वैकुंठासी गेला’

$
0
0
`तुका बैसला विमानी, संत पाहता लोचनी, देव भावाचा भुकेला, तुका वैकुंठासी गेला` या उक्तीप्रमाणे श्री क्षेत्र देहू येथे रणरणत्या उन्हातही शुक्रवारी (२९ मार्च) भक्तीचा मळा फुलला होता. ‘धन्य धन्य तुकोबा’ म्हणत भाविकांनी बीज सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला.

विनयभंग प्रकरणी एकास अटक

$
0
0
एअरपोर्ट रोडवर बुधवारी सायंकाळी भूत बंगल्यासमोरून दुचाकीवर चाललेल्या तरुणीला धडक देत तिच्याशी हुज्जत घालताना विनयभंगाचा प्रकार घडला.

पोलिस असल्याच्या बतावणीने फसवणूक

$
0
0
पोलिस असल्याच्या बतावणीने ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी सकाळी केमसे वस्ती येथे घडला. या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीस्वाराला लुटले; दोघांवर गुन्हा दाखल

$
0
0
मुंबई-देहूरोड बायपासवर दुचाकीस्वाराला अडवून, मारहाण करीत ४५ हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडापावचे पैसे न दिल्याने केला खून

$
0
0
वडापावचे पैसे न दिल्याच्या कारणावरून दोघांनी एकाला मारहाण करून फरपटत नेल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना लोणावळ्याजवळील कुणे गावात सोमवारी (२५ मार्च) रात्री आठच्या सुमारास घडली.

दुष्काळमुक्तीसाठी ‘जलयुक्त गाव’

$
0
0
वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करणाऱ्या गावांत पाणलोटक्षेत्र विकासापासून विहीर पुनर्भरणापर्यंतची सर्व कामे ‘जलयुक्त गाव’ या अभिनव अभियानाद्वारे राबवून ही गावे दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जाणार आहेत.

धरणांचीही भुई भेगाळली

$
0
0
कडाक्याच्या उन्हामुळे धरणांचीही भुई भेगाळली असून राज्यातील १५ धरणांनी तळ गाठला आहे. प्रमुख धरणांत सद्यस्थितीत केवळ ३० टक्के साठा शिल्लक राहिला आहे. या पाणीसाठ्यावर आता आगामी दोन ते अडीच महिने काटकसरीने काढावे लागणार आहेत.

भूजल पातळीत ४ ते ५ मीटरने घट

$
0
0
सलग दोन वर्षे कमी झालेला पाऊस आणि पर्यायाने भूगर्भातील पाण्याचा झालेला उपसा यामुळे पुण्यासह सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यामधील भूजल पातळीत सरासरी चार ते पाच मीटरने घट झाली आहे.

‘नेट-सेट पात्र प्राध्यापकांसाठी भांडा’

$
0
0
प्राध्यापकांसाठी सेट/नेटची पात्रता सक्तीची केल्यानंतर सवलतीसाठी न भांडता सेवेत असतानाच ही अर्हता प्राप्त केलेल्या प्राध्यापकांनी नेट/सेट अपात्रांच्या तुलनेत अधिक फायदे मिळावेत, अशी मागणी केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images