Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

यंदा धुलिवंदन व रंगपंचमीचा सण ‘कोरडा’

$
0
0
राज्यात दुष्काळ पडल्यामुळे पुण्यातील अनेक संस्था-संघटनांनी या वर्षी धुलिवंदन आणि रंगपंचमीचे कार्यक्रम रद्द केले आहेत. लोकांना प्यायला पाणी नसताना आसाराम बापू यांनी होळीसाठी हजारो लीटर पाणी वाया घालवल्याबद्दल या संस्थांनी निषेध नोंदविला आहे.

गुरुवारी पुण्यात पाणी नाही

$
0
0
पर्वती जलकेंद्र, वडगाव, लष्कर, एसएनडीटी आणि नवीन होळकर पंपिंग येथील दुरूस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने गुरुवारी (ता.२१) संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

रेल्वेने कसली कंबर

$
0
0
पुणे स्टेशनवर पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मोहीम रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात येणार आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे, अशी परिस्थिती असताना या ठिकाणी पाण्याचा गैरवापर करण्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

युद्ध अमुचे सुरू...

$
0
0
पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुणे किंवा बांधकामासाठी करू नये, असा आदेश पुणे पालिकेकडून देण्यात आला असून, पाण्याचा गैरवापर होत असल्यास नागरिकांनी क्षेत्रिय कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दीड कोटी लिटर पाणी अडवले

$
0
0
पुणेकरांच्या पाणीवापरावर तोंडसुख घेणा-या नेत्यांच्या दरबारी पुणेकरांचे पाणीप्रकल्प रखडले आहेत. परिणामी, तब्बल दीड कोटी लिटर पाण्यापासून पुणेकर वंचित राहात आहेत.

चौपदरीकरण मार्गी

$
0
0
पुणे- नाशिक रेल्वेपाठोपाठ पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरुनगर ते सिन्नर या दरम्यानच्या १३७.९४ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे चौपदरीकरणास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने सोमवारी मंजुरी दिली.

‘जनकल्याण समिती’चे १२५ गावांत मदतकार्य

$
0
0
दुष्काळात होरपळणा-या राज्यातील नागरिकांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीतर्फे १३ जिल्ह्यांत १२५ गावांमध्ये मदतकार्य सुरू केले जाणार आहे. पाच जिल्ह्यांतील २५ तालुक्यांमध्ये मदतकार्य सुरू झाले असून, नियोजित कामांसाठी दहा कोटी रुपये निधी उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

शेतक-यांच्या मदतीसाठी ‘मनसे’तर्फे फेरी

$
0
0
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नुकतीच मदत फेरी काढण्यात आली.

ओल्या कच-यातून फुलवला मळा

$
0
0
शाळेतील कचरा शाळेतच जिरवला जावा तसेच या कच-यातून खतनिर्मिती करून त्याचा उपयोग फळबागा व फुलबागांसाठी करून शाळेत हिरवा मळा फुलविण्याचा प्रयोग व्हिजन इंग्लिश स्कूलने राबवला.

‘पीएमपी’लाही सुरक्षा नियमांचा ‘ब्रेक’

$
0
0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्याऐवजी त्यातून सुटकेसाठी विनंतीअर्ज केलेल्या ‘पीएमपी’च्या ताफ्यातील स्कूल बसवर परिवहन खाते कारवाई करणार आहे. पुणे शहरात खासगी स्कूल बसबरोबरच ‘पीएमपी’च्या बसमधूनही विद्यार्थी वाहतूक केली जाते.

पिस्तुलाच्या धाकाने लुटले

$
0
0
कोंढवा खुर्द येथे ब्रह्मा होरायझन सोसायटीच्या पार्किंगमध्ये वाइन शॉपमालकाला पिस्तुलाच्या धाकाने लुटल्याची घटना रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दोन अपघातात २ जणांचा मृत्यू

$
0
0
अप्पर इंदिरानगर येथे महेश सांस्कृतिक भवनासमोर एका ट्रकने पादचारी तरुणाला चिरडल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गृहमंत्र्यांच्या तंबीनंतरही सोनसाखळी चोरी सुरूच

$
0
0
सोनसाखळी चोरांना पकडण्यात आलेल्या अपयशाबाबत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पुणे पोलिसांना धारेवर धरूनही पुण्यातील सोनसाखळी चोरी अद्याप आटोक्यात आलेली नाही. लोहगाव आणि दिघी येथे दोन स्वतंत्र घटनांमध्ये आरोपींनी सोन्याचे दागिने हिसकावले आहेत.

‘लिटमस’ने तपासा पेट्रोलची शुद्धता

$
0
0
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना त्याच्या शुद्धतेबाबत अनेकवेळा साशंकता येते. त्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढावा आणि त्यांना मिळणारे पेट्रोल शुद्ध आहे का याची खात्री लिटमस पेपरच्या माध्यमातून करता येणार आहे.

टिळक पूल परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार

$
0
0
नदीकाठचा रस्ता आणि जयंतराव टिळक पुलाच्या परिसरात रोज सकाळ-सायंकाळी होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीतून लवकरच वाहनचालकांची सुटका होणार आहे. नदीपात्रातून येणा-या आणि शनिवारवाड्याकडे जाणा-या वाहनांसाठी पुलाखालून रस्ता काढण्यात येत आहे.

लॉ कॉलेज रोडवरून ‘बीएम’कडे ‘नो एंट्री’

$
0
0
लॉ कॉलेज रोडवरून एनसीसी मैदानासमोरील वि. स. खांडेकर चौकातून उजवीकडे ‘बीएमसीसी’कडे वळण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आयलंडपाशी सतत होणारे किरकोळ अपघात व कोंडीवर पोलिसांनी हा तोडगा सुचवला आहे.

मगरपट्टा चौकात दुचाकीस्वाराला लुटले

$
0
0
हडपसर येथील मगरपट्टा चौक येथे दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोबाइल फोन असा ऐवज हिसकावल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी स्वप्नील सुभाष यादव (वय २६) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

...अन् पोलिसांमुळे मिळाले ३ लाखांचे दागिने

$
0
0
व्हॅनमध्ये विसरलेली सुमारे तीन लाख रुपयांचे दागिने असलेली बॅग पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेला मिळाली. विशेष म्हणजे केवळ, केवळ पंधरा मिनिटांत ही बॅग पोलिसांनी संबंधित महिलेपर्यंत पोचवली.

परीक्षा वेळेवरच होणार

$
0
0
येत्या २८ मार्चपासून सुरू होणा-या पुणे विद्यापीठाच्या परीक्षा वेळेवरच सुरू होणार असून त्याविषयी कोणतीही अडचण नसल्याचा पुनरुच्चार विद्यापीठ प्रशासनाकडून मंगळवारी करण्यात आला.

विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था ‘गाढवा’वर!

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेचे वाजलेले तीन-तेरा मंगळवारी विद्यापीठात आलेल्या गाढव मोर्चामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. एखाद्याने ठरवले, तर पुणे विद्यापीठामध्ये आपल्याला काहीही करता येऊ शकते, हेच या मोर्चाच्या निमित्ताने विद्यापीठाच्या आवारामध्ये अनुभवायला मिळत होते.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images