Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

आधी काम सिंहगडावरील तळी बुजविण्याचे

$
0
0
फावल्या वेळामध्ये सिंहगडावर फिरायला गेलेल्या गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यांमुळे गडावरील तळी खोदण्याच्या गैरप्रकाराला लगेचच कुलूप लागले. इतकेच नव्हे, तर पाटील यांचा जिल्हाधिकाऱ्यांना फोन गेल्यावर अवघ्या काही तासातच तळी खोदण्यास नव्हे तर खोदलेले खड्डे पूर्ववत करण्याचे काम सुरू झाले. यामुळे सिंहगड विकासातील तबब्ल २५ लाख रुपये वाचले आहेत.

खाणपट्ट्यांच्या रॉयल्टीचे ४० कोटी थकीत

$
0
0
बांधकामांना लागणा-या डबर, खडी आणि क्रश सँडसाठी डोंगर फोडून खाणपट्टेचालकांनी जवळपास ५५ लाख ब्रास जादा उत्खनन केल्याचे आढळून आहे. हे उत्खनन करताना सुमारे ४० कोटी ६२ लाख रुपयांची रॉयल्टीही त्यांनी थकविली आहे.

सिमेंटच्या रस्त्यांची सफाई यांत्रिक पद्धतीने होणार

$
0
0
शहरातील काँक्रीट रस्त्यांची लवकरच मुंबई आणि नव्या मुंबईप्रमाणे यांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्यात येणार आहे. यामुळे या रस्त्यांची सफाईचे काम वेगाने आणि दर्जेदार होण्यास मदत होईल, असे महापालिकेने म्हटले आहे.

दिवाळी अंक स्पर्धेत ‘अक्षर’चा ठसा

$
0
0
‘दिवाळी अंकांच्या माध्यमातून सकस साहित्य तळागळातल्या लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ संपादक डॉ. सदानंद बोरसे यांनी नुकतीच व्यक्त केली. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचे पारितोषिक वितरण बोरसे यांच्या हस्ते झाले.

जागर वाचनसंस्कृतीचा

$
0
0
सांस्कृतिक राजधानी म्हणून गौरविण्यात येणारे पुणे हे शब्दसाधनेचे माहेरघरही. ‘मार्केट’मध्ये दिवसाकाठी प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकांच्या माध्यमातून त्याचा प्रत्यय येतोच. पुस्तकविश्वामधील घडामोडींचा हा आढावा...

नयना पुजारीच्या वस्तू पोलिसांकडे दिल्या

$
0
0
‘पुणे-नाशिक रस्त्यावरील इंद्रायणी नदीतून एक कॅरिबॅग काढली होती. त्यात नयना पूजारीची पर्स, आयकार्ड, चेक बुक तसेच इतर वस्तू होत्या. त्या पोलिसांकडे स्वाधीन केल्या होत्या,’ अशी माहिती एका साक्षीदाराने कोर्टात दिली.

२०१५ ची सायन्स काँग्रेस पुण्यात?

$
0
0
१०२ व्या इंडियन सायन्स काँग्रेसला ‘जनरल प्रेसिंडेट’ म्हणून सर्जेराव निमसे यांच्या रूपाने एक मराठमोळा अध्यक्ष लाभल्यानंतर, आता या काँग्रेसच्या अधिवेशनाचे यजमानपदही महाराष्ट्राकडे येण्याची संधी आहे.

न्यायाधीशांनी केली कोर्टाची पाहणी

$
0
0
शिवाजीनगर कोर्टात येणा-या पक्षकारांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी न्यायालयीन प्रशासनाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. प्रमुख जिल्हा न्यायाधीश आणि पुणे बार असोसिएशनतर्फे सोमवारी कोर्टाची पाहणी करण्यात आली.

जनावरांच्या बाजारात वाहनतळासाठी काढणार टेंडर

$
0
0
मार्केट यार्डाच्या आवारातील जनावरांच्या बाजारात आता प्रायोगिक तत्त्वावर वाहनतळ उभारण्यात येणार असून, त्यासाठी लवकरच टेंडर काढण्यात येणार असल्याची माहिती माहिती बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सोमवारी दिली.

‘आधार’शिवायही स्कॉलरशिप द्या

$
0
0
सहा जिल्ह्यातील दोन लाख २९ हजार पात्र विद्यार्थ्यांना आधार क्रमांक नसला तरी स्कॉलरशिप द्यावी, असे आदेश विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी शासनाला दिले. आमदार मोहन जोशी यांनी सभागृहात आधार बाबत औचित्याचा मुद्दा म्हणून उपस्थित केला होता.

‘आधार’साठी पैसे मागितल्यास कारवाई करा

$
0
0
‘आधार कार्ड देण्याची सुविधा ही संपूर्णपणे मोफत असून ज्या व्यक्ती आधार कार्ड काढण्यासाठी पैसे घेतात त्या एजन्सीचालकांवर कडक कारवाई करा,’ असा आदेश राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी दिल्या.

कोथरूड वीज सुरळीत होणार

$
0
0
महापारेषण कंपनीच्या वतीने फुरसुंगी ते कोथरूड येथील १९ किलोमीटर लांबीची जुनी वीजवाहिनी (टॉवर लाइन) पूर्णपणे बदलण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर कोथरूडसह पश्चिम आणि दक्षिण पुण्यातील सुमारे दोन लाख ग्राहकांना योग्य दाबाने सुरळीत वीजपुरवठा होणार आहे.

भरधाव वाहनांच्या धडकेत ३ जणांचा मृत्यू

$
0
0
भरधाव वाहनांच्या धडकेत तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या. त्यात ‘पीएमपी’च्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. हडपसर आणि खडकीत या घटना घडल्या आहेत.

लातूरच्या विद्यार्थ्याची पुण्यात आत्महत्या

$
0
0
सिंहगड इन्स्टिट्यूटमधील डिप्लोमाच्या विद्यार्थ्याने राहत असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच घडला. या प्रकरणी हवेली पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद दाखल केली.

एसटी कर्मचारी वेतनवाढीवरून खटला दाखल करणार

$
0
0
एसटी कर्मचा-यांना केवळ दहा टक्के वेतनवाढ देणारा करार झाल्यास राज्य सरकार आणि करार करणा-या मान्यताप्राप्त संघटनेच्या विरोधात खटले दाखल करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष जयराज लांडगे यांनी सांगितले.

कुपोषण गांभीर्याने घेण्याची गरज

$
0
0
‘कुपोषणाची गंभीर समस्या आजही दिसून येत आहे. या संदर्भात गांभीर्याने विचार व्हायला हवा. आरोग्यसंपन्न पिढी घडविण्यासाठी विद्यार्थी आणि तरुणांमध्ये जागृतीची गरज आहे,’ असे मत विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.

सिलिंडरची टंचाई नाही

$
0
0
गॅस कंपन्यांकडे सिलिंडरची कोणतीही टंचाई नाही, सिलिंडरचा काळाबाजार होऊ नये यासाठी एक गॅस सिलिंडर असलेल्या ग्राहकांनी दुसरा सिलिंडर एजन्सीकडून त्वरित विकत घ्यावा, असे आवाहन गॅस कंपन्यांच्या अधिका-यांनी केले.

‘रिपब्लिकन ऐक्यासाठी समाजवाद्यांनाही एकत्र आणा’

$
0
0
‘रिपब्लिकन ऐक्याची केवळ चर्चाच होते. तसे झाले तरी ते टिकत नाही. मात्र, तरीही आता ऐक्यासाठी कोणतीही भूमिका घ्यायला तयार आहे. त्यासाठी समाजवाद्यांनाही एकत्र आणले पाहिजे, ’ असे आवाहन भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.

आयुर्वेदाचे प्राध्यापक पासष्टीत रिटायर

$
0
0
अभ्यासक्रमाच्या रचनेत बदल घडविताना देशातील २३५ आयुर्वेद कॉलेजमधील प्राध्यापकांची नोकरी वाचविण्यासाठी निवृत्तीचे वय ७० वरून ६५ वर्षांपर्यंत कमी करण्याची ‘मात्रा’ शोधण्यात आली आहे.

...तर फोटो असलेल्या नेत्यांनाही नोटिसा

$
0
0
शहरात विनापरवाना होर्डिंग, बॅनर किंवा फ्लेक्स लावल्यास त्यावर फोटो असलेल्या नेत्यांनाही नोटिसा बजावण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. त्यानंतर संबंधितांवर स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images