Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

काँक्रिटच्या घरट्यातही रमली चिऊताई

$
0
0
बदलत्या जीवनशैली आणि राहणीमानामुळे शहरापासून चिमण्या दूर गेल्या; पण गावातून तरी त्या गायब होऊ नयेत, असा विचार राहुल लोणकर आणि त्याच्या मित्रांच्या मनात आला. घरातल्या पुठ्यांपासून त्यांनी कृत्रिम घरटी तयार केली अन् काँक्रिटच्या घरांजवळ लावली.

पाण्यासाठी आमदार सरसावले

$
0
0
राज्य सरकारच्या विविध विभागांच्या अनास्थेमुळे रखडलेल्या शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पांबाबत विधिमंडळात आवाज उठवू, असे शहरातील आमदारांनी मंगळवारी स्पष्ट केले. यासंदर्भात संबंधित विभागांकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

विश्रांतवाडीत डिटोनेटरचा स्फोट

$
0
0
विश्रांतवाडी येथे मंगळवारी सकाळी डिटोनेटरच्या स्फोटाने तपास यंत्रणांची झोप उडवली आहे. पोलिसांना घटनास्थळी ४० डिटोनेटर सापडले असून, विश्रांतवाडी पोलिसांनी एका भंगार व्याव‌सायिकाला अटक केली आहे. कासीम अजगर खान (वय ३८, रा. मार्केटयार्ड) असे अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

विकासकामांना मुदतवाढ देण्याची मागणी

$
0
0
विकासकामांचे टेंडर मंजूर झाले असले, तरी ३१ मार्चपूर्वी वर्कऑर्डर देऊन कामे पूर्ण होणे अशक्य असल्याने या वर्षीच्या बजेटमधील विकासकामांना आगामी सहा महिने मुदतवाढ देण्याची मागणी राजकीय पक्षांनी केली आहे.

‘डीपी’तील आरक्षणांसाठी अनधिकृतपणे कागदपत्रे नको

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यातील आरक्षणांसाठी अनधिकृतरित्या कागदपत्रे स्वीकारणे थांबवावे, अन्यथा पोलिसांकडे तक्रार करण्यात येईल, असा इशारा महापालिकेतील विरोधी पक्षांनी मंगळवारी दिला.

सव्वालाख फार्मासिस्टची अधिकृत नोंदणी

$
0
0
राज्यातील ५५ हजार औषध दुकानातून ४५ हजार फार्मासिस्ट असले तरी राज्य फार्मसी कौन्सिलकडे अधिकृतरित्या एक लाख २६ हजार फार्मासिस्टची नोंदणी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे फार्मासिस्ट अतिरिक्त असताना तुटवडा का असा सवाल उपस्थित होत आहे.

‘रंगपंचमीला नको पाण्याचा वापर’

$
0
0
राज्यात दुष्काळाची परिस्थिती असल्याने पुणेकरांनी धुलीवंदन आणि रंगपंचमीला पाण्याचा वापर करू नये, असे आवाहन महापौर वैशाली बनकर यांनी केले आहे.

रोजगार हमीसाठी आता ‘कॅश ट्रान्स्फर’

$
0
0
रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरी आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. पुण्यासह चार जिल्ह्यांत येत्या १ एप्रिलपासून प्रायोगिक तत्त्वावर ही ‘ई एफएमएस’ योजना लागू होत आहे.

‘स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू

$
0
0
‘स्वाइन फ्लू’ने दोन ज्येष्ठांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या वर्षात बळी गेलेल्यांची संख्या सहा झाली आहे. ‘स्वाइन फ्लू’ची नव्याने १४ जणांना लागण झाली असून तीन जणांची प्रकृती गंभीर आहे.

इंजिनीअरची हिंजवडीत आत्महत्या

$
0
0
हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये इन्फोसिस कंपनीसमोरील पार्किंगच्या दहाव्या मजल्यावरील गच्चीतून उडी घेऊन एका कम्प्युटर इंजिनिअरने मंगळवारी (१९ मार्च) आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

पुणेकर फक्त सल्लेच देतात!

$
0
0
‘वाहतुकीसह अन्य समस्यांवर तोडगा शोधण्यासाठी पोलिसांकडून नेहमीच उपाययोजना केल्या जातात. त्यासाठी देण्यात येणाऱ्या सूचनांचे नागरिकांनी पालन करणे अपेक्षित आहे.

फुले स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही

$
0
0
महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही आणि या संदर्भातील प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधान परिषदेत दिले.

‘झेडपी’त रंगली दुष्काळ निवारण चर्चा

$
0
0
दुष्काळ निवारणासाठी झेडपीच्या अधिका-यांनी कोणतीही कामे केलेली नाहीत. जी कामे झाली आहेत ती कागदावरची असल्याचा आरोप करीत झेडपी सभासदांनी प्रशासनातील अधिका-यांना मुख्य सभेत धारेवर धरले.

मुठा कॅनॉल परिसरात आढळले अर्भक

$
0
0
जनता वसाहत येथील मुठा कॅनॉल परिसरात दत्तवाडी पोलिसांना स्त्री जातीचे अर्भक आढळून आले. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता हा प्रकार घडला.

मुंडे-तावडे गटात ‘पॅचअप’?

$
0
0
‘आमच्या गैरहजेरीत बैठक कशी घेता,’ अशी तक्रार ज्येष्ठ आमदारांनी केल्यामुळे पक्षाची विस्तारीत बैठक बुधवारी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे संघटनात्मक आणि सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात शह-काटशहाचे राजकारण रंगू लागले आहे.

विद्यार्थ्यांसाठी सौर अभ्यासिका

$
0
0
प्राथमिक शाळेसाठी सौर अभ्यासिका, स्कॉलरशीपमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप, ग्रामीण भागातील कारागीरांचे जीवनमान उंचविण्यासाठी कर्ज वाटप, यासह स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभे राहता यावे, यासाठी महिलांसाठी ‌विविध योजनांचा समावेश असलेला जिल्हा परिषदेचा (झेडपी) १४२ कोटी रुपयांचे बजेट बुधवारी सादर करण्यात आले.

फर्ग्युसन रोडवर ‘नो पार्किंग’?

$
0
0
सुरक्षाविषयक धोके आणि वाहतुकीची कोंडी या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी फर्ग्युसन रोडवर ‘नो पार्किंग’चा प्रस्ताव पुढे केला आहे. परंतु, सर्वच घटकांमधून त्याला विरोध करण्यात येत आहे.

संतोष मानेची मानसिक स्थिती व्यवस्थित

$
0
0
बसचालक संतोष मानेच्या बसचा पाठलाग करुन पोलिस कमांडो लोणकरने बस थांबविल्यानंतर त्याला ‘माणसांना का मारत सुटला आहेस?’ अशी त्याने विचारणा केली असता, मानेने ‘तुला काय करायचे?’असे उत्तर दिले होते.

उद्योगासाठीही ‘दुष्काळी’ बजेट

$
0
0
मंदावलेली अर्थव्यवस्था आणि दुष्काळ अशा परिस्थितीत उद्योग क्षेत्राच्या वाढीला पूरक असणारा अर्थसंकल्प सादर करण्याऐवजी वाढीसाठी ‘दुष्काळ’ ठरेल, असा अर्थसंकल्प राज्य सरकारने मांडला आहे, अशी प्रतिक्रिया उद्योग क्षेत्रातून व्यक्त झाली.

हॉकर्सच्या पुनर्वसनाबाबत बैठका घेण्याचे आदेश

$
0
0
अनधिकृत बांधकामे आणि होर्डिंग्जविरोधात जोरदार कारवाई करण्यात आल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने हॉकर्सकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार शहरातील हॉकर्सच्या पुनर्वसनबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी २३ मार्चपासून बैठका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images