Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

दहशतवादी कृत्यांसाठी दरोड्यातील पैसा

$
0
0
दहशतवादी संघटनांकडून दहशतवादी कृत्यांसाठी लागणारा पैसा खंडणी, जबरी चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यांच्या माध्यमातून उभा करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती तपास यंत्रणांसमोर आली आहे. पुणे शहरात गेल्या काही महिन्यांत सराफी पेढ्यांमधील चोऱ्या आणि दरोड्याच्या गुन्ह्यांत दहशतवादी संघटनांचा हात असण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे.

पासपोर्ट एजंटांवर गुन्हे दाखल करणार

$
0
0
पासपोर्ट काढण्यासाठी प्रलोभने दाखवत नागरिकांकडून हजारो रुपये उकळणाऱ्या एजंटवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय पासपोर्ट अधिकाऱ्यांनी घेतला आहे.

समृद्धतेसाठी शेतीचा अनुभव प्रतिनिधीक

$
0
0
भारत हा कृषिप्रधान देश; पण या क्षेत्राची परिस्थिती आजही अगदी बिकट. शेतीला अनुकूल हवामान असतानाही आपल्या येथे या क्षेत्रामध्ये उत्साह फारसा का नाही, असे प्रश्न खेड्यांमध्ये जाऊन काम करताना मला पडले आणि याची उत्तरे शोधताना प्रत्यक्ष शेतातही काम केले.

‘एलबीटी’तून जीवनावश्यक वस्तू वगळणार?

$
0
0
‘जीवनावश्यक वस्तू स्थानिक स्वराज्य संस्था करातून (एलबीटी) वगळण्याच्या मागणीवर विचार करता येईल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच दिले. ‘कमीतकमी कर आकारतानाच उत्पन्न घटणार नाही, याचेही संतुलन साधण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहील,’ असेही ते म्हणाले.

बेगला आधीच अटक केल्याचा दावा

$
0
0
हिमायत बेगचा जर्मन बेकरी बॉम्बस्फोटप्रकरणात कोणताही सहभाग नसल्याचा दावा सोमवारी कोर्टात करण्यात आला. बेगला अटक दाखविण्यात आलेल्या तारखेपूर्वीच अटक करण्यात आली होती. तसेच बॉम्बस्फोट घडविलाच असेल, तर त्यानंतर तो पुण्यात परत कशाला येईल, असा सवाल उपस्थित करून बेगचा बचाव करण्यात आला.

‘आंतरिक ऐक्य निर्माण करण्याची गरज’

$
0
0
देशात दहशतवादाला तोंड देण्यासाठी आंतरिक ऐक्य निर्माण करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. पुणे महानगरपालिकेतर्फे डॉ. साळुंखे यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

हसन अलीला न्यायालयीन कोठडी

$
0
0
बनावट कागदपत्रे देऊन पासपोर्ट मिळविल्या प्रकरणी घोडे व्यापारी हसन अलीला सोमवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. एम. पिंगळे यांनी हा आदेश दिला.

दीड हजार वर्षांपूर्वीचा शंख सापडला

$
0
0
भारतीय संस्कृतीच्या पाऊलखुणा जपणारा, तत्कालीन समृद्ध कलाकुसरीची प्रचीती देणारा प्राचीन शंख कल्याण येथील साईधाम मंदिरात आढळून आला आहे. सुमारे दीड हजार वर्षांपूर्वीच्या या शंखाची माहिती सोमवारी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत देण्यात आली.

बंद पंखे, उर्मट कर्मचारी आणि दर्जाहीन खाद्यपदार्थ

$
0
0
रेल्वे प्रवास करताना काही वेळा गाडीतला पंखा बंद असतो, रिझर्व्हेशन काउंटरला कर्मचारी नीट बोलत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी नोंदवणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.

सहकारनगरमधील वास्तूचे पुढील महिन्यात भूमिपूजन

$
0
0
महापालिकेच्या वतीने शहरात पहिलेच अद्ययावत डिजिटल थ्रीडी प्लॅनेटोरियम (तारांगण) साकारण्यात येत आहे. सहकारनगर परिसरात दिवंगत केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या या प्लॅनेटोरियमचे पुढील आठवड्यात भूमिपूजन होणार आहे.

‘स्त्री दिग्दर्शकांनी सिद्ध केले माध्यमावरील प्रभुत्व’

$
0
0
‘स्त्री दिग्दर्शकांनी त्यांचे माध्यमावरील प्रभुत्व विविध विषयांच्या मांडणीतून निर्विवादपणे सिद्ध केले आहे,’ असे मत अभिनेत्री आणि लेखिका मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. स्त्री दिग्दर्शकांच्या फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

‘स्टँप व्हेंडर’वर बेकारीची कुऱ्हाड?

$
0
0
राज्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कार्यान्वित होणाऱ्या ‘ई- एसबीटीआर’ (ई-सेक्युअर्ड बँक कम ट्रेझरी रिसीट) या नव्या संगणकीय पद्धतीमुळे राज्यातील पाच हजार ‘स्टॅम्प व्हेंडर’वर उपासमारीची वेळ येणार आहे. तसेच त्यांच्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या इतर हजारो कुटुंबांवरही बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.

...तर ग्रामीण मुलींचे शिक्षणातील प्रमाण वाढेल

$
0
0
‘ग्रामीण भागातील शाळा दूर असल्याने मुलींच्या सुरक्षिततेसाठी मुलींचे शिक्षण अर्ध्यावर सोडले जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी मोफत बसेसची व्यवस्था केली तर ग्रामीण मुलींचे शिक्षणातील प्रमाण नक्कीच वाढेल,’ असे मत इंदापूर येथील यशस्विनी सामाजिक अभियानाच्या तालुका समन्वयक सीमा कल्याणकर यांनी व्यक्त केले.

सोनोग्राफीचे ‘एफ फॉर्म’ अखेर ऑनलाइन

$
0
0
बेकायदेशीर लिंगनिदानाच्या प्रवृत्तीला आळा बसविण्यासाठी ‘एफ फॉर्म’ची पुण्यात ‘ऑफलाइन’ असलेली सुविधा अखेर ऑनलाइन झाली. त्यामुळे पेशंटला अर्ज भरणे आता सहज शक्य होणार आहे. तसेच ऑनलाइन अर्ज भरणाऱ्या केंद्रांच्या संख्येत वाढ झाली असून त्यांची संख्या ३३८ झाली आहे.

वाढत्या उन्हाचा भाज्यांनाही ‘चटका’

$
0
0
राज्यभरातील दुष्काळाचे चटके पुणेकरांनाही जाणवू लागले आहेत. स्वस्त झालेल्या भाज्यांचे भाव पुन्हा कडाडले असून, कोथिंबीर आणि मेथीचा भाव १० ते १२ रुपयांपर्यंत पोचला आहे. बहुतेक फळभाज्यांचे भाव किलोमागे सरासरी २० रुपयांनी वाढले आहेत.

‘पीएमपी’मधून पावणेतीन लाखांचे दागिने चोरले

$
0
0
पीएमपीमधून प्रवास करत असलेल्या एका महिलेची पर्स उघडून एका चोरट्याने त्यातील दोन लाख ८४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. याप्रकरणी रत्नप्रभा पवार (वय ४२, रा. स्वामी नरेंद्र कृपा निवास माळेगा रोड, नांदगाव) यांनी बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

आंबा व्यावसायिकांसाठी ‘एफडीए’ची कार्यशाळा

$
0
0
आंबा पिकविताना वापरण्यात येणारे कॅल्शियम कार्बाइड नागरिकांच्या आरोग्यास घातक असल्याने त्याबाबत गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील आंबा व्यापाऱ्यांसह केटरर्सची अन्न व औषध प्रशासनातर्फे (एफडीए) कार्यशाळा घेण्यात आली.

‘आरोग्यविषयक ज्ञानाचा दुष्काळ संपवा’

$
0
0
‘भारताला स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षे होऊनही ग्रामीण भागात आरोग्याविषयी अज्ञान आहे. अनेक अंधश्रद्धांचा प्रभाव असलेल्या ग्रामीण भागातील आरोग्यविषयक ज्ञानाचा दुष्काळ तातडीने संपविण्याची गरज आहे,’ असे मत एड्सग्रस्तांसाठी काम करणाऱ्या डॉ. अनिता सरदार पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.

प्रकल्पांना तीन वर्षांचीच डेडलाइन

$
0
0
केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळण्यात येणारी अडचण, जागा ताब्यात नसल्याने होणारा खोळंबा आणि कोर्टातील प्रकरणांमुळे होणारा विलंब... या अडचणी लक्षात घेऊन जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेत (जेएनएनयूआरएम) नव्या प्रकल्पाची मान्यता घेण्यापूर्वी जागेपासून कोर्टापर्यंतच्या सर्व बाबी ‘क्लिअर’ असाव्यात, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारांना देण्यात आले आहेत.

दहशतवादी कृत्यांसाठी दरोड्यातील पैसा

$
0
0
दहशतवादी संघटनांकडून दहशतवादी कृत्यांसाठी लागणारा पैसा खंडणी, जबरी चोरी आणि दरोड्याच्या गुन्ह्यांच्या माध्यमातून उभा करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती तपास यंत्रणांसमोर आली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images