Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

डॉ. पूनावाला यांना जीवनगौरव पुरस्कार

0
0
‘पूनावाला ग्रुप अँड सिरम इन्स्टिट्यूट’चे अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना लस उद्योगातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘लाइफटाइम अचिव्हमेंट २०१३’ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

विद्यापीठ कामकाजावर ‘युनियन’चे दबाव तंत्र?

0
0
परीक्षा विभागातील गैरप्रकार, रेंगाळलेले निकाल, प्राध्यापक आंदोलनाने परीक्षांबाबतची अनिश्चितता अशा वातावरणात कामगार संघटनांच्या दबाव तंत्रामुळे पुणे विद्यापीठाच्या कामकाजाचा पुरता बोजवारा उडाला आहे, असा दावा वरिष्ठ प्राध्यापक, विभागप्रमुख, सिनेटच्या आजी-माजी सदस्यांकडून केला जात आहे.

हवेलीतील अभिलेखांचे ९९ टक्के स्कॅनिंग पूर्ण

0
0
हवेली तालुक्यातील दुर्मिळ अभिलेखांचे स्कॅनिंग करण्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असून यामध्ये तेवीस लाखाहून अधिक कागदपत्रांचे स्कॅनिंग आतापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे.

‘रेशन’चा अपहार केल्यास कारवार्इ जिल्हा प्रशासनाचा निर्णय

0
0
आधारकार्ड नाही म्हणून ग्राहकांना रेशनवरील धान्य आणि रॉकेल देण्यास मनाई करणाऱ्या रेशनदुकानदारांवर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

चिमुरडीचा बलात्कार करून खून करणारा मोकाटच

0
0
निगडी येथून तीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेला मे महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तीन वर्षांच्या अथक तपासानंतरही खुन्याची साधी माहिती मिळविण्यातही पोलिसांना यश आलेले नाही.

बीडीओवरून इंदापुरात रास्ता रोको

0
0
इंदापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असतानाच अंतर्गत राजकारणातून इंदापूरचे बीडीओ (गट विकास अधिकारी) किरण जाधव यांची तडकाफडकी गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे.

म्यूरल जागविणार चापेकर बंधूचे स्मरण

0
0
पुण्यातील नागरिकांवर अत्याचार करणाऱ्या ब्रिटीश अधिकारी रँडचा वध करणाऱ्या चापेकर बंधूंच्या स्मारकाच्या ठिकाणी त्या प्रसंगाची माहिती देणाऱ्या म्यूरल्सची उभारणी केली जाणार आहे.

स्टँप व्हेंडरवर बेकारीची कु-हाड?

0
0
राज्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कार्यान्वित होणाऱ्या ‘ई- एसबीटीआर’ (ई-सेक्युअर्ड बँक कम ट्रेझरी रिसीट) या नव्या संगणकीय पद्धतीमुळे राज्यातील पाच हजार ‘स्टँप व्हेंडर’वर उपासमारीची वेळ येणार आहे.

दहावीचा ‘निकाल’ टांगणीवर

0
0
राज्यभरातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी आपल्या मागण्यांसाठी दहावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांपाठोपाठ आता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालांविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.

वकिलांचे आज कामबंद आंदोलन

0
0
जयपूर आणि चंदीगड येथे वकिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यातील वकिलांनी सोमवारी कामकाजावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ने सोमवारी कामकाजावर बहिष्कार घालण्याचा ठराव संमत केला.

सीमा फुगेंचे नगरसेवकपद रद्द

0
0
जातीच्या बनावट प्रमाणपत्राद्वारे निवडणूक जिंकल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवडच्या नगरसेविका सीमा फुगे यांचे पद रद्द करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले आहेत.

पुण्याच्या बिल्डरला ‘टेरर कॉल’

0
0
इंडियन मुजाहिदीनचा ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवादी मोहसीन चौधरी याने पुण्यातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाला दहा कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करून धमकावले आहे.

पोलिस आयुक्तालयाची हद्दवाढ कधी?

0
0
उपगनगरामंध्ये गुंडगिरी वाढत असल्याचे वारंवार निदर्शनास आल्यानंतरही पुणे पोलिस आयुक्तालयाच्या द्दवाढीला अजूनही मुहूर्त सापडत नाही. उपनगरांत सातत्याने होत असलेल्या गुंडगिरीला आळा घालण्यात जिल्हा पोलिसांना अपयश येत आहे.

वुई बिलीव्ह इन जस्टिस

0
0
स्त्रीचं ‘व्यक्ती’ असणं आपण अजूनही संपूर्णपणे स्वीकारलेलं नाही. तिच्यासाठीच्या हक्कांचा आणि कायद्यांचा सन्मान करणं आपल्या मनात रुजलेलं नाही. पुरुषसत्ताक मानसिकतेतून बाहेर पडून विचार करायची कोणाचीच तयारी नाही. दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांसाठी असलेल्या कायद्यांमध्येही अजून परिपूर्णता नाही...

अतिक्रमणाविरोधात पालिकेची कारवाई

0
0
पालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाची कारवाई सुरूच असून, सोमवारी दिवसभरात बिबवेवाडी, नगर रोड, जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, एनडीए रस्ता आणि वानवडी भागात कारवाई करण्यात आली.

वाहनांच्या तोडफोडीतील आरोपी अद्यापही फरारी

0
0
आंबेगाव परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या त्या सहा आरोपींचा अद्यापही शोध सुरू आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि हवेली पोलिसांकडून आरोपींचा माग काढण्यात येत आहे.

खातेदार रक्षक समितीची मागणी

0
0
गोरगरिबांचे अडकलेले पैसे देण्यासाठी रुपी बँकेत ‘भुदरगड पॅटर्न’ राबविण्याबरोबरच बँकेच्या या स्थितीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी रुपी बँक खातेदार हक्क रक्षक समितीने केली आहे.

हल्ल्यांच्या निषेधार्थ वकिलांचा निषेध

0
0
जयपूर आणि चंडीगड येथील वकिलांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शिवाजीनगर कोर्टातील वकिलांनी सोमवारी कामकाजात सहभागी न होता लालफिती लावून निषेध नोंदविला. शिवाजीनगर कोर्टातील नवीन बिल्डिंगमधील बार रूममध्ये वकिलांची निषेध सभा घेण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘मडकी फोड’ आंदोलन

0
0
जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पाणीटंचाईची गंभीर समस्या असतानाही राजकीय दबावाला बळी पडत अधिकारी मंत्र्यांच्या तालुक्यासाठी पाणी‌सोडतात. लोकप्रतिनिधींना विचारात न घेता टंचाईच्या बैठका घेतल्या जातात. वेळोवेळी मागणी करूनही टँकर उपलब्ध करून दिले जात नाहीत.

पेपर तपासणीचा तिढा आणखी गंभीरच

0
0
बारावीचे पेपर तपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केलेल्या आवाहनाला निवृत्त शिक्षकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. त्यातच ज्युनिअर कॉलेज शिक्षकांच्या मागण्यांबाबत काहीच तोडगा दृष्टिपथात नसल्याने पेपर तपासणीचा तिढा आणखी गंभीर होत चालला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images