Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुणेरी रस्त्यांवर धावणार ‘हिरकणी’

$
0
0
जागतिक महिला दिनानिमित्ताने राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात असणाऱ्या निम आराम गाड्यांचे नामकरण करण्यात आले आहे. आता या बसेस ‘हिरकणी’ या नावाने धावणार आहेत.

महिलाप्रश्नी मुख्यमंत्र्यांची अळीमिळी गुपचिळी

$
0
0
राज्य महिला आयोगाचे अनेक वर्षांपासून रिक्त असलेले अध्यक्षपद, महिलादिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण घोषणा करतील, ही अपेक्षा अखेर फोल ठरली. अंगणवाड्यांपासून शहरातील महिलांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांची अळीमिळी गुपचिळीच राहिली.

उड्डाणपुल काम पुढील महिन्यात

$
0
0
उड्डाणपुलासह एक अंडरपास आणि दोन पादचारी भुयारी मार्गांच्या सुविधेसह उभारल्या जाणाऱ्या स्वारगेटच्या जेधे चौकातील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे भूमीपूजन पुढील महिन्यात होणार आहे.

‘नॅक’ने केलेले मूल्यांकन बदलले

$
0
0
‘नॅशनल असेसमेंट अँड अॅक्रिडेशन कौन्सिल’च्या (नॅक) अधिकृत समितीने केलेले मूल्यांकन बदलल्याचा प्रकार समोर आला आहे. उदयपूर येथील एका संस्थेच्या मूल्यांकनाबाबत हा प्रकार झाला असून, त्याची चौकशी करण्यासाठी ‘नॅक’ने समितीही नेमली आहे.

महिला धोरणात सुरक्षेवर भर

$
0
0
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या केसेस जलद निकाली काढण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट, महिलांसाठी जेंडर बजेट, अद्यावत वसतिगृहांसह पुरेशी स्वच्छतागृहे, सरकारी नोकरीत ५० टक्के आरक्षण व वयोमर्यादा ३८ वर्षे, महिला उद्योजकांकरिता स्वतंत्र वित्तीय महामंडळ... अशा अनेकविध तरतुदी राज्याच्या तिसऱ्या महिला धोरणात केल्या आहेत.

विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

$
0
0
गहुंजे गावच्या हद्दीतील पवना नदीत एका कॉलेजच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.

टेकड्याफोडीला आळा बसणार

$
0
0
शहराच्या हद्दीलगतच्या टेकड्या बेकायदेशीरपणे फोडण्याच्या ‘उद्योगां’ना आता लवकरच आळा बसणार आहे. टेकड्या भुईसपाट करण्याचे प्रकार थांबविण्यासाठी खणीकर्म विभागाचे पाच पथके स्थापन केली असून त्यांच्यामार्फत धडक कारवाई केली जाणार आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी हालचाली

$
0
0
मंत्रिमंडळ विस्तारात माणिकराव ठाकरे यांची वर्णी लागण्याची शक्यता असल्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. रोहिदास पाटील यांच्यासह काही इच्छुकांनी दिल्ली गाठल्याने या नव्या नियुक्तीच्या घडामोडींना वेग आला आहे.

बालभवन जागेसाठी मानवी साखळी

$
0
0
शहराच्या मध्यवस्तीत मुलांच्या खेळण्यासाठी असलेल्या मैदानावर राजकारण्यांचा डोळा असल्याने प्रशासनाच्या मदतीने वारंवार ‘बालभवन’ची जागा बळकावण्याचे प्रयत्न होत असल्याची तक्रार बहुसंख्य पालकांनी शुक्रवारी केली.

बारावीचा प्रश्न सुटला!

$
0
0
बारावीचे पेपर निवृत्त शिक्षकांकडून तपासून घेण्याचा पर्याय राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अवलंबला आहे. ज्युनिअर कॉलेज शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार सुरूच राहिल्याने बोर्डाने हे पाऊल उचलले आहे.

टीव्हीसाठीही ‘सेन्सॉरशिप’चा प्रस्ताव

$
0
0
‘हिंसाचाराबरोबरच चंगळवादी संस्कृतीला खतपाणी घालणाऱ्या चित्रपटांचा नवीन पिढीवर होणारा परिणाम घातक आहे. त्याच्याच जोडीला टीव्हीवरील कार्यक्रमांचाही दर्जा टिकवून ठेवणे आवश्यक आहे. म्हणूनच, चित्रपटांबरोबर टीव्हीसाठी सेन्सॉरशिप लावण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे’,अशी माहिती सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी दिली आहे.

...हा तर संगीत नाटकाचा गौरव

$
0
0
‘संगीत नाटक हाच माझ्या आईचा श्वास असून, आईचा हा सत्कार म्हणजे संगीत नाटकाचा गौरव आहे,’ अशी भावना ज्येष्ठ रंगकर्मी जयमाला शिलेदार यांच्या कन्या आणि रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांनी शनिवारी व्यक्त केली.

परीक्षा नियंत्रकांना हटविण्याची मागणी

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. संपदा जोशी यांना हटवून त्याजागी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, या प्रमुख मागणीसह विद्यापीठातील गैरप्रकार रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थाचालक प्रतिनिधी आणि विद्यापरिषद सदस्यांनी कुलगुरूंची भेट घेतली.

मिळकतकराची बिले वाटण्याचे काम ‘स्मार्ट’कडे

$
0
0
शहरातील साडेसात लाख मिळकतदारांना टॅक्सची बिले वाटपाचे काम महापालिकेच्याच नागरवस्ती विभागाकडील स्मार्ट संस्थेकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दर वर्षी सव्वालाख महिलांना ‘ब्रेस्ट कॅन्सर’

$
0
0
भारतात दर वर्षी सव्वालाख महिलांना ‘ब्रेस्ट कॅन्सर’ होत असल्याचे नव्याने आढळून आले असून त्यापैकी पन्नास टक्के महिलांचा उशिरा उपचारामुळे मृत्यू होत असल्याची माहिती देण्यात आली.

सॅनिटरी नॅपकिनच्या कचऱ्याबाबत ‘स्वच्छ’ चा आक्रमक पवित्रा

$
0
0
महिलांच्या आरोग्यासाठी सॅनिटरी नॅपकिन उपयोगी असले तरी त्यांची विल्हेवाट करणे आमच्यासाठी कि‍ळसवाणे काम ठरते आहे. नॅपकिन्सचे उत्पादन करणाऱ्या कंपनीनेच त्यांच्या विल्हेवाटीची जबाबदारी उचलावी, अशी मागणी स्वच्छ संस्थेने केली आहे.

परीक्षा नियंत्रकांना हटविण्याची मागणी

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक डॉ. संपदा जोशी यांना हटवून त्याजागी सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी, या प्रमुख मागणीसह विद्यापीठातील गैरप्रकार रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थाचालक प्रतिनिधी आणि विद्यापरिषद सदस्यांनी कुलगुरूंची भेट घेतली.

आंबेगाव परिसरात पुन्हा दहशत

$
0
0
दारूच्या बिलावरून सराईत गुंड व त्याच्या साथीदारांनी आंबेगाव दत्तनगरमधील हॉटेल चंद्रभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली. मारहाणीच्या प्रकारानंतर या गुंडांनी दगडफेक करीत परिसरातील २७ गाड्यांची मोडतोड केली. त्यांना रोखण्यास गेलेल्या पोलिसांवरही त्यांनी हल्ला चढविला.

लैंगिक गुन्ह्यात इन कॅमेरा सुनावणी पुरेशी नाही

$
0
0
‘लैंगिक गुन्ह्यांमध्ये प्रत्येक वेळी इन कॅमेरा सुनावणी पुरेशी नसते. काहीवेळा न्यायाधीशांच्या कक्षात सुनावणी घेणे गरजेचे असते,’ असे विचार न्यायमूर्ती रोशन दळवी यांनी शनिवारी व्यक्त केले.

साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. माधवी वैद्य

$
0
0
साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी चाललेली स्पर्धा अखेर शनिवारी पेल्यातल्या वादळानुसार थंडावली अन् सलग दुसऱ्यांदा महिला अध्यक्षा म्हणून डॉ. माधवी वैद्य यांची सर्वानुमते निवड झाली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images