Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

वक्फ बोर्डाचे कार्यालय व्हावे

$
0
0
वक्फ बोर्डाचे कार्यालय व ट्रिब्युनल कोर्ट पुण्यामध्ये सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी वक्फ बोर्ड बचाव कृती समितीतर्फे १४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.

डेक्कनवर PMCने तरुणीला चिरडले

$
0
0
डेक्कन बसस्टॅण्डवर बस पकडण्याचा प्रयत्न करणारी पंचवीस वर्षीय तरुणी ‘पीएमपी’ बसच्या पाठीमागील चाकाखाली चिरडली गेल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. मूळची कर्नाटक येथील असलेली ही तरुणी पुण्यात सॉफ्टवेअर टेस्टिंगचा कोर्स करत होती.

भवानी पेठेत ३ तरुणींचा विनयभंग

$
0
0
नवीन संगमवाडी रोडवर वेगवेगळ्या दुचाकींवर चाललेल्या तीन तरुणींची छेड काढल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. नागरिक आणि पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करून त्यांना गजाआड करतानाच चोपही दिला.

कार्बन फूटप्रिंट दरडोई १.४६

$
0
0
पुण्यात होत असलेल्या कार्बन उत्सर्जनामध्ये पुणेकरांच्या जीवनशैलीचा सर्वाधित म्हणजेच ६१ टक्के वाटा असून उद्योगक्षेत्राचे प्रमाण केवळ ८ टक्के आहे.

माकपचा सरकारला इशारा

$
0
0
‘केंद्र सरकार काळ्या पैशावर कारवाई करू शकत नसेल, तर त्यांनी सत्तेवरून पायउतार व्हावे,’ अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष प्रा. अजित अभ्यंकर यांनी केली आहे.

रस्ते न सुधारल्यास टोलनाके बंद करणार

$
0
0
महामार्गावर साइनबोर्डचा अभाव, ब्लँक टर्न, दुभाजकांमधील झाडांचे वाढलेले प्रमाण, अपघातांना निमंत्रण देणारी रस्त्यांवरील अतिक्रमणे, टोलनाक्यांवर होणारी गर्दी आणि पर्यायाने कायदा-सुव्यवस्थेचा निर्माण होणारा प्रश्न यावरून विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.

मिळकतकराची बिले वाटण्याचे काम ‘स्मार्ट’कडे

$
0
0
शहरातील साडेसात लाख मिळकतदारांना टॅक्सची बिले वाटपाचे काम महापालिकेच्याच नागरवस्ती विभागाकडील स्मार्ट संस्थेकडे सोपविण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांत बिलवाटपातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘एड्नेक्सा’तर्फे रविवारी सेमीनार

$
0
0
इयत्ता नववीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘एड्नेक्सा’ या ऑनलाइन एज्युकेशन क्षेत्रातील संस्थेने येत्या रविवारी (१० मार्च) ‘नववीत जाताना’ या विषयावर विनामूल्य मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे.

बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. राजेंद्र उमाप

$
0
0
‘पुणे बार असोसिएशन’च्या अध्यक्षपदी अॅड. राजेंद्र उमाप नुकतीच निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी अॅड. सतीश पैलवान, अॅड. अमोल जाधव यांची निवड करण्यात आली आहे.

बेकायदा टेकड्याफोडीला आळा बसणार

$
0
0
शहराच्या हद्दीलगतच्या टेकड्या बेकायदेशीरपणे फोडण्याच्या ‘उद्योगां’ना आता लवकरच आळा बसणार आहे. टेकड्या भुईसपाट करण्याचे प्रकार थांबविण्यासाठी खणीकर्म विभागाचे पाच पथके स्थापन केली असून त्यांच्यामार्फत धडक कारवाई केली जाणार आहे.

४००० अतिक्रमणांवर पोलिसांच्या कारवाईचा बडगा

$
0
0
बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र करतानाच रस्त्यांवरील अतिक्रमणांवरही आपले लक्ष केंद्रीत केले आहे.

स्वारगेट उड्डाणपुलाचे भूमीपूजन पुढील महिन्यात

$
0
0
उड्डाणपुलासह एक अंडरपास आणि दोन पादचारी भुयारी मार्गांच्या सुविधेसह उभारल्या जाणाऱ्या स्वारगेटच्या जेधे चौकातील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे भूमीपूजन पुढील महिन्यात होणार आहे.

पाण्याचा गैरवापर रोखणार ‘गस्ती पथक’

$
0
0
बांधकाम व्यावसायिक, हॉटेल आणि वॉशिंग सेंटर अशा व्यावसायिक ठिकाणी पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेतर्फे गस्ती पथके नियुक्त केली जाणार आहेत. पिण्याच्या पाण्यात कोणतीही कपात न करता बेकायदा पाणी वापरणाऱ्यांवर निर्बंध घातले जाणार आहेत.

महिला सकारात्मक दिन हवा

$
0
0
‘महिला सुरक्षित नसल्याचे नकारात्मक वातावरण सर्वत्र पसरले आहे. मात्र सकारात्मक विचार केला, तरच हे चित्र बदलेल. केवळ महिलादिन म्हणून साजरा करण्याऐवजी तो महिला सकारात्मक दिन म्हणून साजरा करायला हवा,’ असे विचार कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादीचे ‘फिप्टी-फिप्टी’

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची भाषा करीत असले, तरी काँग्रेसबरोबरील आघाडी गृहीत धरूनच धोरण आखले जात आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपात २८८पैकी १४५ जागा पदरात पाडून घेण्याची आणि याबाबत तडजोड न झाल्यासच स्वबळावर लढण्याची व्यूहरचना केली जात आहे.

सिंचन व्यवस्थेची धोरणे बदलणार

$
0
0
‘दुष्काळावर मात करण्यासाठी कायमस्वरूपी सिंचन व्यवस्थेची धोरणे बदलावी लागतील,’ असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी सांगितले. दुष्काळावरील उपाययोजनेसाठी राज्याच्या येत्या बजेटमध्ये भरीव तरतूद करणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.

आमदारांचे लक्ष मतदारसंघावरच

$
0
0
राज्य विधिमंडळाच्या येत्या सोमवारपासून (११ मार्च) सुरू होणाऱ्या अधिवेशनात शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी पालिका आयुक्तांनी शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत आमदारांनी स्वतःच्या मतदारसंघातील प्रश्नांची पोळी भाजून घेतली.

अलका थिएटरमध्ये बॉम्बच्या अफवेने गोंधळ

$
0
0
राज्य शासनाच्यावतीने शुक्रवारी सकाळी अलका टॉकीज येथे आयोजित करण्यात आलेल्या चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनाला बॉम्बच्या अफवेचा फटका बसला. उद्घाटन होण्यास काही वेळ उरला असतानाच पोलिसांनी धावाधाव करत थिएटरची कसून तपासणी केल्यावर उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.

उन्हाचा चटका दोन दिवस कायम

$
0
0
किमान तापमानासह कमाल तापमानातही वाढ झाल्याने शुक्रवारी पुणेकरांना उन्हाचा चटका जाणवला. शहरात ३६.७ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली.

स्वारगेट बसस्टँडवर रिक्षाची प्रीपेड सेवा

$
0
0
म. टा. प्रतिनिधी, पुणे प्रवाशांच्या सोयीसाठी वाहतूक पोलिस आणि आरटीओने स्वारगेट बस स्टॅन्डवर रिक्षाची प्रीपेड सेवा सुरू केली आहे. प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा, म्हणून ही सेवा सुरू करण्यात आल्याचे वाहतूक पोलिस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images