Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

चेकबुकच्या संभ्रमाने चेकमेट

$
0
0
बनावट चेकद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी आणि चेक क्लिअरिंगची प्रक्रिया वेगाने होण्यासाठी सुरू होणाऱ्या ‘‘चेक ट्रंकेशन सिस्टीम’ला (सीटीएस २०१०) मुदतवाढ मिळणार नसल्याचे रिझर्व्ह बँकेने बँकांना कळविले आहे.

नेट-सेटग्रस्तांना सशर्त दिलासा

$
0
0
बिगरकृषी विद्यापीठे आणि संलग्न अनुदानित कॉलेजांमधील नेट-सेट अपात्र शिक्षकांच्या सेवा काही अटींवर नियमित करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. तरीही आपल्या सर्व मागण्या पूर्ण झाले नसल्याचे कारण देत प्राध्यापक संघटनेने रात्री उशिरापर्यंत संप मागे घेतलेला नव्हता.

पाणी प्रकल्प निधीलाही कात्री

$
0
0
महापालिकेच्या बजेटमध्ये आयुक्तांनी पाणीपुरवठा योजनांसाठी सुचविलेल्या तरतुदींनाही स्थायी समितीने सुमारे ८० कोटी रुपयांची कात्री लावल्याचे समोर आले आहे.

...तर १ एप्रिलपासून केबल बंद

$
0
0
सेट टॉप बॉक्स बसविण्याबाबत केबलचालकांच्या संघटनांमध्येच मतभेद निर्माण झाल्यामुळे ३१ मार्चपर्यंत सर्वच्या सर्व ग्राहकांना सेट टॉप बॉक्स बसवून मिळण्याबाबत शंका निर्माण झाली आहे.

विद्यापीठांना मूल्यांकन सक्ती

$
0
0
देशातील विद्यापीठे आणि कॉलेजांना मूल्यांकन करून घेणे आता सक्तीचे आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाचा (यूजीसी) या संदर्भातील अधिनियम नुकताच अधिसूचित करण्यात आला आहे.

आरोपी पळाल्याची कोर्टात अफवा

$
0
0
शिवाजीनगर कोर्टात बुधवारी एका कोर्टासमोर खुनाच्या केसची सुनावणी सुरु असताना दोन आरोपी पळून गेल्याची अफवा कोर्टाच्या आवारात पसरली होती.

स्त्री शक्तीचा सन्मान केल्यास समाजात चांगले बदल

$
0
0
स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचे तत्त्व स्वीकारल्यास समाजात चांगले बदल होतील, असे मत राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.

मिळकतकराची बिले वाटण्याचे काम ‘स्मार्ट’कडे

$
0
0
शहरातील साडेसात लाख मिळकतदारांना टॅक्सची बिले वाटपाचे काम महापालिकेच्याच नागरवस्ती विभागाकडील स्मार्ट संस्थेकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एलबीटी विरोधातील ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) आणि किरकोळ विक्री क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीस विरोध नोंदविण्यासाठी पूना मर्चंट्स चेंबरने गुरुवारी पुकारलेल्या लाक्षणिक ‘बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

‘टाटा कमिन्स’च्या महिला ‘शॉप फ्लोअर’वरही

$
0
0
सतत येणारे आवाज, तुलनेत कमी सुविधा असणारी कामाची जागा, बुद्धीबरोबर शक्तीची परीक्षा घेणारी जागा, आठ तास उभे राहून काम अशा महिलांसाठीच्या प्रतिकूल वातावरणाला आपलेसे करून काही करून दाखविण्याच्या हेतूने महिला शक्ती ‘शॉप फ्लोअर’वर सेकंड शिफ्टमध्ये काम करण्यास सरसावली आहे.

विनयभंगप्रकरणी एक महिना सक्तमजुरी

$
0
0
एका बावीस वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी बोपोडी येथील एका व्यक्तीला एक महिना सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. खडकी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. राजेभोसले यांनी हा निकाल दिला.

रावेरच्या विद्यार्थ्याचा पुणे विद्यापीठात मृत्यू

$
0
0
स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या मुश्ताक रुबाब तडवी या विद्यार्थ्याचा पुणे विद्यापीठात बुधवारी रात्री मृत्यू झाला. जेवताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती त्याच्या मित्रांकडून गुरुवारी देण्यात आली.

करमणूक कर माफीसाठी मराठीची सक्ती

$
0
0
राज्यातील एक पडदा चित्रपटगृहांना करमणूक कर शुल्कात माफी देताना त्यांना किमान एक महिनाभर मराठी चित्रपट दाखविण्याचे बंधन घालण्यात आले आहे. ही करमाफी घेणाऱ्या चित्रपटगृहांनी एक ‍वर्षाच्या आत योग्य आसन व्यवस्थेसह डॉल्बीसारख्या अत्याधुनिक सुविधा देणे आवश्यक करण्यात आले आहे.

डीपीवरून कोर्टकचेऱ्यांना सुरुवात

$
0
0
शहराच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा (डीपी) प्रकाशित होण्यापूर्वी कोर्टात पोहोचला आहे. हा आराखडा तयार करण्यास दिलेली मुदतच कायद्यानुसार उलटून गेली असल्याचा दावा करीत परिसर या स्वयंसेवी संस्थेने हायकोर्टात धाव घेतली आहे.

‘गरवारे बालभवना’चे संचालन टेंडरद्वारेच

$
0
0
सारसबागेसमोरील जागेत गेली अनेक वर्षे ‘गरवारे बालभवन’ चालविणाऱ्या ओम चॅरिटेबल ट्रस्टला यापुढील काळात बालभवन चालविण्यास देता येणार नाही, असा अभिप्राय पुणे महापालिकेच्या प्रशासनाने दिला आहे.

‘कलाद्वयी’तर्फे जयमाला शिलेदार यांचा सत्कार

$
0
0
नाट्यसंगीत क्षेत्रात मौल्यवान कामगिरी करूनही कधीही प्रसिद्धीच्या मागे न लागणारं आणि अत्यंत अलिप्त राहाणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे जयमाला शिलेदार! त्यांनी कायम कार्य ‘सिद्धीस’ नेण्याची धडपड केली, ‘प्रसिद्धी’ची नाही. हेच त्यांचं मोठेपण असल्याचं मत माजी आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केलं.

लोणावळ्यात अपघातात दाम्पत्य ठार

$
0
0
जुन्या मुंबई- पुणे राष्ट्रीय मार्गावर लोणावळ्यात मोटारसायकल व पाण्याच्या टँकरच्या अपघातात एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची दोन वर्षाची चिमुरडी सुदैवाने बचावली. हा अपघात गुरुवारी ( सात मार्च ) दुपारी पावणेतीनच्या सुमारास झाला.

‘मैफल’... कॅन्सरग्रस्तांची...

$
0
0
नैराश्याच्या दुष्टचक्रात अडकणाऱ्या महिलांना आयुष्याकडे बघण्याची नवी दृष्टी देण्यासाठी ‘आस्था सपोर्ट’ ग्रुपच्या पेशंट महिला आणि डॉक्टरांनी एकत्र येऊन ‘हीलिंग हार्मनी’ हा अनोखा संगीत मैफलीचा उपक्रम पुण्यात सुरू केला आहे.

‘टेकसॅव्ही’ आम्ही साऱ्या

$
0
0
इंजिनीअरिंगच्या मोठ-मोठ्या मशिनरीज फक्त मुलंच हँडल करू शकतात असं काही नाही. आता आम्हीही त्या वापरू शकतो, अगदी आम्हाला हव्या त्या पद्धतीने...

दुष्काळग्रस्तांसाठी धान्य संकलन

$
0
0
साने गुरूजी तरूण मंडळ आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानतर्फे मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त गावांना धान्यदान करण्यात येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images