Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुणे क्राइम डायरी

0
0
भारतीय मजदूर महासंघाचे महाराष्ट्र प्रादेशिक कायार्लयातील तिजोरी फोडून चोरट्यांनी ५५ हजार रुपयांचा माल चोरुन नेला. नारायण पेठेतील विश्वकर्मा भवन येथे ही घटना घडली.

बालकांवरील लैंगिक अपराध न कळविल्यास कारवार्इ

0
0
शालेय बालकांवर होणाऱ्या लैंगिक अपराधाची माहिती स्थानिक पोलिसांना न कळविल्यास संबंधित शैक्षणिक संस्थांवर दंडनीय व फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

‘पीयूसी’साठी लागणार ‘ऑनलाइन टेस्ट’

0
0
प्रदूषण नियंत्रणाखाली असल्याच्या (पीयूसी) प्रमाणपत्रासंदर्भात परिवहन खाते गंभीर झाले असून, या प्रमाणपत्रासाठी आता वाहनांची ‘ऑनलाइन’ टेस्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या योजनेमुळे बेकायदा ‘पीयूसी’ सेंटर्सना ‘ब्रेक’ लागणार असून, परिणामी, वाहनचालकांची फसवणूकही टळणार आहे.

...तर ग्रामीण मुलींचे शिक्षणातील प्रमाण वाढेल

0
0
‘ग्रामीण भागातील शाळा दूर असल्याने मुलींच्या सुरक्षिततेसाठी मुलींचे शिक्षण अर्ध्यावर सोडले जाते. ही परिस्थिती बदलण्यासाठी मोफत बसेसची व्यवस्था केली तर ग्रामीण मुलींचे शिक्षणातील प्रमाण नक्कीच वाढेल,’ असे मत इंदापूर येथील यशस्विनी सामाजिक अभियानाच्या तालुका समन्वयक सीमा कल्याणकर यांनी व्यक्त केले.

सेवानिवृत्त प्राध्यापकांचाही बोर्डाला ठेंगा

0
0
राज्यातील ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे निर्माण झालेला तिढा सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सेवानिवृत्त प्राध्यापकांना पेपर तपासणीसाठीचे आवाहन केले.

आता दुष्काळ कळणार जूनमध्येच

0
0
दुष्काळाची पूर्वकल्पना मिळत नसल्यामुळे देशाचे आर्थिक आणि सामाजिक नुकसान किती होऊ शकते याचा अनुभव सध्या संपूर्ण महाराष्ट्र घेत आहे. पुण्यातील दोन मराठी हवामानशास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून मात्र आता जूनच्या अखेरीसच हंगामात दुष्काळ राहणार की नाही हे समजू शकणार आहे.

शहरभर दुमदुमला स्त्री-शक्तीचा जागर

0
0
जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील स्वंयसेवी संस्था आणि संघटनांतर्फे वैविध्यपूर्ण उपक्रम राबवून महिलांचा सन्मान करण्यात आला.

आंबेगाव परिसरात पुन्हा दहशत

0
0
आंबेगाव परिसरात हॉटेल चंद्रभागामध्ये गोंधळ घालीत कर्मचाऱ्यांना मारहाण, गाड्यांची तोडफोड व पोलिसांवर हल्ला करणारे सराईत गुन्हेगार अमित कांता चोरगे (रा. आंबेगाव पठार), करण ऊर्फ बॉबी रोहिदास पाटोळे (रा. तळजाई वसाहत), हर्षद धनावड, विशाल ढमाले आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध हवेली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनंत गाडगीळ यांची पक्षाकडून उपेक्षा

0
0
‘अनेक वर्षे काम केल्यानंतरही शहर काँग्रेसकडून आपली उपेक्षा सुरूच राहिली, तर आपल्यालाही राजकीय भवितव्याबाबत लवकरच निर्णय घ्यावा लागेल,’ असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

प्रचीती गुलजार नावाच्या विचाराची!

0
0
‘मी बदलणार नाही असे म्हटले, तरी परिस्थिती बदलवतेच. आज काँक्रिटचे जंगल वाढत असताना मी जर ‘मैं तुलसी तेरे आँगन की’ हे गीत लिहिलं तर? आणि मोबाइल, एसएमएसच्या दुनियेत ‘डाकिया डाक लाया’ लिहिलं तर? साहाजिकच ते मनाला भावणार नाही... मी कोणत्याही एकाच पक्षाला किंवा त्याच्या तत्त्वाला मानत नाही.

नोकरीचे आमिष दाखवून बारा जणांची फसवणूक

0
0
‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’मध्ये कम्प्लायन्स डिपार्टमेंट, इक्विटी रिसर्च डिपार्टमेंट आणि एम. आय. एस. रिपोर्टिंग विभागामध्ये नोकरी लावतो,’ असे खोटे सांगून, पिंपरीतील बारा जणांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इरण्णा हनुमंत भुसनुरे (वय २४, रा. शिवनगरी, चिंचवड) यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

गणेश वंदना, शिवतांडवसह महाशिवरात्र साजरी

0
0
आकर्षक पेहराव करत नृत्य सादर करतानाच महिला वर्गाने स्टेजवर ‘मला जाऊ दे’ यावर डान्स सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. गणेश वंदना, शिवतांडव यासह अनेक हिंदी मराठी गाण्यांवर सादर करण्यात आलेल्या नृत्याविष्कार बघत नागरिक रंगून गेले.

‘औषधविक्रीची मार्गदर्शक तत्वे ठरवावीत’

0
0
फार्मासिस्टच्या उपस्थितीवरून औषध विक्रेते आणि अन्न व औषध प्रशासन (एफडीए) समोरासमोर उभे ठाकले आहेत. त्यानिमित्ताने आंदोलनाचे हत्यार हातात घेण्याची वेळ औषध विक्रेत्यांवर आली. यात नेमके कोण चुकते? काय करावे, याबाबत अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्याशी साधलेला संवाद...

नव्या पद्धती पायंड्यांमुळे प्रकाशन व्यवसाय धोक्यात

0
0
प्रकाशन व्यवसायात नवीन पायंडे पाडले जाणे गंभीर असून, अशा परिस्थितीत चांगल्या संस्थांना काम करणे कठीण जात असल्याची भावना प्रकाशकांनी व्यक्त केली.

हजारो भाविकांनी घेतले भीमाशंकरचे दर्शन

0
0
महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर येथे राज्याच्या विविध भागांतून तसेच परराज्यातून आलेल्या हजारो भक्त भाविकांनी ‘हर हर महादेव’ च्या गजरात ज्योतिर्लिंग भीमाशंकरचे दर्शन घेतले.

‘एक्स्प्रेस वे’ वर पाच हजारजणांवर कारवाई

0
0
‘एक्स्प्रेस वे’वर खालापूर ते उर्से टोलनाक्यापर्यंतचे अंतर अर्धा तासाच्या आतमध्ये पार करणाऱ्या पाच हजार वाहनचालकांवर महामार्ग पोलिसांनी कारवाई केली आहे. ‘एक्स्प्रेस वे’वरील अपघातांमध्ये वाढ झाल्यानंतर महामार्ग पोलिसांनी डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान सातत्याने विशेष मोहिमांचे आयोजन केले होते.

पालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांमध्ये हिमोग्लोबीनची कमतरता

0
0
पुणे महानगरपालिकेत विविध विभागांत काम करणाऱ्या महिलांपैकी ८५ महिलांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण दहा ग्रॅमपेक्षा कमी असल्याचे दिसून आले, तर तीन महिलांना रक्तदाबाचा आजार असल्याचे आढळले.

प्रकल्पांना डेडलाइन तीन वर्षांचीच

0
0
केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी मिळण्यात येणारी अडचण, जागा ताब्यात नसल्याने होणारा खोळंबा आणि कोर्टातील प्रकरणांमुळे होणारा विलंब... या अडचणी लक्षात घेऊन जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजनेत (जेएनएनयूआरएम) नव्या प्रकल्पाची मान्यता घेण्यापूर्वी जागेपासून कोर्टापर्यंतच्या सर्व बाबी ‘क्लिअर’ असाव्यात, असे स्पष्ट निर्देश राज्य सरकारांना देण्यात आले आहेत.

चंदन खरेदी-विक्री बंदीमुळे आयुर्वेदिक उत्पादनांना खीळ

0
0
औषधी गुणधर्म असलेल्या चंदनाच्या खरेदी-विक्रीवर केंद्र सरकारच्या वन खात्याने बंदी आणल्याने राज्यात चंदनापासून तयार होणाऱ्या विविध आयुर्वेदिक औषधनिर्मितीला खीळ बसली आहे.

एमबीए’ प्रवेश परीक्षेला पुन्हा ‘वन्स मोअर’!

0
0
अपेक्षेपेक्षा खूपच कमी प्रमाणात झालेली नोंदणी आणि परिणामी ‘एमबीए’च्या भरमसाठ जागा रिक्त राहण्याच्या भीतीमुळे ‘कॉमन मॅनेजमेंट अॅडमिशन टेस्ट’ अर्थात ‘सीमॅट’ ही परीक्षा यंदाच्या शैक्षणिक वर्षात तिसऱ्यांदा घेतली जाणार आहे. ही तिसरी ‘सीमॅट’ १९ ते २२ मे यादरम्यान होणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images