Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

UPSC पूर्वपरीक्षा २६ मे रोजी

$
0
0
यंदा पहिल्यांदाच परीक्षेच्या नोटिफिकेशनसाठी लाखो विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’ पाहणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाने अखेर मंगळवारी परीक्षेचे नोटिफिकेशन जारी केले आहे. त्यानुसार २६ मे रोजी पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे. मुख्य परीक्षेच्या स्वरूपामध्येही काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

‘अलमट्टी’चा अहवाल लवकरच

$
0
0
सोलापूर जिल्ह्यातील दहा लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी कर्नाटक येथील अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याच्या महाराष्ट्राच्या मागणीवर कर्नाटक येथील जलसंपदा खात्याच्या टेक्निकल टीमने विभागीय आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांशी सोमवारी चर्चा केली. या बैठकीत झालेल्या तांत्रिक चर्चेचा अहवाल दोन दिवसात राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असून, त्यानंतरच पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

परीक्षकांचा बहिष्कार सुरूच

$
0
0
ज्युनिअर कॉलेज शिक्षकांचा बारावीच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार सुरूच राहिल्याने त्याचा निकालावर परिणाम होणार का, अशी शंका आता पालक आणि विद्यार्थ्यांना सतावू लागली आहे. पाच जूनच्या आत निकाल लावण्याचे बंधन पाळायचे असल्याने बोर्डातील अधिकारीही चिंतातूर आहेत. मात्र, निकाल वेळेतच लावणार असल्याचा पुनरुच्चार राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे करण्यात आला आहे.

आता येतोय ‘पँनस्टार्स’ धूमकेतू

$
0
0
पृथ्वीच्या अत्यंत जवळून गेलेल्या लघुग्रहानंतर आता संध्याकाळच्या आकाशात धूमकेतूचे आगमन होणार आहे. येत्या सात ते २० मार्च या कालावधीत पश्चिम क्षितिजावर ‘पँनस्टार्स’ नावाचा धूमकेतू येत असून, हा धूमकेतू साध्या डोळ्यांनीही दिसण्याची शक्यता आहे.

खुनातून मुक्त; चोरीसाठी शिक्षा

$
0
0
एका महिलेचे दागिने चोरुन तिचा खून केल्याच्या प्रकरणामध्ये कोर्टाने दोन आरोपींची खूनाच्या गुन्ह्यातून मुक्तता केली असून चोरीच्या गुन्ह्यात या आरोपींना एक वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

राज्यात उकाडा, पुण्यात गारवा

$
0
0
शहर आणि परिसरात दुसऱ्या दिवशीही गारवा कायम होता. किमान तापमान मंगळवारी १०.६ अंशांवर स्थिरावले. मात्र, राज्यात बहुतांश ठिकाणी उकाड्यात वाढ झाली आहे. राज्यातील सर्वाधिक ४०.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद भिरा येथे झाली.

...म्हणून सर्वाधिक अपघात

$
0
0
एसटी बसेसच्या अपघातांसाठी वेगमर्यादेचे उल्लंघन आणि ओव्हरटेकिंगचे प्रमाण सर्वाधिक राहिले असल्याचे निरीक्षण खुद्द एसटीच्याच अहवालात नोंदविण्यात आले आहे. तसेच, अपघाताच्या नुकसान भरपाईपोटी ६८ कोटी रुपये द्यावे लागले आहेत.

स्टेट बँकेला आग

$
0
0
शॉर्ट सर्किटमुळे बुधवारी पहाटे टिळक रोडवरील स्टेट बँकेच्या शाखेला आग लागली. नागरिकांनी सतर्कतेमुळे आणि पोलिस, फायरब्रिगेड घटनास्थळी वेळीच पोचल्याने मोठी हानी टळली.

‘डिपेक्स’मध्ये एकवटली इंजिनीअर्सची ‘तंत्र’शक्ती

$
0
0
‘वंदे मातरम्’ च्या मंत्रशक्तीला युवा इंजिनीअर्सच्या तंत्रशक्तीची मिळालेली जोड... इंजिनीअरिंग, पॉलिटेक्निक, कृषी आणि विज्ञान क्षेत्राशी निगडित नानाविध विषयांवरील तब्बल ४२७ प्रकल्प... आणि हे प्रकल्प सुरळीत सुरू राहण्यासाठी झटणारे दीड हजारांहून अधिक यंग इनोव्हेटर्स!

आधार मिळूनही स्कॉलरशिपचे ‘कल्याण’

$
0
0
आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती देऊनही संबधित महाविद्यालयांनी समाजकल्याण विभागाला प्रस्ताव न पाठविल्याने विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळण्यास नवे ‘विघ्न’ निर्माण झाले आहे. पुण्यातील अकरा हजार विद्यार्थ्यांना कॉलेजच्या उदासीनतचेचा फटका बसणार आहे.

अतिक्रमण कारवाईचा बुलडोजर सुसाट

$
0
0
शहराच्या विविध भागांमध्ये अतिक्रमणांच्या विरोधातील मोहीम सुरूच असून बुधवारी सिंहगड रोडसह विविध भागांमध्ये कारवाई करण्यात आली.

राष्ट्रवादीत नाराजीनामे बराटे-केमसेंना विधी समिती नको

$
0
0
महापालिकेतील पदांच्या नियुक्तींवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी उफाळून आली आहे. विधी समितीवर नियुक्ती करण्यात आलेल्या दोन ज्येष्ठ सदस्यांनी समितीच्या सदस्यत्वाचे बुधवारी राजीनामे पाठवून दिले.

आत्याला रिव्हॉल्वर दाखविणाऱ्याला अटक

$
0
0
कोर्टातील केसमध्ये पराभव होण्याच्या भीतीने चिडून ६८ वर्षीय आत्याला रिव्हॉल्वरचा धाक दाखविणाऱ्या भाच्याला अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर कोर्टात मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला.

‘पीयूसी’साठी करावी लागणार ‘ऑनलाइन टेस्ट’

$
0
0
प्रदूषण नियंत्रणाखाली असल्याच्या (पीयूसी) प्रमाणपत्रासंदर्भात परिवहन खाते गंभीर झाले असून, या प्रमाणपत्रासाठी आता वाहनांची ‘ऑनलाइन’ टेस्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सोनसाखळी चोरीचे दोन दिवसांत सात गुन्हे

$
0
0
पुणे शहरात गेल्या दोन दिवसांत सोनसाखळी हिसकावण्याचे सात गुन्हे घडले असून आरोपींनी सुमारे तीन लाख रुपयांचा ऐवज लुटला आहे. गुन्हे शाखेच्या सोनसाखळी विरोधी पथकाची पुनर्बांधणी करण्याची सहआयुक्त संजीवकुमार सिंघल यांनी केलेली घोषणा हवेतच विरली असून सोन साखळी चोरांनी शहरात अक्षरशः उच्छाद मांडला आहे.

स्कुबा डायव्हिंगचे प्रशिक्षण घ्या पुण्यातही

$
0
0
पुणे आणि अवली पुणेकर ही सगळ्या जगात ओळखली जाणारी गोष्ट, पुणेकरांची उत्सुकता काय घडवू शकते याचा दाखला म्हणजे आता स्कुबा डायव्हिंग डेस्टिनेशन अशी पुण्याची नवी ओळख होऊ लागली आहे.

‘एलबीटी’च्या विरोधात आज व्यापाऱ्यांचा बंद

$
0
0
स्थानिक संस्था कर (एलबीटी) आणि किरकोळ विक्री क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीस विरोध करण्यासाठी पूना मर्चंट्स चेंबरने आज (गुरुवारी) लाक्षणिक बंद पुकारला आहे.

कुकडीतून नगर, सोलापूरला पाणी

$
0
0
कुकडी प्रकल्पातील धरणांतून सोलापूर व नगरला पिण्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय मुंबईत बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयानुसार अडीच टीएमसी पाणी फक्त पिण्यासाठी सोडण्यात येणार आहे.

स्टेट बँकेच्या शाखेला आग

$
0
0
शॉर्ट सर्किटमुळे बुधवारी पहाटे टिळक रोडवरील स्टेट बँकेच्या शाखेला आग लागली. नागरिकांनी सतर्कतेमुळे आणि पोलिस, फायरब्रिगेड घटनास्थळी वेळीच पोचल्याने मोठी हानी टळली.

DP ठरावावर NGOची टीका

$
0
0
विकास आराखड्यातील आरक्षणे ठरविताना फाळणी अधिकृत फाळणी किंवा मंजूर लेआऊट मागविण्यामागे काय हेतू आहे, असा प्रश्न नागरी हक्क समितीच्या वतीने विचारण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images