Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘रुपी’चे व्यवहार पूर्ववत करा

$
0
0
‘रूपी बँकेवर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सचोटीने व्यवसाय करणारे व्यावसायिक आणि खातेदार अडचणीत आले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे कर्ज, ओव्हरड्राफ्ट नसलेल्या खात्यांचे व्यवहार पूर्ववत करण्यात यावेत,’ अशी मागणी शिवसेनेच्या उद्योग व सहकार आघाडीतर्फे सहकार आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

होळीसाठी जादा ST गाड्या

$
0
0
होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळातर्फे १९ ते २३ मार्च दरम्यान जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. स्वारगेट बसस्थानकावरून या गाड्या सुटणार आहेत.

कंडक्टरने परत केली दागिन्यांची पिशवी

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) बसमध्ये विसरलेली सुमारे एक लाख दहा हजार रुपयांच्या दागिन्यांची पिशवी कंडक्टरच्या प्रामाणिकपणामुळे प्रवाशाला पुन्हा मिळू शकली.

चित्रपटांचा महोत्सव

$
0
0
जागतिक महिला दिन आणि भारतीय चित्रसृष्टीच्या शतकमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून आठ ते दहा मार्च या कालावधीत नामवंत महिला दिग्दर्शकांच्या चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आयाम क्रिएशन आणि आशय फिल्म क्लबच्या वतीने होणारा हा महोत्सव राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात (एनएफएआय) होणार आहे.

चार लाखांच्या स्कॉलरशिपसह जपानला भरारी

$
0
0
पुणेकर विद्यार्थी पदवी शिक्षणासाठी पौर्वात्य देशांकडेही गांभीर्याने पाहू लागल्याची खूण आता दिसू लागली आहे. दुर्गेश दरेकर या विद्यार्थ्याने जपानची ‘एक्झामिनेशन फॉर जॅपनीज युनिव्हर्सिटीज’ (ईजेयू) ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान पटकाविला असून तो ऑगस्टमध्ये वार्षिक चार लाख रुपये एवढ्या घसघशीत स्कॉलरशिपसह जपानला रवाना होईल.

घटस्फोटाने सुटल्या निरगाठी

$
0
0
कमवत्या पत्नीने त्याच्या परवानगीने दोघांच्या संसारासाठी घेतलेल्या घरात जाण्यासाठी त्याचे मन तयार होईना... तिची कमाई आपल्या हातात पडत नाही याचे शल्य त्याच्या मनात असल्यामुळे त्यांचा संसार घटस्फोटापर्यंत पोहचला. तिची नांदायची तयारीच नव्हती मात्र असे घटस्फोट झाले तर समाजाचे काय होईल याविचारापोटी तो तिला घटसस्फोट देण्यास तयार नव्हता. शेवटी दहा वर्षांनंतर लोकअदालतमध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

करंट अकाउंटवरील तूट चिंताजनक

$
0
0
करंट अकाउंट तुटीमुळे परकी गुंतवणुकीवर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढत असून, ही काळजी करण्याची बाब आहे. चलनवाढ, वित्तीय तूट कमी करण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेने मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत मुख्य आर्थिक सल्लागार रघुराम राजन यांनी मंगळवारी व्यक्त केले.

हवाई वाहतूक नियंत्रणासाठी २५०० तज्ज्ञांची नेमणूक

$
0
0
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासामुळे नागरी हवाई वाहतुकीची सुरक्षा धोक्यात येऊ नये, यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयातर्फे धोरण निश्चित करण्यात आले आहे. तसेच हवाई वाहतूक नियंत्रणासाठी सुमारे अडीच हजार तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूकही केली जाणार आहे.

रस्त्यांच्या कामांना गती

$
0
0
पुणे शहराला कनेक्ट होणाऱ्या सासवड, तळेगाव, चाकण आणि सिन्नर (नाशिक) या रस्त्यांच्या कामांना गती मिळणार असून या रस्त्यांचे रखडलेले भूसंपादन लवकर करण्याची सूचना जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी दिली आहे.

रुळावरचा स्टंटमन अडचणीत

$
0
0
केवळ काही तरी आगळेवेगळे करण्याच्या नादापायी भरधाव एक्स्प्रेस रेल्वेखाली रुळांमध्ये झोपणाऱ्या स्टंटमनला अखेर कायद्याच्या चौकटीत अडकविण्यात आले आहे.

‘डीपी आगीतून फुफाट्यात’

$
0
0
विकास आराखड्यातील (डीपी) विसंगत उपसूचनांचा गोंधळ निस्तरण्यासाठी आणखी एक उपसूचना देऊन आराखडा आगीतून फुफाट्यात ढकलल्याची टीका विरोधक आणि काही काँग्रेसजनांनी मंगळवारी केली. दरम्यान, सोमवारी मुख्य सभेत झालेला ठराव रद्द करावा, या मागणीसाठी कोर्टात जाण्याचा इशारा काही संघटनांनी दिला आहे.

दुष्काळामुळे पुण्यात स्थलांतर नाही

$
0
0
राज्यातील अनेक भागांत दुष्काळाचे चटके जाणवत असले तरी पुण्यात अद्याप एकाही दुष्काळग्रस्त कुटुंबाचे स्थलांतर झालेले नाही. स्थलांतरीत कुटुंबांना रेशनचे धान्य मिळण्यासाठी स्वतंत्र कक्षाद्वारे तात्पुरते रेशनकार्ड दिले जाणार आहे.

पैशाचा धूर करणाऱ्या ‘पीयूसी’ केंद्रांना टाळे

$
0
0
सदोष ​मशिनद्वारे वाहनांची तपासणी करून प्रदूषण नियंत्रणाखाली असल्याचे (पीयूसी) प्रमाणपत्र देणाऱ्या १०६ केंद्रांना ‘आरटीओ’कडून टाळे ठोकण्यात आले आहे. बोगस प्रमाणपत्रे देत शहरातील प्रदूषणात भर टाकणाऱ्या आणखी ५० केंद्र कारवाईच्या ‘रडार’वर आहेत.

राजस्थानची सूत्रे भाजपच्या हाती द्या

$
0
0
रस्ते, पाणी, वीज याबरोबरच उद्योगनिर्मिती अशा अनेक समस्या राजस्थानमध्ये भेडसावत आहेत. या प्रश्नांचे निवारण करुन सर्वसामान्य जनतेला सुखी करण्यासाठी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या हाती राजस्थानची सूत्रे द्या, असे आवाहन करीत भाजपच्या प्रदेशाध्यक्षा आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांनी केले.

मृत्युचा सापळा दोन महिन्यांत ‘सुधारणार’

$
0
0
मृत्युचा सापळा ठरलेल्या चांदणी चौकात जाण्या-येण्यासाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या सर्व्हिस रोडची कामे येत्या दोन महिन्यामध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत.

‘स्थायी’च्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे तांबे

$
0
0
महापालिकेच्या आर्थिक किल्ल्या हाती असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल तांबे यांची मंगळवारी निवड झाली. मनसेने माघार घेऊन पाठिंबा दिलेले भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर तांबे यांनी नऊ विरुद्ध सात अशा मताने विजय मिळविला.

यंग अध्यक्षांचा हायटेक स्टार्टर

$
0
0
गेल्या चाळीस वर्षांत पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेले विशाल तांबे यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच हायटेक कारभाराचा मेसेज दिला आहे.

भटक्या विमुक्तांना आपणच उपेक्षित ठेवले

$
0
0
‘भटक्या विमुक्त जमाती या आपल्या समाजाचाच एक भाग आहेत. परंतु, आपणच त्यांना वेगळे समजून उपेक्षित ठेवले आहे. त्यांचा डोंबाऱ्याचा खेळ आपण पाहतो, मात्र, त्यांना जवळ करत नाही. भटक्यांचेही जग मोठे आहे, त्यांच्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे,’ असे मत भटक्या विमुक्त जमातींचे अभ्यासक प्रा. रामनाथ चव्हाण यांनी मंगळवारी व्यक्त केले.

राखीव जागांसंदर्भात शाळांची चौकशी

$
0
0
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राखीव जागांच्या प्रवेशासंदर्भात पालकांनी केलेल्या तक्रारीनंतर आता शाळांची ‘झाडाझडती’ घेतली जाणार आहे. या जागांवरील प्रवेश होईपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार असून, यासंदर्भात येत्या १० मार्चला आढावा घेतला जाणार आहे.

पुलासाठी पंतप्रधानांना साकडे

$
0
0
घोरपडी येथील मिरज आणि सोलापूरकडे जाणाऱ्या रेल्वेमार्गावरील फाटकांवर उड्डाणपूल उभारण्यात यावा, यासाठी आता घोरपडी-मुंढवा रेल्वे ओव्हरब्रीज कमिटीतर्फे (जीएमआरओबीसी) आता थेट पंतप्रधानांनाच साकडे घालण्यात येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images