Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘गानसरस्वती को... भजे हम’

$
0
0
भारतीय अभिजात संगीताची तपस्विनी साधक..., संगीताचे नव्हे तर स्वरभाषेचे ज्ञान देणारी गुरू... अन् श्रोत्यांना ‘सर्वज्ञ’ अनुभव देणाऱ्या गानसरस्वतीच्या सन्मानार्थ सर्व शिष्यांनी किशोरी आमोणकर यांना गुरुपूजनाद्वारे वंदन केले अन् ‘गानसरस्वती को... भजे हम’च्या नादाने रसिकांची सांजवेळ श्रवणीय केली.

ई-कचरा विल्हेवाटीसाठी प्रकल्प

$
0
0
राज्यात दिवसेंदिवस वेगाने वाढत असलेल्या ई-कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाने आता पुढाकार घेतला आहे. ‘पुणे-मुंबईसारख्या महत्त्वाच्या शहरातील ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी लवकरच सार्वजनिक-खासगी सहभागाच्या माध्यमातून मुंबईतल तळोजा येथे ‘ई कचरा वर्गीकरण आणि विल्हेवाट’ प्रकल्प उभा राहणार आहे.

मेल हॅकिंग,४५ लाखांचा दंड

$
0
0
पुण्यातील एका कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकाचा मेल हॅक करून ८३ लाखाची फसवणूक झाल्याप्रकरणी खडकीतील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेला संबंधित कंपनीला ४५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला. माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अगरवाल यांनी हा आदेश दिला आहे.

सराफी दरोड्याचे आव्हान कायमच

$
0
0
लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या मारुती चौकालगतच्या सराफी पेढीवर पिस्तुलाच्या धाकाने दरोडा घालत ८५ लाख रुपयांचे दागिने लुटले होते. पोलिसांना या गुन्ह्यातील आरोपींची ‘चाहूल’ तर लागली आहे. मात्र, ते नजरेच्या टप्प्याबाहेर आहेत.

नगदीच्या हव्यासाने उपासमार

$
0
0
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी नगदी पीके घेण्यावर भर दिल्यानेच राज्यातील निम्म्या लोकसंख्येला पुरेल एवढेच अन्नधान्याचे उत्पादन आपल्याकडे तयार झाले आहे. या तुलनेत हरियाना, पंजाब ही राज्ये मात्र स्वत:ची गरज भागवून इतर राज्यांना अन्नधान्याचा पुरवठा करत आहेत.

राजबाबत पवारांचा सबुरीचा सल्ला

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वादात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी अखेर लक्ष घातले असून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. पवार यांच्या या सूचनांमुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज ठाकरे यांना कोठेही अडविणार नाहीत, असे पक्षाने रविवारी स्पष्ट केले आहे.

टँकर-कार धडक आगीला कारणीभूत

$
0
0
इंदापूर येथे गॅस टँकरला आग लागण्यापूर्वी अवघ्या काही मिनिटांमध्ये ३० हून अधिक नागरिकांना पेट्रोल पंप परिसरातून हलविण्यात आल्याने मोठी दुर्घटना ट‍ळली आहे. दरम्यान, टँकरला कारची धडक बसून गॅस व्हॉल्व तुटल्याने ही घटना घडल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

कंपन्यांनी केले दुर्ग संवर्धन

$
0
0
पर्यावरणाचे नियम धुडकावून काम करणारे म्हणून टीकेच्या धनी ठरणाऱ्या औद्योगिक आणि बांधकाम कंपन्या आणि त्यांचे कर्मचारी आपली संस्कृती आणि इतिहासाबाबतही सजग आहेत. कंपन्यांचा सामाजिक निधी दुर्गसंवर्धनाकडे वळवत पुण्यातील कंपन्या आणि कर्मचाऱ्यांनी हे सिद्ध केले आहे.

पुणे शहरात नो-स्काय लाइट

$
0
0
लग्न सराईसारथ्या शुभ कार्यात स्काय लाइटसारखे (स्काय ट्रॅकर) मोठे प्रकाशझोत लावण्यास पोलिसांनी बंदी घातली आहे. या प्रकाशझोतांमुळे वैमानिकांना विमानतळावर लँडिंग करताना अडथळा निर्माण होत असून विमानतळाच्या पंधरा किलोमीटरच्या परिघात असे प्रकाशझोत लावण्यास मनाई करण्यात आली आहे.

मिळणार अपघातांना ब्रेक

$
0
0
‘ड्रायव्हिंग स्कूलमधून प्रशिक्षण घेतल्याशिवाय ट्रान्स्पोर्ट लायसन्स मिळणार नाही,’ मोटार वाहन कायद्यातील हा नियम पुणे ‘आरटीओ’कडून काटेकोरपणे अमलात आणला जात असून, त्यामुळे रस्त्यांवरील अपघातांना ‘ब्रेक’ लागेल, अशी अपेक्षा आहे.

हवाई वाहतूक नियंत्रणासाठी २५०० तज्ज्ञांची नेमणूक

$
0
0
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासामुळे नागरी हवाई वाहतुकीची सुरक्षा धोक्यात येऊ नये, यासाठी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयातर्फे धोरण निश्चित करण्यात आले आहे. तसेच हवाई वाहतूक नियंत्रणासाठी सुमारे अडीच हजार तज्ज्ञ अधिकाऱ्यांची नेमणूकही केली जाणार आहे.

अनधिकृत बांधकामांवर कारवाई

$
0
0
महापालिकेच्या बांधकाम विकास, अतिक्रमण आणि आकाशचिन्ह विभाग यांनी एक रस्ता निवडून संबंधित रस्ता आणि त्या रस्त्याच्या जोडरस्त्यांवर संयुक्तपणे कारवाईचे नियोजन केले आहे. त्यानुसार सोमवारी पुणे-सातारा रस्त्यावरील तब्बल ४० अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने हा रस्ता मोकळा झाला.

शंभर फरार आरोपी गजाआड

$
0
0
वर्षभरात शंभर फरारी आरोपींना गजाआड करण्याची कामगिरी लिलया पेलणारे डेक्कन पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी महेश निंबाळकर यांच्याकडे आता नयना पुजारी खून खटल्यातील प्रमुख आरोपी योगेश राऊत याला पकडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

अतिक्रमणांचे आक्रमण पोलिसांनीच रोखावे

$
0
0
पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्याचे काम समाधानकारक असले तरी पुढील काळात ही अतिक्रमणे होणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा अप्पर मुख्य सचिव (गृहविभाग) अमिताभ राजन यांनी व्यक्त केली.

चार वर्षांच्या मुलीचा अपघाती मृत्यू

$
0
0
आपल्या मोठ्या बहिणीसह दवाखान्यात चाललेल्या चार वर्षीय मुलीला सफारी गाडीने चिरडल्याची घटना नवी सांगवी येथे घडली. या प्रकरणी कार चालकाला अटक करण्यात आली आहे. तसेच अन्य दोन घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला.

HIV संसर्ग रोखण्यात यश

$
0
0
मातेपासून बाळाला ‘एचआयव्ही’ची लागण झाल्यानंतरही औषधोपचारामुळे ती बरी झाल्याच्या अमेरिकेतील संशोधकांच्या दाव्यामुळे संशोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. ससूनसह ‘एचआयव्ही’संदर्भातील संशोधनाला यामुळे चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

बजेट १३४ कोटींवरून ४२ कोटी

$
0
0
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन ग्रीन बिल्डिंगचा खर्च १३४ कोटी रुपयांपर्यंत फुगविला गेला. पण ही रक्कम अव्वाच्यासव्वा होत असल्याने हा खर्चाचा डोलारा खाली घेऊन आता ४२ कोटी रुपयांत इमारत उभी केली जाणार आहे.

डीपीमुळे सत्ताधारी टीकेचे धनी

$
0
0
जुन्या पुण्याच्या विकास आराखड्याला (डीपी) देण्यात आलेल्या संदिग्ध उपसूचनांमुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस टीकेचे धनी झाले. किती उपसूचना संदिग्ध आणि परस्परविरोधात आहेत, असा सवाल करून त्या कोणत्या कायद्याच्या आधारे बदलणार आदी प्रश्न विरोधी पक्षांनी उपस्थित केल्यावर त्यास उत्तर देताना मेटाकुटीला आले.

टँकर वाढले

$
0
0
वाढत्या उन्हाबरोबरच विभागातील पाणीटंचाईचा प्रश्न अधिकच गंभीर हो‌त असून, दिवसेंदिवस टँकरची संख्या वाढत आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येत दररोज २० ते २५ टँकरने वाढ होत आहे.

अलमट्टीतून सुटेल पाणीप्रश्न

$
0
0
सोलापूर जिल्ह्यातील दहा लाख नागरिकांची तहान भागविण्यासाठी कर्नाटक येथील अलमट्टी धरणातून पाणी सोडण्याच्या महाराष्ट्राच्या मागणीवर कर्नाटक येथील जलसंपदा खात्याच्या टेक्निकल टीमने विभागीय आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांशी सोमवारी चर्चा केली.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images