Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘त्यांच्या’शिधापत्रिकेसाठी स्वतंत्र कक्ष

$
0
0
राज्यातील पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या दुष्काळी भागातील ज्या कुटुंबीयांनी पुण्यात स्थलांतर केले त्यांच्या शिधापत्रिका आणि शिधावस्तूंसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शहर अन्नधान्य वितरण अधिकारी ज्ञानेश्वर जवंजाळ यांनी याबाबतची माहिती दिली.

खा.बाबरांचे ठिय्या आंदोलन

$
0
0
हॉटेल व्यावसायिकांवर सुरू असलेली कारवाई त्वरीत थांबवावी. या मागणीसाठी खासदार गजानन बाबर यांनी शनिवारी पिंपरी पोलिस उपायुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

राज्यात १७६ कॉपीबहाद्दर पकडले

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शनिवारपासून सुरू झाली. परिक्षेदरम्यान कोणतीही तांत्रिक समस्या निर्माण झाली नसली तरी पहिल्याच दिवशी मराठीच्या पेपरला राज्यात भरारी पथकाने १७६ कॉपी पकडल्या.

विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

$
0
0
विहिरीत बुडून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना बेल्ह्यातील वायकर मळ्यात शुक्रवारी घडली. महिनाभरापूर्वी पिंपळगाव खडकी येथे देखील दोन बिबटे विहिरीत पडून मृत्यूमुखी पडले होते. पाण्याच्या शोधात बिबट्यांना प्राण गमावण्याची वेळ आली आहे.

जीप उलटून विद्यार्थ्यासह ड्रायव्हर ठार

$
0
0
अवैध प्रवासी वाहतूक करणारी जीप उलटून झालेल्या अपघातात नववीतील एका विद्यार्थ्यासह ड्रायव्हरचा मृत्यू झाला, तर अकरा विद्यार्थ्यांसह १३ जण जखमी झाले आहेत. मावळातील कान्हे-वडेश्वर रस्त्यावर श‌निवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.

भुजबळांवर गुन्हा?

$
0
0
शिरूर तालुक्यातील पेरणे फाटा टोलनाक्यावर बेकायदा टोल वसुली केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकामंत्री छगन भुजबळ, अशोका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे सुनील रायसोनी यांच्यासह वीस जणांवर गुन्हा दाखल करण्याच्या आदेशाविरोधात सेशन्स कोर्टात दाखल करण्यात आलेली बांधकाम खात्याची (पीडब्ल्यूडी) याचिका फेटाळण्यात आली आहे.

मानेचा आजार डॉक्टरने लपविला?

$
0
0
बसचालक संतोष माने याला मानसिक आजार असल्याचे पत्र आपण राज्य परिवहन महामंडळाला पाठविले नसल्याचे स्पष्टीकरण मानेवर उपचार करणारे सोलापूरचे डॉक्टर दिलीप बुरटे यांनी दिले. तथापि, मानेवर मानसिक आजारासंदर्भात उपचार सुरू होते, अशी कबुली डॉ. बुरटे यांनी दिली.

‘स्वाइन फ्ल्यू’ने वृद्धाचा मृत्यू

$
0
0
स्वाइन फ्ल्यूच्या संसर्गाने एका ८० वर्षांच्या वृद्धाचा शुक्रवारी मृत्यू झाला. आतापर्यंत या वर्षात चार जणांचा स्वाइन फ्ल्यूमुळे बळी गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘बीडीपी’ग्रस्तांना दिलासा

$
0
0
समाविष्ट २३ गावांतील जैववैविध्य उद्यानांमधील (बीडीपी) २१ मार्च २००५ पूर्वी परवानगी देण्यात आलेली सर्व बांधकामे (कमिटेड डेव्हलपमेंट) आणि मोकळ्या जमिनी बीडीपी आरक्षणातून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे ‘बीडीपी’मध्ये घरे असलेल्या नागरिकांची सुटका झाली आहे.

पीएमपी कंडक्टरला मारहाण

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कंडक्टरला दारूड्या तरुणाकडून बिअरच्या बाटलीने मारहाण करण्यात आली. मागील आठवड्यात घडलेल्या या गुन्ह्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल झाला.

महेश मांजरेकरांच्या डोळ्याला इजा

$
0
0
गहुंजे येथे शनिवारी सेलिब्रेटींच्या क्रिकेट सामन्यादरम्यान खेळताना अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या डाव्या डोळ्याला इजा झाली. त्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्या डोळ्याला पाच टाके घालण्यात आले.

बीईचा निकाल 'होल्ड'वर

$
0
0
बॅकलॉग राहिलेल्या 'बीई'च्या विद्यार्थ्यांचा निकाल पुणे विद्यापीठाने गुरुवारी जाहीर केला खरा; पण अनेक विद्यार्थ्यांचा निकाल अद्याप 'होल्ड'वर असल्याचे सांगण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्यही 'होल्ड'वरच आहे. अनेक कॉलेजांनी 'इंटर्नल'चे मार्कच न कळवल्याने हे निकाल 'होल्ड'वर असल्याची माहिती पुढे आली आहे.

बेगच स्फोटाला जबाबदार

$
0
0
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी हिमायत बेगच्या घरातून पंचाच्या समक्ष आरडीएक्स जप्त करण्यात आले होते. बेगविरुद्ध परिस्थितीजन्य पुरावे सापडले असून, बेग स्फोटास जबाबदार असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील अॅड. राजा ठाकरे यांनी शनिवारी कोर्टात केला.

गॅस टँकर उलटून स्फोट; एक ठार

$
0
0
गॅसचा टँकर उलटून झालेल्या स्फोटाच्या आगीमुळे पेट्रोल पंपालाही आग लागल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास इंदापूरजवळ घडली. या आगीत एक जण दगावल्याची माहिती मिळाली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

राष्ट्रवादीची माघार

$
0
0
राज ठाकरे सात मार्च पासून पुणे दौ-यावर येत आहेत. या दौ-याला पक्षाकडून विरोध होणार नाही, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहाराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी दिले आहे. राष्ट्रवादीने आश्वासन दिल्यामुळे आता राज यांचा पुणे दौरा शांततेत पार पडेल, अशी आशा सामान्य पुणेकर व्यक्त करत आहेत.

वाहतुकीचा ताण पोलिसांसाठी जीवघेणा

$
0
0
चौकाचौकांतून आठ तास वाहतुकीचे नियमन करताना प्रदूषणाच्या समस्येमुळे पोलिसांना श्वसनविकार, कर्णबधिरतेच्या समस्यांनी हैराण केले आहे. इतकेच नव्हे; तर कामाचा ताण वाढल्याने ब्लड प्रेशरसह डायबेटिसनेही वेढले आहे.

माहिती आयुक्त निवडप्रक्रिया सदोष

$
0
0
माहिती अधिकार आयुक्तांची निवड करण्यासाठी राबवण्यात येणारी प्रक्रिया चुकीची असून त्यासाठी योग्य पद्धत निश्चित करण्याची आवश्यकता असल्याचे मत माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी व्यक्त केले.

मराठा आरक्षणासाठी तीव्र लढाई

$
0
0
मराठा आरक्षणासाठी सरकारच्या विरोधात लढाई तीव्र करावी लागणार असून त्यासाठी चळवळही उभी करणार असल्याचे शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक आमदार विनायक मेटे यांनी स्पष्ट केले.

विसंगत उपसूचनांचे ‘धनी’ कोण ?

$
0
0
विकास आराखड्यास माननीयांनी दिलेल्या ‘विसंगत,’ ‘संदिग्ध’ उपसूचनांमुळे झालेले गोंधळ निस्तरण्यासाठी उद्या (सोमवारी) हा आराखडा पुन्हा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे येणार आहे. नियम किंवा कायद्यांकडे कानाडोळा करून सरधोपटपणे मांडलेल्या या उपसूचनांचे ‘धनी’ कोण, हे यानिमित्ताने पुणेकरांसमोर येणार आहे.

सोनोग्राफीचे ऑनलाइन फॉर्म झाले ऑफलाइन

$
0
0
बेकायदा लिंग निदानाच्या प्रकाराला चाप बसविण्यासाठी ‘एफ फॉर्म’ची ऑनलाइन सुविधा पुण्यासारख्या प्रगतीशील शहरामध्ये अजूनही ‘ऑफलाइन’च आहे. ग्रामीण भागासह अन्य तीस जिल्ह्यांसह अकरा महापालिकांमधील केंद्रावर मात्र ती ऑनलाइन पद्धतीने सुरळीत सुरू आहे. परिणामी, पुण्यातील गर्भलिंग निदान कारवायांवर करडी नजर ठेवणे अजूनही शक्य झालेले नाही.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images