Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

'एलबीटी'ला विरोधासाठी व्यापा-यांचा एक दिवसाचा बंद

$
0
0
जकाती ऐवजी स्थानिक संस्था (एलबीटी) कर लागू केल्यास लहान व्यापाऱ्यांपासून मोठ्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. एलबीटी बरोबरच किरकोळ विक्री क्षेत्रात थेट गुंतवणुकीच्या प्रकारामुळे पारंपारिक व्यापाराचा हळूहळू अस्त होणार आहे. याला विरोध करण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी एक दिवसाचा बंद पुकारला आहे.

प्रकाशक परिषदेवर मराठी प्रकाशकांचा बहिष्कार

$
0
0
फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्सतर्फे आयोजित दोन दिवसीय परिषदेमध्ये मराठी प्रकाशकांमध्येच दोन गट पडल्याचे दिसून आले. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाने आयोजित केलेल्या या परिषदेवर मराठी प्रकाशक परिषदेने बहिष्कार घातला.

झेरॉक्ससह आता 'रिव्हॅल्युएशन'ही

$
0
0
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदापासून फेरतपासणीबरोबरच फेरमूल्यांकनासाठीही अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकेची छायाप्रत (झेरॉक्स) मिळाल्यावर पाच दिवसांत यासाठी अर्ज करावा लागणार आहे.

माननीयांच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

$
0
0
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने माननीयांची संपर्क कार्यालये जमीनदोस्त केल्यावर येत्या आठवड्यात आणखी बड्या माननीयांच्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा घालण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.

'स्थायी'च्या अध्यक्षपदासाठी तांबे, रासने, शिंदे रिंगणात

$
0
0
स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी तीन अर्ज दाखल झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीकडून विशाल तांबे, भाजपचे हेमंत रासने आणि मनसेचे किशोर शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

आयटी कंपन्यांनी करावी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना मदत

$
0
0
‘दुष्काळग्रस्त भागांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी बिझनेस हब म्हणून ओळखल्या जात असलेल्या पुण्यातील आयटी कंपन्या आणि इतर उद्योगांनी मदतीचा हात पुढे करावा,’ असे आवाहन विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी शनिवारी केले.

मानेचा आजार डॉक्टरने लपविला?

$
0
0
बसचालक संतोष माने याला मानसिक आजार असल्याचे पत्र आपण राज्य परिवहन महामंडळाला पाठविले नसल्याचे स्पष्टीकरण मानेवर उपचार करणारे सोलापूरचे डॉक्टर दिलीप बुरटे यांनी दिले. तथापि, मानेवर मानसिक आजारासंदर्भात उपचार सुरू होते, अशी कबुली डॉ. बुरटे यांनी दिली.

दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट!

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शनिवारपासून (२ मार्च) सुरू होत आहे. त्यासाठीची सर्व तयारी मंडळाने पूर्ण केली आहे.

'आधार'सक्तीसाठी ८० टक्क्यांची 'अट'

$
0
0
ऐंशी टक्के लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही योजनेसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतल्याने हजारो ‘निराधार’ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

बारावी फिजिक्स परीक्षा पुन्हा नाही

$
0
0
बारावीचा फिजिक्सचा पेपर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा घेतला जाणार नाही, असे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

पिंपरी महापौरांचा आयुक्तांविरोधी असहकार

$
0
0
आयुक्त तीन वर्षांनी येतात जातात, मात्र आम्हाला येथे कायम स्वरूपी राहायचे आहे. शहरातील नगरसेवकांना बरोबर घेऊन काम केले तरच, आम्ही तुमच्या बरोबर राहू, असा इशारा पिंपरी चिंचव़डच्या महापौर मोहिनी लांडे यांनी शहर नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये दिल्याने सर्वजण अवाक झाले.

जात संपविण्यासाठी आंदोलन करा

$
0
0
‘आंतरजातीय विवाह केल्यानंतरही जातीचा विचार केला जात असून राज्यातून जात नष्ट झाली पाहिजे. त्यासाठी राज्यात आंदोलने सुरू करा,’ असे आवाहन माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी येथे केले. लोकबोधिनी संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यानाप्रसंगी ‘जातिव्यवस्थेचे नवे संदर्भ’ या विषयावर ते बोलत होते.

पायाभूत सुविधांचा विकास करा

$
0
0
‘नागरिकरणाचा वेग लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचा विकास केल्यास नियोजित शहराच्या निर्मितीला हातभार लागेल,’ असे मत जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी केले.

‘डीपी’च्या उपसूचनांमध्ये विसंगती

$
0
0
पुण्याच्या कारभाऱ्यांनी दाखविलेल्या अतिशहाणपणामुळे विकास आराखड्याबाबतच्या उपसूचनांची ऐशीतैशी झाली आहे. शेवटच्या दिवशी सर्व विवेक धाब्यावर बसवून केलेल्या या उपसूचना आता बूमरँगसारख्या उलटल्या असून त्यातील विसंगती, संदिग्धता दूर करण्यासाठी पुन्हा सर्वसाधारण सभेपुढे जाण्याची नामुष्की इतिहासात प्रथमच आली आहे.

भोसरी एमआयडीसीतील कंपनीला आग

$
0
0
भोसरी एमआयडीसीतील एस. ब्लॅकमधील मास डायकेम कंपनीला शनिवारी दुपारी आग लागली. मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.

शिवराय आणि शहाजीराजांची अप्रकाशित पत्रे उजेडात

$
0
0
शिवकालीन मोडीचा उत्कृष्ट नमुना, प्रशासकीय कारभार आणि न्यायव्यवस्थेचे धागे उलगडणारी राजश्री महाराजसाहेब शहाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची अप्रकाशित पत्रे उजेडात आली आहेत. इतिहास संशोधक मंडळातील अभ्यासक डॉ. अनुराधा कुलकर्णी आणि अजित पटवर्धन यांनी हा ठेवा इतिहासप्रेमींसमोर उघडला.

पिंपरीत ७० भक्तांना विषबाधा

$
0
0
काळेवाडी येथील भागम्मादेवी यात्रेनिमित्त केलेला महाप्रसाद खाल्ल्यानंतर ७० भक्तांना विषबाधा झाली. त्यातील १८ भक्तांची प्रकृती गंभीर आहे. विषबाधा झालेल्यांना पिंपरी, चिंचवड, पुणे व खडकीतील विविध हॉस्पिटलमध्येत उपचार सुरू आहेत.

८५ हजाराच्या सोनसाखळ्या हिसकावल्या

$
0
0
मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकाकडील सुमारे ८५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन साखळ्या चोरट्यांनी हत्याराचा धाक दाखवून पळवून नेल्याची घटना शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास परमहंसनगर येथे घडली.

‘आधार’सक्तीसाठी ८० टक्क्यांची ‘अट’

$
0
0
ऐंशी टक्के लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही योजनेसाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतल्याने हजारो ‘निराधार’ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

विकास आराखड्याच्या दुरुस्तीला विरोध

$
0
0
विकास आराखडा दुरुस्त्यांसाठी पुन्हा मुख्य सभेपुढे आणण्यास विरोधी आमदारांनी शनिवारी विरोध दर्शविला असून, या प्रक्रियेची ‘अँटी करप्शन ब्युरो’कडून चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान, यामध्ये काहीही नियमबाह्य नसल्याचे सत्ताधारी नेत्यांचे म्हणणे आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images