Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पुणे पालिकेचे बजेट ४,१६७ कोटींचे

$
0
0
महापालिकेसाठी 'स्थानिक संस्था कर' (एलबीटी) लागू होणार असतानाही, जकातीतून वाढीव उत्पन्न मिळण्याचा अंदाज बांधून आणि आवश्यक खर्चाला कात्री लावून फुगवलेल्या पुणे महापालिकेच्या २०१३-१४ या वर्षीच्या चार हजार १६७ कोटी रुपयांच्या बजेटला सर्वसाधारण सभेने गुरुवारी मान्यता दिली.

रुपा बजाज यांचे निधन

$
0
0
प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांच्या पत्नी रुपा बजाज (७४) यांचे काल, गुरुवारी जर्मनीतील एका रुग्णालयात निधन झाले. गेले काही महिने त्यांच्यावर जर्मनीमध्ये हृदयरोगाचे उपचार सुरु होते.

चतुर्थश्रेणी कर्मचारी होणार कम्प्युटर साक्षर

$
0
0
महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळातील सुमारे सव्वाशे चतुर्थश्रेणी कर्मचारी आता कम्प्युटर साक्षर होणार आहेत. त्यांना कम्प्युटर प्रशिक्षण देण्याचा उपक्रम महामंडळ व पर्यंटन विकास कर्मचारी संघाने हाती घेतला आहे.

जिल्हा आरोग्य सेवा कात टाकणार

$
0
0
डॉक्टर नाहीत, असूनही ते वेळेत येत नाहीत, मग उपचारासाठी ताटकळत राहावे लागते, सोनोग्राफी मशीन बंद पडल्या आहेत, अॅम्ब्युलन्सचा पत्ताच नसतो.... अशा तक्रारींचा पाढा वाचत जिल्हा परिषदेच्या सर्वपक्षीय सदस्यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत जिल्हा आरोग्य सेवेची लक्तरे काढली!

सोलापूरमध्ये २४ मार्चला दुष्काळ सहवेदना परिषद

$
0
0
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विकास केंद्र, शेतकरी संघटना, प्रहार संघटना आणि भारतीय कृषक समाज यांच्यातर्फे २४ मार्च रोजी सोलापूरमधील मोडनिंब येथे दुष्काळ सहवेदना परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

अपंगत्वाचे 'ऑनलाइन' प्रमाणपत्र ससूनमध्ये नाही

$
0
0
औंधच्या जिल्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये अंपगत्वाच्या 'ऑनलाइन' प्रमाणपत्रास सुरुवात झाली असली तरी; ससून हॉस्पिटलमध्ये अद्याप ऑनलाइन प्रमाणपत्र देण्यास प्रारंभ झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

डीपीच्या सव्वाशे उपसूचना 'अनाकलनीय'

$
0
0
विकास आराखड्याच्या प्रसिद्धीस मान्यता देताना सर्वसाधारण सभेत माननीयांनी केलेल्या सुमारे सव्वाशे उपसूचना 'अनाकलनीय' असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आराखड्यास प्रसिद्धीसाठी तांत्रिक उपायांचा शोध सुरू झाल्याचे समजते.

पुण्यातील कॉलेजसाठीही आता स्वतंत्र 'रोबोकॉन'

$
0
0
इंजिनीअरिंग कॉलेजमधील सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्येही रोबोटिक्सचे कौशल्य विकसित करण्यासाठी 'रोबोकॉन'प्रमाणे स्थानिक स्तरावर विशेष स्पर्धा भरविण्यात येणार आहे.

रिक्त पदांचे घोडे सचिवांकडे अडले

$
0
0
पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या मुख्य अभियंत्यासह व सीटी इंजिनीअर दर्जाच्या दहा ते बारा अधिकाऱ्यांच्या फाइल्स सचिवांच्या कपाटात अडकल्याने गेली वर्षभर ही पदे भरली गेली नाहीत. परिणामी, राज्याला ग्राम सडक योजनेच्या कामांत मोठा फटका बसत आहे.

सणस मैदानावर बांधणार स्पोर्टस् म्युझियम

$
0
0
सणस स्पोर्ट‍स् मैदानाच्या आवारात पुणे महापालिकेतर्फे स्पोर्ट‍स् आर्ट गॅलरी (म्युझियम) बांधण्यात येणार आहे. या म्युझियममध्ये नवोदित खेळाडूंना विविध खेळांची माहिती देणाऱ्या पुस्तकांबरोबरच क्रीडा साधने आणि क्रीडा प्रयोगशाळा असणार आहे. महापालिकेकडून पहिल्यांदाच असा प्रकल्प उभारला जाणार आहे.

भोर नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजले

$
0
0
भोर नगरपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सदस्यांची आरक्षण सोडत येत्या २५ मार्चला होणार आहे. आरक्षणानंतर लगेचच प्रभाग रचनाही जाहीर केली जाणार आहे. भोर नगरपरिषदेत प्रथमच पन्नास टक्के महिलांना आरक्षण मिळणार आहे.

'जेईई/नीट २०१४'बाबत येत्या रविवारी मार्गदर्शन

$
0
0
सध्या अकरावी सायन्सला असणाऱ्या विद्यार्थ्यांना सन २०१४ मध्ये 'जेईई-मेन' आणि 'नीट' या राष्ट्रीय पातळीवरील सामायिक प्रवेश परीक्षांना सामोरे जावे लागणार आहे. त्या दृष्टीने कशी तयारी करता येईल, याबाबत 'एड्नेक्सा' या ऑनलाइन एज्युकेशन क्षेत्रातील संस्थेने येत्या रविवारी (३ मार्च) 'जेईई/नीट २०१४ ला सामोरे जाताना' या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजिले आहे.

सोनसाखळी चोरणारे सात आरोपी अटकेत

$
0
0
दत्तवाडी, सहकारनगर, धनकवडी, पुणे-सातारा रोड या परिसरात गेल्या दोन वर्षांत सोन साखळी चोरीचे २० गुन्हे करणाऱ्या सात आरोपींना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून १४ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेत.

पाणीपुरवठ्यावर पक्षनिहाय चर्चा महापालिकेचा उपक्रम

$
0
0
राज्यात दुष्काळाची परिस्थिती असली, तरी पुणेकरांना सध्या मिळणाऱ्या पाण्यामध्ये कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यावेळच्या उन्हाळ्यात जास्त पाणीकपातीचा चटका पुणेकरांना बसणार नाही.

गानसरस्वतीच्या सन्मानार्थ आजपासून संगीत महोत्सव

$
0
0
पद्मविभूषण किशोरी आमोणकर यांच्या संगीतसेवेच्या सन्मानार्थ येत्या शनिवार आणि रविवारी (दोन व तीन मार्च) गानसरस्वती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नाट्यसंपदा प्रतिष्ठानतर्फे आयोजित या महोत्सवात किशोरी आमोणकर यांच्या गुरुपूजनाचा सोहळा होणार आहे.

'मर्क'ची 'बी-शास्त्र' स्पर्धा आज

$
0
0
मॅनेजेरियल एक्सलन्स रिसोर्स सेंटरच्या 'मर्क इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट'तर्फे आयोजिण्यात येणारी 'बी-शास्त्र' ही मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठीची आंतरमहाविद्यालयीन बिझनेस प्लॅन स्पर्धा शनिवारी (२ मार्च) होत आहे.

प्रादेशिक भाषांमध्ये आदान-प्रदान हवे

$
0
0
'परदेशी भाषांतून प्रादेशिक भाषांमध्ये पुस्तके आणण्याचा प्रयत्न होत असताना, भारतीय भाषांमध्ये देखील हे आदान-प्रदान व्हायला हवे. त्याबाबतचे हक्क आणि कॉपीराइटबाबत प्रकाशकांना मार्गदर्शन करण्यासाठी ट्रस्टतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येईल', असे नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक एम. ए. सिकंदर यांनी शुक्रवारी (१ मार्च) जाहीर केले.

माने मनोरुग्ण असल्याचे महामंडळाला माहिती होते

$
0
0
बसचालक संतोष मानेवर उपचार करत असलेले मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दिलीप बुरटे यांनी संतोष मानेला मानसिक आजार असल्याचे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला आपण पत्राद्वारे कळविले नसल्याचे उलटतपासणीत कोर्टात सांगितले.

कचऱ्याच्या विल्हेवाटीची 'शूट सिस्टीम'च आउट करा

$
0
0
बिल्डरने कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी 'शूट सिस्टीम' बसविली असली तरी तिची देखभाल करताना अनेक अडचणी येत असल्याने बहुतांश सोसायट्यांनी 'शूट सिस्टीम'ला कुलूप लावले आहे. तर काही ठिकाणी देखभाली अभावी सिस्टीममध्ये कचरा अडकून बसल्याच्या तक्रारी आहेत.

'विज्ञानाला अध्यात्माची जोड मिळतेय'

$
0
0
'पुण्याला वारकरी परंपरेचा लौकिक आहे. विचारांना आचाराची जोड देण्याचे काम ही परंपरा करत असून, अलिकडे विज्ञानाला अध्यात्माची जोड देण्याचे कामही होत आहे', असे मत आमदार लक्ष्मण जगताप टयांनी व्यक्त केले आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images