Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

इंडस्ट्रियल कॅरिडॉरच्या विरोधात संघर्ष यात्रा

$
0
0
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी जनआंदोलन राष्ट्रीय समितीतर्फे आठ ते १८ मार्च दरम्यान संघर्षयात्रेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जनआंदोलनाच्या समन्वयक मेधा पाटकर यांनी सांगितले.

५३ तहसीलदार उपजिल्हाधिकारीपदी

$
0
0
गेल्या काही महिन्यांपासून बढतीच्या प्रतिक्षेत असलेल्या राज्यातील ५३ तहसीलदारांना उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती मिळाली आहे. यामध्ये पुण्यातील उदयसिंह भोसले व बारामती तहसीलदार सचिन इथापे यांचा समावेश आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील आदेश नुकतेच काढले आहेत.

युनिकोडचे 'यशोमुद्रा' होणार!

$
0
0
महाराष्ट्राचे भाग्यविधाते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्याने राज्य सरकारतर्फे निर्माण करण्यात येणाऱ्या युनिकोडमधील फाँटला ‘यशोमुद्रा’ असे नाव देण्याचा प्रस्ताव आहे. येत्या दोन महिन्यात हा फाँट उपलब्ध होण्याची शक्यता असून, कम्प्युटरवर ठिकठिकाणी यशवंतरावांच्या नावाची मुद्रा पुन्हा उमटेल.

सिंहगड कॉलेजमध्ये आत्महत्या

$
0
0
श्रीमती वेणुताई चव्हाण पॉलिटेकनिक कॉलेजमधील विद्यार्थीनीने मंगळवारी सकाळी हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. या विद्यार्थिनीने आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज हवेली पोलिसांनी वर्तवला असून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

बजेटच्या निधीचे ‘मेट्रो’ला इंधन?

$
0
0
शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला मेट्रो प्रकल्प आणि सांडपाणी शुद्धिकरण योजनेसाठी निधी देण्याचा शब्द केंद्र सरकार पाळणार का, असा सवाल बजेटच्या पार्श्वभूमीवर पुणेकर विचारत आहेत.

राजकीय पक्षांची कार्यालये भुईसपाट

$
0
0
महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमणविरोधी मोहिमेचा दणका बुधवारी राजकीय पक्षांना बसला. महापालिकेने कोथरूड परिसरातील विविध राजकीय पक्षांच्या १२ संपर्क कार्यालयांवर हातोडा मारला. त्यामुळे संबंधित नगरसेवकांपासून नेत्यांपर्यंत सर्वांवर नामुष्की ओढवली आहे.

मुकुंदराव किर्लोस्कर यांचे निधन

$
0
0
ज्येष्ठ संपादक आणि किर्लोस्कर समुहाचे संचालक मुकुंदराव किर्लोस्कर यांचे गुरुवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर रात्री वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

'रुपी' कर्जदारांमुळेच घसरली!

$
0
0
रुपी बँकेला आर्थिक अडचणीत आणणाऱ्या ‘टॉप ३०’ कर्जदारांकडे मुद्दल आणि व्याजासह ९६१ कोटी ७२ लाख रुपये थकले आहेत. ही वसुली करण्याचे आव्हान नव्या प्रशासकीय मंडळासमोर आहे.

चार मनसे कार्यकर्त्यांना अटक

$
0
0
राज ठाकरे यांच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी खडक पोलिसांनी मनसेच्या चार कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

'गार्बेज डक्ट'मध्ये साचलेल्या कच-यामुळे स्फोट

$
0
0
'गार्बेज डक्ट'मध्ये साचलेल्या कचऱ्याला अचानक आग लागून स्फोट झाल्याची घटना खराडी येथील कोलोनेड या सोसायटीत गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. मोठा आवाजासह जिन्यांमध्ये आग पसरल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली होती.

इलेक्ट्रॉनिक मीटर मुदतीला रिक्षा संघटनांचा विरोध

$
0
0
इलेक्ट्रॉनिक मीटरसाठी 'आरटीओ'ने दिलेल्या दोन महिन्यांच्या मुदतीला रिक्षा संघटनांनी विरोध केला आहे. मीटरमधील त्रुटी दूर करा, अन्यथा मुदतीचे उल्लंघन करण्याचा इशारा संघटनांनी गुरुवारी दिला. या निर्णयावरून 'आरटीओ' आणि संघटना यांच्यात नवा वाद सुरू झाला आहे.

आर्थिक परिस्थितीला बूस्टर मिळण्याची शक्यता

$
0
0
सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी काहीसे उत्साहवर्धक बजेट मांडले असल्याची प्रतिक्रिया उद्योग क्षेत्राने व्यक्त केली. 'मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर'च्या (एमसीसीआयए) विविध तज्ज्ञांनी गुरुवारी बजेटवर आपली मते मांडली.

बजेटमध्ये व्यापा-याना ठेंगा

$
0
0
रिटेल बाजारात थेट परकीय गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी दिलेल्या सरकारने व्यापाऱ्यांच्या भल्यासाठी उपाययोजना आखली नसल्याकडे बोट दाखवत, बजेट निराशाजनक असल्याची प्र‌तिक्रिया पुण्यातील व्यापाऱ्यांनी दिली आहे.

महिला बँकेचे स्वागत, उद्योजकांची निराशा

$
0
0
केंद्रीय बजेटबाबत उद्योगनगरीतून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महिलांसाठी स्वतंत्र बँकेच्या घोषणेचे स्वागत केले आहे. तर, लघुउद्योजकांनी बजेट निराशाजनक असल्याचे म्हटले आहे.

पाणीपुरवठा आणि पर्यटनावर भर

$
0
0
जकातीऐवजी एलबीटी लागू होण्याच्या शक्यतेने उत्पन्नवाढ मर्यादित राहील, असे स्पष्ट करीत सुमारे दोन हजार २१ कोटी रुपये खर्चाचे आणि दोन कोटी रुपये शिलकीचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०१३-१४ चे बजेट आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) स्थायी समितीला सादर केले.

लोणावळ्यासाठी विशेष तरतुदींचा अभाव

$
0
0
लोणावळा नगरपालिकेने उत्पन्नाचा स्रोत वाढविण्यासाठी विविध कर व दरात वाढ सुचवत, पाणीपट्टी दुप्पटीपेक्षा अधिक करून लोणावळेकरांचे पाणी महाग करणारा ५७ कोटी, ७७ लाख, ८९ हजार ५०० रुपये खर्चाचे अंदाजपत्रक व ५० लाख ५० हजार रुपयांचा शिल्लकी अर्थसंकल्प सादर केला.

शहराच्या विकासापेक्षा 'त्यांच्या' माणसांचीच काळजी

$
0
0
'बजेट तयार करताना शहराच्या विकासापेक्षा 'आपली माणसे' स्थायी समिती अध्यक्षांनी बघितली. त्यामुळे माझ्या प्रभागाला कमी निधी मिळाला', असे गाऱ्हाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संलग्नित अपक्ष नगरसेविका अश्विनी कदम या मांडत असताना भर सर्वसाधारण सभेत त्यांना रडू कोसळले.

'बाभळी'चा काटा रुते आंध्र प्रदेशला

$
0
0
बाभळी बंधारा बांधण्यावरून आंध्र प्रदेश सरकारने केलेला कांगावा सुप्रिम कोर्टाने खोडून काढला आहे. या बंधाऱ्यावर अकरा मीटर उंचीचे दरवाजे बसविण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. त्यामुळे या बंधाऱ्यात पावणेतीन टीएमसी पाणी अडविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आमच्यावर 'प्रयोग' कशासाठी?

$
0
0
'कॉलेजमध्ये विषय शिकवत नाहीत. शिकवणीवाल्यांना विषय समजत नाहीत. याचा त्रास विद्यार्थ्यांनी का सहन करायचा?'... १२ वीचा फिजिक्सचा पेपर अवघड गेल्यानंतर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी बोर्डाला अशा रोखठोक भाषेत प्रश्न विचारत बोर्डाच्याच आवारात अधिकारी आणि पेपर सेटर्सना धडा शिकविण्यासाठी 'शाळा' घेतली.

पुणे मेट्रोची बजेटमध्ये सलामी

$
0
0
पुणे व पिंपरी-चिंचवडच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असणाऱ्या मेट्रो प्रकल्पाने केंद्रीय बजेटमध्ये खाते उघडले आहे. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी बजेटमध्ये पुणे मेट्रोचे हेड सुरू केले असून, त्यासाठी प्राथमिकता म्हणून दहा कोटी रुपयांची ( ९.९९ कोटी) तरतूद केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images