Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लॉटरी सिस्टीम 'बिशप्स'च्या अंगाशी

$
0
0
कम्प्युटरच्या आधारे काढण्यात आलेल्या लॉटरी सिस्टिमद्वारे विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न कॅम्पमधील बिशप्स स्कूलच्या अंगलट आला. या प्रक्रियेमधून चुकीचे एसएमएस मिळालेल्या संतप्त पालकांनी मंगळवारी दुपारी शाळेवरच मोर्चा काढला. प्रक्रियेमध्ये शालेय व्यवस्थापनच चुकल्याने आपापल्या पाल्यांना प्रवेश मिळाल्याशिवाय शाळेतून जाणार नसल्याची भूमिका या पालकांनी घेतली.

मुलांचा खून करून बापाची आत्महत्या

$
0
0
मुला-मुलीचा खून करून बापानेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी संध्याकाळी लोणी काळभोर येथील कुंजीरवस्ती येथे उघडकीस आला आहे. बिभीषण खंडू वाघमारे (वय ४०, रा. कुंजीरवस्ती, लोणी काळभोर) असे आत्महत्या केलेल्या बापाचे नाव आहे. वाघमारे याने आपला पाच वर्षांचा मुलगा पारस आणि तीन वर्षांची मुलगी प्रतीक्षा यांचा खून केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.

रुपी बँकेचे विलीनीकरण?

$
0
0
चौदाशे कोटी रुपयांच्या ठेवी, सातशे कोटींची कर्जे, पस्तीस शाखा, सात लाख खातेदार असा पसारा असलेली रुपी सहकारी बँक अन्य बँकेत विलीन करण्यापासून अनेक पर्यायांवर विचार होत आहे. केवळ ठेवीदार व खातेदारांना वाचविण्यासाठी हे पर्याय खुले ठेवण्यात येणार आहेत.

मनसेचा NCP कार्यालयावर हल्ला

$
0
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील वाकयुद्धाचे हिंसक पडसाद राज्यात ठिकठिकाणी उमटू लागले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नगर येथे राज ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक केल्यामुळे संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयावर हल्ला चढवत उट्टे काढले.

पाडगावकरांना भारतरत्न मिळायला हवा

$
0
0
मंगेश पाडगावकर हे मराठी कवितेला पडलेले स्वप्न आहे. त्यांनी एकापेक्षा एक सुंदर व निर्भेळ आनंद देणाऱ्या कविता देऊन मराठी कविताविश्वाचे दालन समृद्ध केले आहे. त्यांना पद्मभूषण मिळाल्याबद्दल आपल्याला अत्यंत आनंद झाला आहे. खरे तर त्यांना भारतरत्नच मिळायला हवा, असे उद्गार शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी काढले.

ऐनवेळच्या खर्चाची धावपळ टाळा

$
0
0
योजनांतर्गत व योजनेतर निधी खर्च करण्यासाठी शेवटच्याक्षणी होणारी धावपळ टाळण्याचा सल्ला राज्याच्या वित्त विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. हा खर्च होणार नसले तर तो तातडीने राज्य सरकारला समर्पित करा असेही वित्त विभागाकडून बजावण्यात आले आहे.

फॅमिली फिजिशियनला ‘लाईफ सेव्हिंग’चे धडे

$
0
0
आजाराचे निदान न झाल्याने पुढील उपचार टाळणाऱ्या पेशंटवर कसे उपचार करावेत, याबाबत फॅमिली फिजिशियन्सना मार्गदर्शन करण्यासाठी भारती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची परिषद नुकतीच घेण्यात आली.

पार्किंग नियमावली सरकारच्या ‘पार्किंग’मध्ये

$
0
0
गेल्या दोन वर्षांपूर्वी महापालिकेने मान्य करून पाठविलेली शहराची पार्किंग नियमावली अजूनही राज्य सरकारकडेच पडून आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला काही दिवसांपूर्वी मान्यता दिल्याची चर्चा आहे.

पुण्याहून अमरावतीला रविवारपासून रेल्वेगाडी

$
0
0
विदर्भ-मराठवाड्यात जाणा-या प्रवाशांच्या सोयीसाठी सुरु करण्यात येणारी पुणे-अमरावती एक्सप्रेस येत्या तीन मार्चपासून सुरु होणार आहे. आठवड्यातून दोन दिवस ही गाडी चालवण्यात येणार आहे. येत्या एक मार्चपासून गाडीचे रिझर्वेशन सुरु होणार असल्याचे मध्य रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.

गुन्हेगाराचा कात्रज येथे खून

$
0
0
कात्रज येथील आगम मंदिराजवळ एका सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. या प्रकरणी हवेली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. बाबा शंकर जाधव (वय २४, रा. साने गुरूजीनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

विनयभंग प्रकरणी दोघा विद्यार्थ्यांना अटक

$
0
0
एका वकिल महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी दोघा विद्यार्थ्यांना अटक केली आहे. भोसलेनगर येथे बुधवारी सकाळी रस्त्याच्या मधोमध उभे राहून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना पाय मारण्याचा उद्योग सुरू असताना हा प्रकार घडला या प्रकरणी एका वकिल महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार कारवाई करण्यात आली आहे.

‘त्रिशंकू’ बैठकव्यवस्थेने विद्यार्थी रडकुंडीला

$
0
0
अभ्यासाचे टेन्शन... दररोज बदलणारे परीक्षा केंद्र... केंद्राच्या शोधासाठी होणारी धावपळ... वर्ग शोधण्यास होणारा त्रास... आणि विद्यार्थी-पालकांचा जीव टांगणीला! ही आहे बारावीच्या वाणिज्य तसेच अन्य विद्या शाखांच्या विद्यार्थ्यांची व्यथा. गरवारे कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांना हा अनुभव दररोज येत असल्याने ते अक्षरश: हवालदिल झाले आहेत.

संपन्न इतिहासाच्या सुरक्षेला भगदाड

$
0
0
ऐतिहासिक इमारतींच्या पाठीमागे भगदाड पडलेल्या सुरक्षारक्षक भिंती आणि त्यावरन अगदी सहज प्रवेश करणारे, या इमारतींच्या वर्गांशी कोणताही संबंध नसणारे नागरिक... नावापुरते असणारे गेट्स आणि नावापुरतीच असलेली सुरक्षाव्यवस्था... आवाराच्या सुरक्षाव्यवस्थेपेक्षाही गाड्यांच्या पार्किंगमधून मिळणा-या उत्पन्नावर अधिक लक्ष देणारे ठेकेदार...

थकती कर्जाच्या वसुलीचे कर्मचा-यांना टार्गेट

$
0
0
थकीत कर्जाच्या वसुलीचे टार्गेट देऊन रुपी बँकेला पुन्हा आर्थिक सुस्थितीत आणण्याचा निर्धार बँकेचे प्रशासक डॉ. संजयकुमार भोसले व कर्मचा-यांनी बुधवारी केला. बँकेचे विलिनीकरण न करता ‘रुपी’ नावानेच बँक सुरू राहावी, असा मनोदयही काही कर्मचा-यांनी बोलून दाखविला.

‘मनसे’ची दगडफेक, राष्ट्रवादीचा मोर्चा

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर नगर येथे झालेल्या दगडफेकीचे पडसाद पुण्यातही उमटले. टिळक रोडवरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर मंगळवारी मध्यरात्री तुफान दगडफेक करत ‘मनसे’ कार्यकर्त्यांनी उट्टे काढले, तर या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी मोर्चा काढला.

४५ टक्के विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद होणार?

$
0
0
शालेय विद्यार्थ्यांना दिली जाणारी स्कॉलरशिपची रक्कम एक मार्चपासून बँक खात्यात जमा करण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील ३२ हजार विद्यार्थ्यांना आधार नोंदणीअभावी अनुदानापासून वंचित रहावे लागणार आहे.

इलेक्ट्रॉनिक मीटरसाठी ३० एप्रिलची डेडलाइन

$
0
0
वर्षभर सांगूनही इलेक्ट्रॉनिक मीटरच्या सक्तीला न जुमानलेल्या रिक्षाचालकांवर परमिट जप्तीची कारवाई होणार आहे. मीटर बसविण्यासाठी रिक्षाचालकांना ३० एप्रिल ही शेवटची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीटर नसलेल्या रिक्षा रस्त्यावर आढळून आल्यास परमिट जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

बारावी फिजिक्ससाठी आजपासून आंदोलन

$
0
0
बारावीचा फिजिक्सचा पेपर अवघड गेल्याने रडकुंडीला आलेल्या विद्यार्थ्यांसमवेत आज सकाळी (गुरुवारी) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागाच्या अध्यक्षांसमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

‘दादा’गिरीनंतर राडा‘राज’

$
0
0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांत आता राज्यभर चकमकी सुरू झाल्या आहेत. मंगळवारी नगरजवळ भिंगार येथे ‘राष्ट्रवादी’च्या काही कार्यकर्त्यांनी राज यांच्या ताफ्यावर केलेल्या दगडफेकीनंतर बुधवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईपासून ते यवतमाळ जिल्ह्यातील वणीपर्यंत सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयांना लक्ष्य केले.

मुलाखतीच्या वेळी वय आडवे आले

$
0
0
वयाच्या अटीमध्ये बसत नसतानाही एका उमेदवाराला आयोगाने अगदी मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत एमपीएससीची परीक्षा देण्याची मुभा दिली. मात्र, मुलाखतीच्या वेळी या उमेदवाराला आयोगाने परत पाठविल्याने आयोगाची ऑनलाइन सिस्टीम पुन्हा एकदा वादात सापडली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images