Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

रुपी बँकेवर प्रशासक

$
0
0
थकीत कर्जाचा वाढलेला बोजा आणि संचित तोट्याचा आकडा ४९० कोटी रुपयांवर गेल्याने रुपी सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेवर प्रशासक म्हणून साखर सहसंचालक डॉ. संजय भोसले व बँकिंगतज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विम्याकडे दुर्लक्ष केल्याने पाच लाखांचा फटका

$
0
0
दोन दिवसांपूर्वी कारचा विमा संपलेला असतानाही विम्याचे नूतनीकरण न करता कार रस्त्यावर आणल्याचा एका विमा एजंटला चांगलाच फटका बसला. भरधाव वेगाने निघालेल्या त्याच्या कारने एका पादचाऱ्याला उडविल्यामुळे पाच लाखाची नुकसानभरपाई त्याला स्वतः भुर्दंड सोसून द्यावी लागली.

विज्ञानाला जोड हवी मानवतेची

$
0
0
आधुनिक युग हे विज्ञानयुग आहे. सर्व प्राण्यांमध्ये मनुष्य प्राणी हा सर्वश्रेष्ठ म्हणून गणला गेला आहे. मेंदूच्या आधारावर माणसाने निसर्गावरसुद्धा मात केली. माणसांच्या गरजा आणि सवयी यांत त्यामुळे आमुलाग्र बदल होत आहे.

दारूसाठी पैसे न दिल्याने मुलाला आपटले

$
0
0
मामे सासऱ्याने ताडी पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून त्याच्या हातात असलेल्या आपल्याच दोन वर्षांच्या मुलाला उचलून डांबरी रस्त्यावर आपटल्याची घटना भोसरीमध्ये घडली. या प्रकरणी सतीश ऊर्फ याडकू नकुशा भोसले (वय ३२, रा. पिंपळगाव) याला अटक करण्यात आली आहे.

काँग्रेसतर्फे जनावरांना मोफत हिरवा चारा

$
0
0
राज्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असल्याने शहर काँग्रेसतर्फे जनावरांसाठी मोफत हिरवा चारा वितरण अभियान राबवले जाणार आहे. त्यानुसार किवळे येथे ४० एकर जमिनीमध्ये जनावरांसाठी मक्याचा चारा उत्पादन करून तो शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ किवळे येथे आठ मार्च रोजी दुपारी दोन वाजता प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याहस्ते बीजारोपण करून केला जाणार आहे.

ड्रायव्हर-कंडक्टरना एसटीचा प्रोत्साहन भत्ता

$
0
0
एसटीच्या उत्पन्नात भरघोस वाढ होण्यासाठी ड्रायव्हर आणि कंडक्टर्सना प्रोत्साहन भत्ता देण्याची योजना एसटी महामंडळाने सुरू केली आहे. राज्यात २३ फेब्रुवारीपासून या योजनेची सुरुवात झाली आहे. त्यामुळे उद्दिष्टापेक्षा जास्त उत्पन्न मिळवणाऱ्या ड्रायव्हर-कंडक्टरना दररोज फायदा होणार आहे.

वाढदिनानिमित्त करणार दुष्काळी भागात मदत

$
0
0
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून ‘संस्कार समूहा’चे संस्थापक अध्यक्ष वैकुंठ कुंभार यांनी त्यांचा वाढदिवस संस्कारक्षम पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

दुष्काळाच्या चर्चेऐवजी रंगले मानापमान

$
0
0
ग्रामीण भागातील लोकांना दुष्काळाची चिंता भेडसावत असतानाच जिल्हा परिषदेची मंगळवारची सर्वसाधारण सभा मात्र, मानापमान, पुरस्कार वितरण आणि राजकीय हेव्यादाव्यामध्ये रंगली. साडेतीन तासांच्या अशा चर्चेनंतरच सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवरील विषयांना हात लागला. जिल्हा प‌रिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

पक्षनेत्यांच्या दबावाचा अधिका-यांना ‘शॉक’

$
0
0
वीजबचत करणा-या उपकरणांच्या खरेदीवरून पुणे महापालिकेत माननीयांच्या दबावाचा शॉक प्रशासनाला बसला आहे. याच दबावतंत्रामुळे एक वरिष्ठ अधिकारी रजेवर गेल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे.

आंबा पिकविण्यास कार्बाइडच्या वापरास बंदी

$
0
0
आंबा पिकविण्यासाठी मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांकडून सर्रासपणे कार्बाइडचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही त्याचा वापर केल्यास अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कारवाईचा बडगा उगारणार आहे. कार्बाइडच्या ऐवजी इथिलिन गॅसचा वापर करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

...यापेक्षा वाईट काय असू शकते?

$
0
0
‘मूत्रपिंडाशी निगडित ऑपरेशन त्वरित करण्याची आवश्यकता आहे. मात्र, माझेच पैसे मला काढता येत नाहीत यापेक्षा वाईट काय असू शकते...व्याजरूपी उत्पन्नातून दैनंदिन गरजा भागवितो.

महामार्ग प्राधिकरणाच्या अधिका-यांना शिवसेनेचा घेराव

$
0
0
कात्रज- देहूरोड बायपास रोडवरील समस्या दूर कराव्यात, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांना मंगळवारी घेराव घालण्यात आला. अखेर या समस्या दूर करण्यासाठी येत्या सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

‘मराठीला अभिजात दर्जा द्या’

$
0
0
अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रकारचे निकष पूर्ण करणारा अहवाल ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या समितीने राज्य सरकारकडे सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी हा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणी आमदार माधुरी मिसाळ यांनी केली आहे.

दौंड ‘प्रिन्स’ निघाला सुखरूप बोअरबाहेर

$
0
0
दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात तीन वर्षाचा हरीश कुंडलिक मोरे खेळता खेळता बोअरवेल मध्ये पडला. तातडीने जेसीबी यंत्र उपलब्ध झाल्याने दीड तासांच्या अथक प्रयत्नाने मुलाला सुखरूप काढण्यात आले.

देवनागरीचा ठसा सोळाव्या शतकापासूनच

$
0
0
सोळाव्या शतकात, शिवाजी महाराजांच्या काळात मोडी लिपीतून व्यवहार सुरू होते, हे सर्वज्ञात आहे. पण देवनागरी लिपीचाही वापर तेव्हापासून सुरू झाला होता, या गोष्टीला पुष्टी देणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज संशोधकांच्या हाती लागला आहे.

टिळक चौकाजवळ ‘एसटी’ने पादचा-याला चिरडले

$
0
0
टिळक चौकात भारती बाजारसमोर स्वारगेटकडून आलेल्या ‘एसटी’ बसने एका पादचाऱ्याला चिरडल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. पादचाऱ्याच्या डोक्यावरूनच एसटीचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. पादचाऱ्याची अद्यापपर्यंत ओळख पटली नसल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.

एलबीटीसाठी नोंदणी येत्या आठवड्यात

$
0
0
जकातीला पर्याय म्हणून राज्यात लागू होत असलेल्या स्थानिक संस्था करासाठी (एलबीटी) पुण्यात येत्या आठवड्यात नोंदणीचे कामकाज सुरू होणार आहे. दरम्यान, ‘एलबीटी’ आकारण्यात येणाऱ्या वस्तूंची यादी आणि दर मार्चच्या प्रारंभी निश्चित करण्यात येणार आहेत.

विद्यापीठाची सुरक्षा रामभरोसेच!

$
0
0
मुख्य प्रवेशद्वारावर केवळ शोभेसाठी उभारण्यात आलेली बॅरिकेड्स, आवारातील गेट्सला केवळ नावासाठीच असलेले कुलूप, प्रत्यक्षात विनाअडथळा आवाराबाहेरील घटकांची होणारी सर्रास ये-जा, कोणत्याही विभागात मिळणारा मुक्त प्रवेश... ही आहे स्थिती पुणे विद्यापीठातील रामभरोसे सुरक्षाव्यवस्थेची.

मराठीसाठी ब्रिटिशांचे ‘आख्यान’

$
0
0
मराठी भाषेच्या प्रचारासाठी ‘मराठी दिन’ साजरा केला जात असला, तरी भाषेच्या प्रसार आणि प्रतिष्ठेसाठी इंग्रजी राजवटीतील प्रशासकांनीच प्रयत्न केले होते. माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टन यांनी मुंबईतील छापखान्यात ‘पंचोपाख्यान’ या पुस्तकासह शब्दकोशाची निर्मितीही केली होती.

चांदणी चौकातील हॉटेलांवर हातोडा

$
0
0
चांदणी चौकामध्ये अपघातात कॉलेज तरुण मृत्युमुखी पडल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी अतिक्रमण विभागाने या चौकातील सर्व हॉटेल आणि स्टॉलवर हातोडा मारल्याने हा चौक मोकळा झाला आहे. हा चौकात हॉटेलचालकांनी अनधिकृत बांधकामे केल्याने आणि स्टॉल उभारण्यात आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images