Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

ठाकरे व्यंगचित्र गॅलरीच्या नियोजित जागेत बदल

$
0
0
गरवारे बाल भवनाच्या जागेवरून वाद उभा राहिल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या व्यंगचित्र गॅलरीच्या नियोजित जागेत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे गरवारे बाल भवनाच्या जागेला धक्का लागणार नाही, असे सांगण्यात आले.

वारज्यात ३९ हजारांचा गुटखा जप्त

$
0
0
वारज्यातील एका विक्रेत्याकडून ३८ हजार ६७० रुपयांचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई करून जप्त केला. अन्न सुरक्षा अधिकारी पराग नलवडे आणि उदय कुलकर्णी यांच्या पथकाने वारजे पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

नगरसेविकांचा रणचंडिकेचा अवतार

$
0
0
पुणे महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीने आयोजित केलेल्या महिला महोत्सवातील ‘मानापमान’ नाट्याचा दुसरा प्रयोग बुधवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झाला.

दोघांना न्यायालयीन कोठडी

$
0
0
बनावट कागदपत्राद्वारे दिघी येथून सिमकार्डाची खरेदी केल्याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेल्या दोघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. बोस यांनी हा आदेश दिला.

औषधविक्री आजपासून १० ते ६ पर्यंतच

$
0
0
औषधविक्री दुकानात फार्मासिस्टची सक्ती करीत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या कारवायांना कंटाळलेल्या पुणे शहरासह राज्यातील सर्व केमिस्टने स्वयंस्फूर्तीने उद्यापासून (गुरुवारी) सकाळी दहा ते सहा वाजेपर्यंत औषध विक्री करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला.

येरवडा तुरुंगात कैद्याचा मृत्यू

$
0
0
येरवडा तुरुंगामध्ये खुनाच्या गुन्ह्यातील एका आरोपीचा बुधवारी मृत्यू झाला. त्याचे मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. कुशाबा बाजीराव ओव्हाळ असे मृत्यू झालेल्या आरोपीचे नाव आहे. पौड पोलिस स्टेशन येथील खूनाच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती.

‘ऑर्गन ट्रान्सप्लांट’च्या मोहिमेला पुण्यात खीळ

$
0
0
राज्याच्या आरोग्य विभागाकडून वारंवार स्मरणपत्रे पाठवूनही अतिदक्षता विभाग (आयसीयू) आणि ऑपरेशन थिएटरची सोय असलेल्या खासगी हॉस्पिटलमध्ये ‘नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रायव्हल सेंटर’ (एनटीओआरसी) सुरू करण्याबाबत पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची अनास्था असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पुण्यात ‘ब्रेनडेड’ पेशंट घोषित होण्यास ‘ब्रेक’ लागणार आहे.

पंढरपूरमध्ये बोगस विद्यार्थी

$
0
0
पंढरपूरमध्ये खासगी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शंभरहून अधिक नापास विद्यार्थ्यांनी यंदा १७ नंबरच्या फॉर्मचा आधार घेत बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरले होते. संबंधित विद्यार्थ्यांचा हा प्रयत्न चुकीचाच असून त्यांना आता सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेला बसता येणार नसल्याचेही बोर्डाच्या सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.

इंजिनीअरिंग निकालाचा प्रश्न कुलपतींकडे

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग शाखेच्या निकालांचा मुद्दा आता थेट कुलपतींकडे नेण्यात आला आहे. पुनर्मूल्यांकनात झालेल्या त्रुटींबाबत दाद मागण्यासाठी एका विद्यार्थिनीने बुधवारी थेट राजभवन गाठल्याचे समजते.

गणेश पेठेत तरुणाचा खून; आरोपी पसार

$
0
0
गणेश पेठेतील दुधभट्टीजवळ गुरुवारी (२१ फेब्रुवारी) दुपारी एका तरुणावर चौघांनी धारदार हत्यारांनी वार करून त्याचा खून केला. खुनाचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नाही, मात्र पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. योगेश विठ्ठल लोंढे (वय २५, रा. ताडीवाला रोड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हेवीवेट स्थायीवर लाइटवेट गट नाराज

$
0
0
स्थायी समितीवर पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाच पुनःपुन्हा संधी मिळाल्याचा आरोप करून, काँग्रेसच्या नगरसेवकांनी गुरुवारी पक्षाच्या बैठकीवर बहिष्कार घातला. त्यामुळे गेल्या काही काळात खदखदत असलेली नाराजी पुन्हा उफाळून समोर आली आहे.

पं. अभिषेकी महोत्सवाची नांदी

$
0
0
‘बुवांनी शिकवताना कधीही हातचे राखून ठेवले नाही. त्यांनी त्यांच्या सगळ्याच शिष्यांना भरभरून दिले. मीही त्यांच्याबरोबर चार नाटके केली आणि त्यांनीच खऱ्या अर्थाने माझ्यातला गायक घडवला,’ अशी भावना ज्येष्ठ गायक पं. रामदास कामत यांनी व्यक्त केली.

उद्‍घाटनाच्या मेणबत्तीचा ‘जीबी’त पुन्हा भडका

$
0
0
महिला महोत्सवाच्या उद्घाटनातील दीपप्रज्वलनात पेटलेल्या मेणबत्तीचा गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भडका उडाला. या महोत्सवाच्या नावाखाली उधळपट्टी केल्याचा आरोप विरोधी नगरसेविकांनी केल्याने सभेत गदारोळ झाला.

मेडिकल स्टोअर्स सहानंतर बंद

$
0
0
फार्मासिस्टच्या उपस्थितीची सक्ती करणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवायांना वैतागलेल्या पुणे शहरासह राज्यातील औषध विक्रेत्यांनी गुरुवारी सायंकाळी सहानंतर दुकानांचे शटर खाली घेतले. परिणामी सहानंतर औषध खरेदीस येणाऱ्या नोकरदार, तसेच गरजू पेशंटची गैरसोय झाली.

अनु‌सूचित जातीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देणार

$
0
0
स्पर्धा परिक्षांमध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सहभाग वाढावा, यासाठी संपूर्ण राज्यात यूपीएससी आणि एमपीएससीचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण वर्गात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दर महिन्याला चार हजार रुपयांचे विद्यावेतन आणि पाच हजार रुपयांची पुस्तके दिल‌ी जाणार आहेत.

बसखाली सापडून विद्यार्थी ठार

$
0
0
चांदणी चौकात गुरुवारी सकाळी स्कूलबस आणि ट्रक यामध्ये सापडून गरवारे कॉलेजमधील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. स्कूलबसच्या धडकेत हा विद्यार्थी ठार झाला असून, बसने आणखी एका दुचाकीलाही धडक दिली. या दुचाकीवरील दोघे जखमी झाले, तर बसमधील दोघे विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत.

पीएमपी दरवाढीबाबत आता सोमवारी बैठक

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) संचालक मंडळाची तिकीट दरवाढीबाबत शुक्रवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली असून, येत्या सोमवारी (२५ फेब्रुवारी) या संदर्भात निर्णय घेतला जाणार आहे. महापालिकेच्या बजेटची बैठक शुक्रवारी होणार असल्याने पीएमपीची बैठक सोमवारी दुपारी चार वाजता घेण्यात येणार आहे.

‘ब्रायफेन रोप’ला सोमवारचा मुहूर्त

$
0
0
पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर दुभाजक तोडून होणारे जीवघेणे अपघात रोखण्यासाठी ब्रायफेन वायर रोप बसविण्याच्या कामाला सोमवारचा (२५ फेब्रुवारी) मुहूर्त मिळाला आहे. वेगाने येणारी वाहने दुभाजकावर आदळून दुसऱ्या बाजूच्या लेनमध्ये जाण्याचे प्रकार यामुळे रोखले जाणार आहेत.

चांदणी चौकातील अपघाताचे पडसाद ‘जीबी’मध्ये

$
0
0
चांदणी चौकात झालेल्या अपघातात विद्यार्थी मृत्युमुखी पडल्याच्या घटनेचे पडसाद पुणे महापलिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. शिवसेनेच्या आमदारांनी महापालिका भवनात ठिय्या आंदोलन केले. महापालिका आयुक्त महेश पाठक यांनी येत्या १५ दिवसांत या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन ​सभेत दिले.

एजंटच्या घुसखोरीने पासपोर्ट अधिकारी हैराण

$
0
0
पासपोर्टच्या अर्जाची अपॉइंटमेंट मिळविण्यासाठी एजंटची घुसखोरी सुरू असून ते वेबसाइटही हँग करीत आहेत. त्यांच्यामुळेच इतर नागरिकांना अपॉइंटमेंट मिळालयाला उशीर होत असल्याचे पासपोर्ट अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. एजंटमार्फत आलेले अर्जदार अनेकदा गैरहजर राहतात, त्यामुळे इतरांचे नुकसान होते; हे टाळण्यासाठी पुढील काही महिन्यांपासून नागरिकांना अपॉइंटमेट घेतानाच पासपोर्टचे शुल्क ऑनलाइन भरावे लागणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images