Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पावती बघूनच सिलिंडरचे पैसे द्या

0
0
सिलिंडरची सबसिडी ‘कॅश ट्रान्सफर’ द्वारे थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या कोणत्याही सूचना अद्यापपर्यंत ऑइल कंपन्यांनी दिलेले नाहीत. त्यामुळे गॅस वितरकांना ग्राहकांकडून सिलिंडरसाठी अधिकचे पैसे घेता येणार नाहीत.

संपाची हाक... आदेशापुरतीच

0
0
कामगार संघटनांनी आजपासून दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला असला, तरी प्रत्यक्षात मात्र बँकसेवा वगळता सार्वजनिक व्यवहार विनाव्यत्यय सुरू राहण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

शिवसेना ही खंडणी सेना :भुजबळ

0
0
‘शिवाजी महाराजांची सेना ही गोरगरीबांची काळजी वाहणारी होती. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात न लावणारी होती. पण त्यांच्या नावाने आता मिरवणाऱ्या शिवसेनेची कार्यपद्धती ही ‘जय शिवाजी, जय भवानी अन् टाक खंडणी’ अशी आहे,’ अशी बोचरी टीका सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

मराठी भाषादिनापासून 'ऑडिओ बुक'

0
0
मराठी साहित्याचा ठेवा ‘ऑडिओ बुक’च्या माध्यमातून जतन करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारने हाती घेतला आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे आत्मचरित्र ‘कृष्णाकाठ’, ज्ञानपीठ विजेते साहित्यिक विंदा करंदीकर आणि कुसुमाग्रज यांच्या प्रत्येकी दोन कवितासंग्रहांसह समर्थ रामदासांचा दासबोध पहिल्या टप्प्यात ऑडिओ बुकच्या स्वरूपात आणण्यात आला आहे.

अभिनेत्री प्राची मते हिचे निधन

0
0
मराठी टीव्ही मालिकांमधील अभिनेत्री प्राची मते हीचे काल रात्री उशीरा पुण्यात निधन झाले. ई टिव्हीवरील ‘चार दिवस सासूचे’ आणि स्टार प्रवाहवरील ‘अग्निहोत्र’ या मालिकांमध्ये आपली छाप पाडणारी प्राचीला वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी बोनमॅरो कॅन्सर झाला होता.

बारावीचे ‘अनधिकृत’ विद्यार्थी अडकले जाळ्यात

0
0
बारावीला नापास होऊनही एका खासगी शिक्षणसंस्थेच्या माध्यमातून अनधिकृतरीत्या ‘१७ नंबर’च्या फॉर्मचा आधार यंदा पुन्हा बारावी देण्याचा विद्यार्थ्यांचा डाव बुधवारी पंढरपुरात उघडकीस आला.

‘दख्खन जत्रा’ आतबट्ट्यात

0
0
बचत गटांच्या उत्पादनाला बाजारपेठ, महिला सक्षमीकरण, उत्पादक ते ग्राहक सांगड असा मोठा गजावाजा केलेली ‘दख्खन जत्रा’ केवळ नियोजनाअभावी आतबट्ट्याची ठरली आहे. यंदाच्या जत्रेत निराशाच पदरी पडल्याची भावना बचत गटांनी व्यक्त केली आहे.

प्रभागातील कामे करा; वाहतुकीचे नंतर बघू...

0
0
शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतलेला असताना दुसरीकडे पुणे मुंबई रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी त्यांच्याच हस्ते भूमिपूजन झालेल्या उड्डाणपुलाच्या प्रकल्पातील साडेआठ कोटींच्या निधीला माननीयांनी कात्री लावली आहे.

स्थायी समिती झाली ‘हेवीवेट’

0
0
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे ज्येष्ठ सदस्य पुढे सरसावल्यामुळे महापालिकेतील स्थायी समिती ही हेवीवेट समिती बनली आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष चेतन तुपे आणि मनसेचे माजी गटनेते रवींद्र धंगेकर यांच्यासह आठ सदस्यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली.

नवनिर्वाचितांना लागले कार्यकारिणी स्‍थापनेचे वेध

0
0
नाट्य परिषदेची मुंबईची निवडणूक स्थगित ठेवण्यात आली असली, तरी उर्वरित राज्यातून निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित उमेदवारांना कार्यकारिणी स्थापनेचे वेध लागले आहेत. त्यासाठी, मुंबई वगळता उर्वरित राज्यातील सर्व उमेदवारांनी धर्मादाय आयुक्तांकडे गाऱ्हाणे मांडण्याचे निश्चित केले आहे.

‘एमटी-सीईटी’स बसण्यास इच्छुक सर्वांना मिळणार ‘अॅप्लिकेशन किट’

0
0
‘येत्या १६ मे रोजी होणाऱ्या ‘एमटी-सीईटी’साठी बसण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनेक ज्युनिअर कॉलेजांनी अद्याप कळवलेली नाही. मात्र, कॉलेजांनी संख्या कळवली नाही, तरी विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये; त्यांना ‘सीईटी’च्या अर्जासाठीचे ‘अॅप्लिकेशन किट’ मिळण्याची व्यवस्था केली जाईल,’ असा दिलासा पुणे जिल्ह्यासाठी ‘सीईटी’ समन्वय केंद्र असलेल्या ‘सीओईपी’तील परीक्षा समन्वयकांनी दिला आहे.

कमाल तापमान पुन्हा ३४ अंशांवर

0
0
गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी दिवसाही गार वाऱ्यांनी हुडहुडी भरणाऱ्या पुणेकरांना बुधवारी मात्र उन्हाचा वाढलेला चटका सहन करावा लागला. शहरात ३४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.

अपक्ष उमेदवार शिरोळे ठरले निवडणुकीला अपात्र

0
0
निवडणूक खर्चाचा तपशील सादर न केल्याबद्दल पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे अनिल शिरोळे नव्हे, तर अपक्ष उमेदवार बाळू उर्फ अनिल शिरोळे हे ‌निवडणूक लढविण्यास अपात्र ठरले आहेत.

‘त्या’बेकायदा बांधकामांना नोटीस बजावणार

0
0
महापालिका हद्दीलगतच्या सहा गावांतील २३ बेकायदा बांधकामांना नियोजन प्राधिकरण असलेल्या जिल्हा परिषदेमार्फत कारवाईची नोटीस बजावण्यात येणार आहे. या ठिकाणी नेमके किती बेकायदा बांधकाम झाले याची माहिती घेण्यासाठी संयुक्त पथक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणित-इंग्रजीच्या शंकांना ‘हेल्पलाइन’ने दिले उत्तर

0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय मंडळातर्फे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या काळामध्ये समुपदेशनासाठी ‘हेल्पलाइन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेला विद्यार्थी आणि पालकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे या समुपदेशकांकडून बुधवारी सांगण्यात आले.

साडेचारशे कोटींचा मलिदा... सुविधा मात्र शून्य!

0
0
वाहन नोंदणी, टॅक्स आणि दंडापोटी पुणेकरांनी यंदाच्या वर्षी साडेचारशे कोटी रुपयांचा महसूल परिवहन खात्याच्या तिजोरीत भरला. वर्षाला एवढा महसूल भरूनही वाहतूक कोंडीतून पुणेकरांची सुटका होऊ शकलेली नाही.

सुरळीत... संप आणि दैनंदिन व्यवहारही!

0
0
कामगारांच्या विविध मागण्यांसाठी संघटनांनी देशव्यापी संप पुकारला असला, तरी अपेक्षेप्रमाणे सर्वसमान्य जनजीवन सुरळीतपणे सुरू होते. बँकांसह पोस्ट-टेलिफोन, महसूल आदी कार्यालयांमधील संघटनांनी कडकडीत संप पाळला, तर इतर सर्व ठिकाणी काही संघटना-कर्मचाऱ्यांचा अपवाद वगळता कामकाज बव्हंशी सुरळीतपणे सुरू होते. हेच चित्र संपाच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारीही कायम राहण्याचे संकेत आहेत.

बारावी परीक्षेचा यंदा ‘गैरमार्गाशी लढा’

0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (एसएससी बोर्ड) राज्यभरात घेण्यात येणारी बारावीची परीक्षा गुरुवारपासून (२१ फेब्रुवारी) सुरू होत आहे.

उद्योगनगरीत संपाला थंड प्रतिसाद

0
0
कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपाला पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी (२० फेब्रुवारी) पहिल्याच दिवशी थंड प्रतिसाद मिळाला. टाटा मोटर्ससह सर्व प्रमुख कंपन्यांमधील कामकाज सुरळीत होते. तर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, महापालिकेचे कामकाज, रिक्षा वाहतूक, पेट्रोल पंप, बाजारपेठा नेहमीप्रमाणे कार्यरत राहिल्या.

‘साहेब, आम्हाला बेघर करू नका’

0
0
‘दागदागिने विकून आम्हाला परवडेल असे घर आम्ही विकत घेतले आहे. साहेब, ते पाडून आम्हाला बेघर करू नका,’ अशी विनंती शिवणे येथील सद्गुरू रेसिडेन्सीमधील साठ सदनिकाधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images