Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

विद्यार्थीसंख्या कळविण्याबाबत काही कॉलेजांचा ‘असहकार’

$
0
0
इंजिनीअरिंग-फार्मसीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘एमटी-सीईटी’साठी नेमके किती विद्यार्थी बसणार आहेत, याची माहिती काही कॉलेजांनी अद्याप न कळविल्याने प्रवेशयंत्रणा अंधारात असून, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळून प्रक्रिया सुलभरित्या पार पडण्यासाठी कॉलेजांकडून सहकार्याची अपेक्षा केली जात आहे.

तहान भागविण्यासाठी लागणार ७५ कोटी रुपये

$
0
0
उन्हाचा कडाका वाढत असताना येत्या मार्चपर्यंत पुणे विभागातील २००७ गावे व सहा हजार १९२ वाड्या तहानलेल्या असणार आहेत. या तहानलेल्यांची पाण्याची गरज भागविण्यासाठी प्रस्तावित आठ हजार योजनांसाठी ७५ कोटी रुपयांची गरज लागणार आहे.

आता राष्ट्रवादी युवकचेही ‘दुष्काळ सहाय्यता आभियान’

$
0
0
युवक काँग्रेसच्या दुष्काळी दौऱ्यापाठोपाठ राष्ट्रवादी युवक काँग्रेसनेही दौऱ्याचे रण‌शिंग फुंकले आहे. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीने ‘दुष्काळग्रस्त साहाय्यता अभियान’ हाती घेण्यात आले असून, त्याचा भलामोठा कार्यक्रमही आखला आहे.

सिग्नल आता येणार ‘लायनीत’

$
0
0
कुठल्या चौकात सिग्नल बसवावा... त्याचे सिंक्नोराईजिंग कसे असावे.... सिग्नल पोस्टची दिशा कशी असावी.... अशा विविध प्रश्नांची उत्तरे एकाच ठिकाणी मिळतील अशी ‘स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिज’ (एसओपी) तयार करण्यासाठी वाहतूक पोलिस आणि महापालिका अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे.

परीक्षा सुरू, पेपर तपासणी बंद

$
0
0
राज्यातील ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांच्या मागण्यांना राज्य शासनाकडून लिखित मान्यता न मिळाल्याने, अखेर गुरुवारपासून या प्राध्यापकांनी बारावीच्या पेपर तपासणीवरील आपल्या पूर्वघोषित बहिष्कारास सुरुवात केली. याविषयी राज्य शासनाकडून मिळालेल्या आश्वासनांनंतर प्राध्यापकांनी शासनाला या मागण्यांना मान्यता दिल्याविषयीचे लिखित पत्रक काढण्यासाठी गुरुवारपर्यंतची (२१ फेब्रुवारी) मुदत दिली होती. मात्र, तरीही शासनाकडून त्याविषयी विचार न झाल्याने प्राध्यापकांनी हे पाऊल उचलले आहे.

मराठीसाठीही ‘कॉपी’च्या कुबड्या

$
0
0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मराठीच्या पेपरला राज्यभरातून एकूण १६४ कॉपी केसेस नोंदविण्यात आल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले

मोर्चे, निदर्शने अन् निषेध सभा...

$
0
0
मोर्चा, निदर्शने, निषेध सभा आणि सरकारी ऑफिसेमधील कामकाज बंद करून, देशव्यापी संपादरम्यान कामगारांच्या मागण्यांसाठी आवाज उठविण्यात आला. सरकारी बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी दोन दिवसांच्या संपात सहभागी झाल्याने ब्रँच बँकिंगवर परिणाम झाला. मात्र, एटीएम आणि नेट बँकिंग यामार्फत व्यवहार पूर्ण करण्यावर अनेकांनी भर दिला. संपामुळे एक हजार कोटी रुपयांचे चेकचे व्यवहार ठप्प राहिले.

वाटले टायवाले, निघाले फेरीवाले !

$
0
0
सुटाबुटात अचानक आलेल्या दोन चिनी पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी कोणताही कसूर सोडला नाही; पण हे पाहुणे ‘टायवाले’ नसून ‘फेरीवाले’ असल्याचे लक्षात आल्यावर सगळ्यांचा चांगलाच ‘पोपट’ झाला ! ‘चिनी’ बनावटीला आपण किती भुलतो, याच्या शिळोप्याच्या गप्पांनी मग हास्याचे फवारे उडत राहिले. पण प्रत्येकाच्या मनात खजिल झाल्याची भावना होती.

रमजानच्या आधी झाली होती रेकी

$
0
0
पुण्यातील जंगली महाराज साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या सईद मकबूल उर्फ जुबेर आणि इम्रान खान (दोघेही रा. नांदेड) यांनी गेल्या वर्षी हैदराबाद येथील दिलसुखनगरची रेकी केली होती. इंडियन मुजाहिदीनच्या (आयएम) म्होरक्या रियाज भटकळ याच्या सांगण्यावरून ही रेकी करण्यात आली होती.

सुटाबुटात 'चिनी' फेरीवाले!

$
0
0
सुटाबुटातील दोन चिनी पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी कोणताही कसूर सोडला नाही; पण हे पाहुणे ‘टायवाले’ नसून ‘फेरीवाले’ असल्याचे लक्षात आल्यावर सगळ्यांचाच ‘पोपट’ झाला ! ‘चिनी’ बनावटीच्या भुलभुलैयावर मग अध्यक्षांच्या दालनातच बराच वेळ चर्चा रंगली.

स्त्रियांनी घ्यावी काळजी

$
0
0
कुटुंबाचा कणा म्हणून सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्त्रियांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन ‘लवासा विमेन्स ड्राइव्ह’च्या व्यासपीठावरून नुकतेच करण्यात आले.

‘आशा’ महिलांच्या हक्काची

$
0
0
स्त्रियांसाठी निरपेक्षपणे काम करणाऱ्या ‘आशा’ (अॅक्शन फॉर सेल्फ रिलायन्स, होप अँड अवेअरनेस) या संस्थेने नुकताच वीस वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहे. यानिमित्त संस्थेच्या कार्याचा घेतलेला आढावा…

आश्वासक योजनेचा दुष्काळ

$
0
0
पुणेकरांसाठी महापालिकेच्या प्रत्येक बजेटमध्ये आकर्षक योजना जाहीर करण्याचा प्रघात आहे. त्यातील बहुतांश योजना कागदावर राहतात, हे उघड सत्य आहे. मात्र, या बजेटमध्ये कागदावर दाखवण्यासारखीही आश्वासक योजना आखलेली नाही.

‘सांस्कृतिक’ उधळपट्टीला चाप

$
0
0
सहप्रायोजकत्वापाठोपाठ सांस्कृतिक महोत्सवांच्या आयोजनातील उधळपट्टीलाही कात्री लावण्याचे धाडसी पाऊल यंदा स्थायी समितीने उचलले आहे. महापालिकेचे काही ठराविक महोत्सव वगळता अन्य अनेक महोत्सवांसाठी केलेल्या तरतुदी रद्द किंवा कमी करण्यात आल्या आहेत.

‘जेंडर बजेट’ने केली निराशा

$
0
0
महापालिकेमध्ये ५० टक्के नगरसेविका आल्या असल्याने या वेळच्या जेंडर बजेटमध्ये महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, महिलांची घोर निराशा झाली आहे. कारण एखादा अपवाद वगळता जुन्या योजनांना नवा तजेला देण्याची किमया करण्यात आली आहे.

‘कोथरूड’वर चांदेरेंचा डोळा

$
0
0
‘वॉर्डापुरते न पाहता साऱ्या शहराकडे लक्ष द्या,’ हा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा सल्ला महिन्याभरातच विसरून स्थायी समितीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी बजेटपासूनच विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

उन्हाळ्यातील टँकरसाठी सव्वातीन कोटी

$
0
0
पुणेकरांसाठी २४ तास आणि मीटरने पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका आग्रही असली, तरी आगामी उन्हाळा हा पुणेकरांसाठी तहानलेला आणि पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहणारा असा जाणार आहे.

आमदनी चवन्नी; खर्चा रुपय्या

$
0
0
कोणत्याही क्षणी रद्द होण्याच्या मार्गावर असलेल्या जकातीचे संभाव्य उत्पन्न आणखी वाढवून धरण्याचा शहामृगी पवित्रा घेत पुणे महापालिकेच्या बजेटचा डोलारा तब्बल चार हजार कोटी रुपयांवर पोहोचला आहे. महापालिका आयुक्तांनी मांडलेल्या बजेटपेक्षा स्थायी समितीचे हे बजेट साडेपाचशे कोटी रुपयांनी फुगले आहे.

नाट्य परिषद निवडणुकीची मंगळवारी मतमोजणी

$
0
0
डुप्लिकेट मतपत्रिकांमुळे नाट्य परिषदेची मुंबईतील निवडणूक रद्द ठरविण्यात आली असली, तरी या मतपत्रिका वगळता उर्वरित मतपत्रिकांची मोजणी मंगळवारी करावी, असे आदेश धर्मादाय आयुक्तांनी शुक्रवारी दिले आहेत.

पीडीसीसी निवडणूक जून-जुलैत

$
0
0
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (पीडीसीसी) निवडणूक येत्या जून-जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे. सहकार कायद्यातील घटना दुरुस्तीचा ठराव बँकेत झाल्यानंतर निवडणुकीच्या हालचालीला वेग येणार आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images