Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘त्यांच्या’वर कारवाई कधी?

$
0
0
शहरभरातील टपऱ्या, पथारी व्यावसायिक आणि लहान-मोठ्या दुकानदारांवर कारवाई करून रस्ते व फुटपाथना मोकळा श्वास मिळाला असला, तरी प्रत्यक्षात मात्र रस्तोरस्ती नियमांचे बेधडकपणे उल्लंघन होत आहे. परिणामी, वाहतूक सुरळीत करण्याची ध्येयसिद्धी अजूनही दृष्टिपथात नाही.

आता पीएमपीची तिकिटे महागणार

$
0
0
पेट्रोलियम कंपन्यांकडून डिझेलवर देण्यात येणारी सवलत बंद करण्यात आल्याने आणि वाढता तोटा यामुळे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे. याबाबतच्या प्रस्तावावर येत्या शनिवारी (१६ फेब्रुवारी) संचालक मंडळाची बैठक होणार आहे.

खडसेंच्या मुलीचे लग्न साधेपणाने

$
0
0
नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या मुलीच्या लग्नावरून गहजब सुरू असतानाच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मात्र गुरुवारी साधेपणाने मुलीचा लग्नसोहळा साजरा केला. व्हीआयपींच्या उपस्थितीत कमी खर्चात लग्न होऊ शकते, असा दावाही त्यांनी केला.

‘अॅम्बी व्हॅली’त बेकायदा बांधकाम

$
0
0
सहारा समूहाने लोणावळ्यात उभारलेल्या ‘अॅम्बी व्हॅली’ प्रकल्पात बेकायदा बांधकाम केल्याचे आणि पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे यासंदर्भात नेमलेल्या सत्यशोधन समितीला आढळल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. समितीचा हा अहवाल लवकरच पर्यावरण विभागाला सादर केला जाणार आहे.

चिमुकल्यांच्या कॅन्सरमागे अनुवंशिकता

$
0
0
बदलत्या जीवनशैलीतील हल्ली तिशीतच कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत आहे. मात्र, अवघ्या आठ-दहा वर्षांच्या चिमुकल्यांना कॅन्सरचा विळखा पडल्याची उदाहरणे सध्या वाढली असून अनुवंशिकता, हेच त्यामागील प्रमुख कारण सांगितले जात आहे.

पर्यायी यंत्रणेपेक्षा चर्चा करू

$
0
0
सीनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी आपल्या मागण्यांसाठी परीक्षांच्या कामांवरील बहिष्कार कायम ठेवला आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाने आता परीक्षांच्या कामांसाठी पर्यायी यंत्रणा उभारण्याचा विचार करण्यापेक्षा, प्राध्यापक संघटनांशी चर्चा करत सामोपचाराच्या माध्यमातून विद्यापीठासमोरील अडचणी सोडविण्याचा निर्णय घेतला आहे.

५ मिनिटांत घडल्या २ सोनसाखळी चोऱ्या

$
0
0
पुणे-सातारा रोडवर राव हॉस्पिटलसमोरून पतीच्या दुचाकीवर चाललेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. या घटनेनंतर अवघ्या पाचच मिनिटांत मित्रमंडळ चौकातही या चोरट्यांनी सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले.

आता दादांचा दुष्काळी दौरा

$
0
0
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वारीज चव्हाण यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार हे ही दुष्काळी गावांचा दौरा करणार आहेत. मात्र, हा दौरा मराठवाडा वा खान्देशात नसून तो बारामती ते पुरंदर व्हाया दौंड असा असणार आहे.

‘सक्षम’ निर्माण करणार महिलांबद्दल आदर

$
0
0
‘मुलांमध्ये लहान वयातच महिलांबद्दल आदर निर्माण होऊन त्यांची महिलांकडे पाहण्याची मानसिकता बदलावी, यासाठी ‘सक्षम’ योजनेद्वारे ११ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना धडे दिले जाणार आहेत.

पासपोर्ट कार्यालयात आज भरणार मेळा

$
0
0
‘पासपोर्ट केंद्रा’तर्फे उद्या, शनिवारी पासपोर्ट मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. घोरपडी-मुंढवा रस्त्यावरील पासपोर्ट कार्यालयामध्ये दुपारी तीन वाजल्यानंतर हा मेळा भरणार आहे.

गायकवाड खूनातील चौघांना अटक

$
0
0
इंदापूर येथील चंद्रकांत गायकवाड खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार लुंब्या उर्फ संतोष चांदीलकर, सत्पाल महादेव रुपनवर यांच्यासह चौघांना संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली.

टिळक पुलावरून शनवारात जाण्यास बंदी

$
0
0
नदी पात्रातून येणाऱ्या वाहनांना शनिवार पेठेकडे जाण्यासाठी जयंतराव टिळक पुलावरून बंदी घालण्यात आली आहे. या वाहनांना पुलाखालून पलीकडच्या बाजूने शनिवार पेठेकडे जाण्यासाठी रस्ता करण्यात येत आहे.

पीएमपी दरवाढीची बैठक लांबणीवर

$
0
0
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपी) तिकीट दरात वाढ करण्याच्या प्रस्तावाबाबत आज, शनिवारी होणारी बैठक रद्द करून २२ फेब्रुवारीला घेतली जाणार आहे.

संशयातून पतीकडून खुनाचा प्रयत्न

$
0
0
पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या सहकाऱ्यावरच कोयत्याने वार केले. हिंजवडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही झाली आहे.

जिल्ह्यातील बेकायदा बांधकामांचे काय?

$
0
0
महापालिका हद्दीलगतच्या गावांबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात हजारो बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. एकट्या हवेली तालुक्यात दहा हजारांहून अधिक बेकायदा घरे व इमारती बांधल्या गेल्या आहेत.

हद्दीलगतची बेकायदा बांधकामे पाडा

$
0
0
पुणे महापालिका हद्दीलगतच्या सहा गावांतील बेकायदा बांधकामे तीन महिन्यांत पाडण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. ही बांधकामे काढल्याबाबतचा अहवालही या मुदतीत सादर करण्याची तंबी कोर्टाने दिली आहे.

पिंपरीत जगतापांची शाही पंगत

$
0
0
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता समारंभ प्रदर्शनावरील पैशाच्या उधळपट्टीवर नियंत्रण असावे, या नेत्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न आमदार लक्ष्मण जगताप यांनी मात्र वाढदिवसानिमित्त शाही मेजवानीचा शुक्रवारी (१५ फेब्रुवारी) थाट मांडला.

‘एनए’ची फाइल पाहा ONLINE

$
0
0
बिगरशेती परवानगीसाठी (एनए) फाइल दाखल केल्यानंतर नोंदणीपासून मान्यतेपर्यंतचा या फाइलचा प्रवास आता ऑनलाइन पाहण्याची सोय करण्यात आली आहे. फाइलच्या प्रवासातील वेगवेगळे तांत्रिक अडथळे दूर केल्यानंतर यशस्वी झालेली ही पद्धती आता पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली आहे.

अन्य पत्रे मिळतात; ‘आधार’च का रिटर्न?

$
0
0
‘आमच्या आहे त्याच पत्त्यावर बाकीची सर्व पत्रे, स्पीड पोस्ट आणि अगदी कुरिअरसुद्धा व्यवस्थित पोहोचत असताना, नेमकी आधार कार्डेच कशी काय परत जातात,’ असा उद्विग्न सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

नोंदणीकृत विवाहांना प्रोत्साहन

$
0
0
‘लग्न करताना होणारी उधळपट्टी टाळून नोंदणीकृत विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्नशील आहे. याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच त्याबाबतचा निर्णय जाहीर होईल,’ असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images