Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

बँगचोर छारा गँग गजाआड

$
0
0
गेल्या पंधरवाड्यात बॅगचोरीचे १२ गुन्हे करणा-या अहमदाबाद येथील छारा गँगला गुन्हे शाखेने गजाआड केले आहे. गँगच्या म्होरक्यावर पुणे शहरात ४० गुन्हे दाखल असून, यातील ३० गुन्ह्यांत त्याला अटक झालेली आहे.

...आता जबाबदारी महावितरण, पोलिसांची

$
0
0
महापालिकेकडून अतिक्रमणांविरोधात कारवाई करण्यात आल्यानंतर स्टॉलधारक आणि फेरीवाल्यांकडून पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी पोलिस आणि महावितरण या दोन्ही विभागांनीही स्वतंत्रपणे कारवाई करण्याबाबतचे पत्र महापालिकेने या विभागांना पाठवले आहे.

उंटाचा पाय अन् वाहतुकीची कोंडी

$
0
0
पुलावरील पावसाचे पाणी जाण्यासाठी ठेवलेल्या होलमध्ये उंटाचा पाय अडकल्याने बुधवारी संध्याकाळी म्हात्रे पूल परिसरामध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे दोन तासांनी उंचाचा पाय सुखरूप काढण्यात यश आले.

पत्नीचे रेशन, आधार कार्ड काढले

$
0
0
बांगलादेशी महिलेबरोबर लग्न करून तिचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड काढल्याप्रकरणी खडक पोलिसांनी एकाला अटक केली आहे. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता १५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एम. पाजनकर यांनी हा आदेश दिला.

..तर पासपोर्टसाठी थेट अपॉइंटमेंट

$
0
0
पासपोर्ट काढण्यासाठी ऑनलाइन अपॉइंटमेंट मिळविण्यात अडचणी आल्या, तर त्या नागरिकांना पासपोर्टसाठी थेट अपॉइंटमेंट देण्यात येईल, असे आश्वासन पुणे पासपोर्ट कार्यालयाने दिले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका लांबणीवर?

$
0
0
पुण्यासह, खडकी आणि देडू रोड कॅन्टोमेंट बोर्डाची मुदत संपण्यास जेमतेम साडेतीन महिने राहिले असताना, निवडणुकीसाठी हालचाली होत नसल्याचे दिसून आले आहे. संरक्षण खात्याकडून अजून ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला नसल्याने तिन्ही बोर्डाच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

‘एमटीडीसी’ची धाव पायवाटांपर्यंत

$
0
0
इतिहासातील प्रसंगांना वर्तमानात सजीव करणारे गडकोटांवरील भग्न वास्तूअवशेष शासकीय यंत्रणांनी निर्जीव ठरविले आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) पुण्यातील राजमाची, तोरणा आणि सिंहगडावरील कामाच्या निविदेमध्ये गरजेची कामे सोडून इतर कामांना महत्त्व दिले आहे.

निधी देऊनही ‘ससून’च्या इमारतीचे बांधकाम अर्धवट

$
0
0
‘ससून’च्या विविध विभागांसाठी नवीन बारा मजली इमारतीच्या बांधकामासाठी निधी देऊनही काम अपूर्णच राहिले आहे. संथ गतीने काम सुरू असल्याने मुदत उलटूनही सहा मजल्यांचे काम पूर्ण होऊ शकले. अखेर या वर्षीच्या डिसेंबरपर्यंतच कामाची ‘डेडलाइन’ संबंधित कंत्राटदाराला दिली असून, ती पाळली जाईल का हा प्रश्न उपस्थित होत आहे.

टोल भारंभार, बोगद्यात मात्र अंधार

$
0
0
टोलमध्ये भरमसाट वाढ होऊनही मुंबई-बेंगळुरू हायवेवर खंबाटकी बोगद्यात गेली दोन वर्षे अंधाराचे साम्राज्य कायम आहे. मात्र, याबाबत कारवाई करण्याऐवजी ‘बोगद्यात अंधार आहे,’ असा फलक तत्परतेने लावण्यात आला आहे. त्यामुळे हा परिसर वाहनांसाठी धोकादायक बनला असून ‘पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे’वर सुरू झालेल्या अपघातांच्या मालिकेप्रमाणेच येथेही दुर्घटना होण्याची भीती आहे.

एक लाख जण घालणार सामूहिक सूर्यनमस्कार

$
0
0
स्वामी विवेकानंदांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त ‘वर्ल्ड सूर्यनमस्कार असोसिएशन’तर्फे सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते १८ फेब्रुवारी रोजी शहरातील विविध शाळा, कॉलेजेस, मैदाने, सार्वजनिक ठिकाणे आदी ठिकाणी सुमारे एक लाख व्यक्ती या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

नेतृत्वाचे नाना पैलू कलामांकडून ऐकण्याची पर्वणी

$
0
0
आपापल्या क्षेत्रासाठी आवश्यक नेतृत्व... राज्याला किंवा देशाला प्रगतीपथावर नेऊ शकणारे नेतृत्व किंवा अगदी जगाला नवी दिशा देऊ शकणारे नेतृत्व... नेतृत्वाचे असे नानाविध पैलू, त्यासाठी आवश्यक असलेली चौकटीबाहेरची विचारप्रक्रिया एका ‘व्हिजनरी’ नेत्याकडूनच जाणून घेण्याची संधी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या (सीओईपी) विद्यार्थ्यांना गुरुवारी मिळाली. निमित्त होते ते सीओईपी आणि ‘सृजन’तर्फे आयोजित डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या व्याख्यानाचे.

पुणे जिल्हा परिषद बांधतेय जलतरण तलाव

$
0
0
शहरातील मुलांप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलेही आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावात सराव करू शकणार आहेत. जिल्हा परिषदेच्या वतीने आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे हा तलाव बांधण्यात येत आहे.

दिलीप कुलकर्णी यांना ‘श्रीगमा स्मृति पुरस्कार’

$
0
0
‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ यंदाचा ‘श्रीगमा विधायक कृतिशीलता पुरस्कार’ पर्यावरण चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते दिलीप कुलकर्णी यांना नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

विद्यापीठाचा विलंब परदेशवारीची संधी हुकविणार ?

$
0
0
परीक्षांचे निकाल मिळण्यात होणारा विलंब, पदवीप्रदान सोहळ्यामध्ये मिळालेल्या पदव्यांमध्ये अदलाबदली... हे काही कमी होते, म्हणून आता पुणे विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना ट्रान्सक्रिप्ट्स देण्यामध्येही विलंब होत आहे. त्यामुळे अगदी काही दिवसांवर आलेली परदेशवारीची संधी चुकते की काय, अशा विवंचनेमध्ये अर्जदार विद्यार्थी आहेत.

अतिक्रमणांवर आक्रमण

$
0
0
पालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण कारवाईच्या धडक मोहिमेत खोटे अथवा बनावट परवाने घेणाऱ्यांनाही पालिकेने लक्ष्य केले आहे. विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत बुधवारी अशा अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई केली गेली.

खडकी टोलनाक्याप्रकरणी आरोपींना अटक

$
0
0
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत वाहन प्रवेशकर गोळा करण्यासाठी ठेका मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्य़ा दोन गटात बुधवारी हाणामारी झाली होती. त्यात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना खडकी कोर्टाने मंगळवार (१९ फेब्रुवारी) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर, एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले.

मेकॅनाईज्ड पार्किंग वादाच्या भोवऱ्यात

$
0
0
बुधवार पेठेतील मजूर अड्डा येथे मेकॅनाईज्ड पार्किंग सुरू करण्याच्या प्रस्तावास महापालिकेच्या स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी या वाहनतळास सर्व मार्गांनी विरोध करण्याचा इशारा दिल्याने हे पार्किंग वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

‘सातच्या नंतर’ दुमदुमला ‘निर्भयते’चा नारा

$
0
0
‘बघता काय सामील व्हा’...‘जहा अत्याचार होता है, वो समाज निकम्मा है’...‘सातच्या आत घरात सांगू नका मुलीला, स्त्री नाही वस्तू उपभोगाची शिकवा तुमच्या मुलाला’...अशा घोषणा देत, ‘सात नंतर’ घराबाहेर पडत ढोल ताशाच्या तालावर नाचत गात पुण्यातील शेकडो महिला, युवतींनी ‘निर्भय’तेचा नारा दिला. परदेशी युवतीही यात सहभागी झाल्या होत्या.

एकगठ्ठा मतपत्रिकेवरून वादाची ठिणगी

$
0
0
नाट्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत संपण्यास अवघे तीन दिवस बाकी असताना, गुरुवारी एकगठ्ठा मतपत्रिका टाकताना अर्ज भरून देण्यावरून पुण्यातील उमेदवार आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमध्ये वादाची ठिणगी पडली.

बोगस ​सिमकार्डप्रकरणी ‘आयएम’च्या दहशतवाद्यांना कोठडी

$
0
0
बोगस सिमकार्ड अटक करण्यात आलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या दोघा दहशतवाद्यांना कोर्टाने २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. बोस यांनी दिलेत. बोगस सिमकार्ड घेऊन त्याद्वारे केलेल्या फोन कॉलची तपासणी करण्यासाठी ‘एटीएस’ने पोलिस कोठडीची मागणी केली होती.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images