Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

‘किस्सा कुर्सी का’

$
0
0
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी सलग दुसऱ्या बैठकीत खडाजंगी झाली. अखेर, परिषदेच्या अध्यक्षांच्या संमतीने महामंडळाकडे नावे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘आधार’ नोंदणीसाठी प्रत्येक प्रभागात २ केंद्र

$
0
0
आधार कार्डाच्या नोंदणीसाठी नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुढील महिन्यांपासून प्रत्येक प्रभागात ‘आधार’ नोंदणीसाठी दोन केंद्र उपलब्ध करून देण्यात येतील, असे महापालिकेचे उपायुक्त मंगेश जोशी यांनी सांगितले.

मोठ्या प्रमाणात गुलाबांची आवक

$
0
0
तरुणाईला साद घालणाऱ्या ‘व्हॅलेंटाइन डे’ ला आता चोवीस तासांचा अवधी राहिला असतानाच रस्त्यारस्त्यांवरील फूलबाजार ‘गुलाबी’ झाला आहे. मागणीत कोणतीही कसूर न ठेवण्यासाठी फुलांच्या व्यापाऱ्यांनी जय्यत तयारी केली असून, पारंपरिक लाल गुलाबाबरोबरच पांढरा, गुलाबी आणि पिवळा गुलाब बाजारात दालख झाली आहेत.

आता रंगभूमीसाठी वेगळे काय कराचये?

$
0
0
‘नव्या मुलांनी त्यांच्या पद्धतीच्या नाटकांसाठी स्वतःचा प्रेक्षकवर्ग तयार केला ही मोठी कामगिरी आहे. आता यापेक्षा रंगभूमीसाठी वेगळे काय करायचे? नव्या मुलांमुळेच नव्या कल्पना येऊ लागल्या. ‘रमणीयार्थम् प्रतिपादन’ हे नाटकांचे मुख्य कर्तव्य; पण हेच रमणीय कधीतरी कडवट असू शकते, हे त्यांनी दाखवून दिले याचे समाधान वाटते’ अशी भावना ज्येष्ठ नाटककार गो. पु. देशपांडे यांनी व्यक्त केली.

दुष्काळ दौऱ्यावर लवाजमा कशाला?

$
0
0
‘दुष्काळग्रस्त गावातील नुसते वर्णन ऐकूण भाष्य न करता, कोणताही लवाजमा बरोबर न घेता, चारा छावणीत जाऊन अभ्यास करावा,’ असा सल्ला ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला.

देशव्यापी रिक्षा संपातील सहभागाचा शनिवारी निर्णय

$
0
0
देशव्यापी संपाला पाठिंबा जाहीर केला असला तरी, पुण्यातील रिक्षा संघटना तूर्त तरी संपापासून लांब राहिल्या आहेत. संपात सहभागी होण्याबाबतचा अंतिम निर्णय शनिवारी घेतला जाणार असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले.

‘आयटी’ची ऐट कायम

$
0
0
ऑटो, रिअल इस्टेट क्षेत्राला मंदीने ग्रासले असले, तरी देशात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची या आर्थिक वर्षातील कामगिरी चांगली होत असून, पुढील आर्थिक वर्षात या क्षेत्राच्या निर्यातीत १२ ते १४ टक्के वाढ अपेक्षित असल्याचे ‘नॅसकॉम’ने नमूद केले.

पिंपरी तहसीलची हद्द जाहीर

$
0
0
पिंपरी-चिंचवडच्या स्वतंत्र तहसील कार्यालयासाठी तेरा कार्यकारी पदांना मान्यता देण्यात आली असून या तहसीलच्या अखत्यारित भोसरी, चिंचवड व कळस मंडल कार्यालयांचा समावेश करण्यात आला आहे.

स्त्रियांचा एल्गार ‘सातनंतर घराबाहेर’

$
0
0
स्त्रिया व मुलींवरील हिंसा खपवून घेणार नाही... पितृसत्ताक मानसिकता, चालीरितींना खतपाणी घालणार नाही... अवमान, मानहानी सहन करणार नाही, असा निर्धार करत नाचत, गात ‘व्हॅलेंटाइन डे’च्या मुहुर्तावर येत्या शुक्रवारी पुण्यातील हजारो स्त्रिया ‘सातनंतर घराबाहेर’ पडणार आहेत.

डेंगीमुळे वृद्धेचा मृत्यू

$
0
0
डेंगीच्या आजाराने ६१ वर्षांच्या एका वृद्धेचा सोमवारी रात्री केईएम हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. द्रोपदाबाई भाऊसाहेब थोरात (रा. खुटगाव, ता. दौंड) असे या वृद्धेचे नाव आहे. सहा वर्षांपासून त्यांना रक्तदाबाचा त्रास होत असल्याने त्या उपचार घेत होत्या.

फिंगरप्रिंटवर उघडणारी लिफ्ट अन् सोलर मोबाइल चार्जर

$
0
0
घरातील हालचाली टिपणारा आणि घरात कोणी नसताना घरात झालेली हालचाल टिपून एसएमएस पाठवणारा सेन्सर...फिंगरप्रिंटवर उघडणारी लिफ्ट...सोलर मोबाइल चार्जर..आणि कारचे ब्रेक फेल झाल्यावर वाजणारा सेन्सर...

सीईटीचा अर्ज भरायचा की अभ्यास करायचा?

$
0
0
‘एमटी-सीईटी’साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे; पण नेमक्या याच काळात बारावीच्याही परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांची आणि जोडीने ज्युनिअर कॉलेजांचाही गोंधळ उडणार आहे.

पक्ष्यांचा हॉटस्पॉट ‘कवडी’मोल न होण्यासाठी...

$
0
0
परदेशी पक्ष्यांसाठी आणि पक्षिप्रेमींचेही आवडते ठिकाण असलेल्या कवडी पाटची कचऱ्यामुळे अत्यंत दुरवस्था झाली आहे. कवडीच्या बांधावर अडकलेला कचरा दूर करण्याची मोहीम सध्या ‘टेल-अस’ आणि ‘दरोडे जोग इको ग्रीन संस्था’ यांनी हाती घेतली आहे.

पुन्हा पदवी कधी मिळणार?

$
0
0
पदवी प्रमाणपत्रांवरील विषयांच्या अदला-बदलीच्या तक्रारी समोर आल्यानंतर पुणे विद्यापीठाकडून सोमवारी संबंधित विद्यार्थ्यांची कागदपत्रे जमा करून घेण्यात आली. मात्र, विद्यार्थ्यांना त्यांच्या पदव्या कधीपर्यंत परत मिळणार, याविषयी विद्यापीठाकडून या विद्यार्थ्यांना कोणतीही कल्पना देण्यात आली नसल्याचे मंगळवारी या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.

सावळ्या गोंधळाने विद्यार्थी हवालदिल

$
0
0
पुणे विद्यापीठातर्फे जाहीर होत असलेल्या ऑक्टोबरच्या निकालांना होणाऱ्या विलंबामुळे विविध वर्गांमधील विद्यार्थी मुळातच त्रस्त झाले आहेत. त्यातच आता चुकीचा परमनंट रजिस्ट्रेशन नंबर (पीआरएन) असलेला निकाल, परीक्षेला हजर विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविण्याचे प्रकार समोर येत असल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणींमध्ये भर पडत आहे.

‘दगडूशेठ’ घेणार एक गाव दत्तक

$
0
0
गणेश जयंतीनिमित पूजा-अर्चा, याग अशा पारंपरिक उत्सवासह दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक घेऊन त्याचा कायापालट करण्यासाठी सहाय्य करण्याचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ठरविले आहे.

शिवजयंतीसाठी शिवनेरीवर १० हजार हिंदू-मुस्लिम

$
0
0
धार्मिक तेढ कमी करत देशाची एकात्मता जपण्यास प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे येत्या १९ फेब्रुवारीला शिवनेरीवर विशेष शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

उन्हाळ्यात पुण्यात लोडशेडिंग नाही

$
0
0
परळी आणि दाभोळ (रत्नागिरी) येथील प्रकल्पांमधील वीजनिर्मिती बंद झाली असली, तरी राज्यातील विजेची उपलब्धता आणि वीजदरांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे ‘महावितरण’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

डोक्यात गोळ्या घालून तरुणाचा खून

$
0
0
अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याच्या राग धरून सराईत गुन्हेगाराने इंदापूर तालुक्यातील एका तरुणाचा गोळ्या घालून खून केला. वालचंदनगर जांब रोडवर मंळगवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.

लक्ष्मी रोडवरील मसाज पार्लरवर छापा

$
0
0
लक्ष्मी रोडवर मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या आठ तरुणींनी विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. या तरुणींविरुद्ध ‘पिटा’ कायद्यान्यवये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images