Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मुंबईतील ‘आरोपी’च पुण्यातील ‘बॉम्बमेकर’

0
0
मुंबईतील झव्हेरी बाजार स्फोटातील आरोपी असलेल्या ‘इंडियन मुजाहिदीन’चे दहशतवादी असादुल्ला अख्तर आणि वकास या दोघांनी जंगली महाराज रस्त्यावरही बॉम्ब ठेवल्याचे ‘एटीएस’च्या तपासात स्पष्ट झाले आहे.

जर्मन बेकरीने टाकली कात...

0
0
दहशतवाद्यांनी तीन वर्षांपूर्वी बॉम्बस्फोट घडवून जमीनदोस्त केलेल्या जर्मन बेकरीने कात टाकली आहे. पहिल्यापेक्षा चारपट मोठी अशी बेकरी पुढील आठवड्यात सुरू होत आहे. या वे‍ळी मात्र, बेकरीच्या सुरक्षिततेसाठी मेटल डिटेक्टर पासून सोळा ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची करडी नजर बेकरीवर राहील.

घरातून हुसकावले; ८ महिन्यांची कैद

0
0
घरात घुसून धमकावून बळजबरीने एकाला घर खाली करायला लावल्याप्रकरणी तिघांना आठ महिने कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. चांगल्या वर्तणुकीच्या हमीवर एकाची सुटका करण्यात आली.

‘जर्मन बेकरी’चे बांधकाम अनधिकृत

0
0
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर कोरेगाव पार्कमधील संबंधित इमारत मजबूत आहे की नाही, हे तपासण्यासाठी ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून घेण्यास पुणे महापालिकेने सुचवले होते.

हिमायत बेगकडून नन्नाचाच पाढा...

0
0
जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी हिमायत बेगने मित्राच्या खात्यातून काहीवेळेला व्यवहार केल्याचे तसेच मित्राचे एटीएम कार्ड वापरल्याची कबुली मंगळवारी कोर्टात जबाब नोंदविताना दिली.

संतोष माने मानसिक रुग्ण

0
0
बसचालक संतोष माने मानसिक रुग्ण असून तो आपल्याकडे उपचारासाठी येत होता. त्याच्यावर इलेक्ट्रिक शॉक ट्रीटमेंट करण्यात आली होती, अशी माहिती सोलापूर येथील डॉ. दिलीप बुरके यांनी मंगळवारी कोर्टात दिली.

गुलमोहरापासून बनविले ‘एनर्जी ड्रिंक’

0
0
लालबुंद गुलमोहराच्या आंबट-तुरट चवीचा आस्वाद आपल्यापैकी कित्येकांनी घेतला असेल. पण या फुलांपासून एखादे ‘एनर्जी ड्रिंक’ही तयार करण्याची शक्कल आपल्यापैकी किती जणांनी लढवली आहे? म्हणूनच, पुण्यातील वाडिया कॉलेजमच्या नीलेश कवडे या ‘यंग इनोव्हेटर’चे गुलमोहराच्या फुलांपासून तयार केलेले ‘एनर्जी रिच कोल्ड्रिंक’ वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे.

तक्रार सुरूवातीला... निकाल शेवटाला

0
0
‘पुनर्मूल्यांकनाचा घोळ अनुभवल्यानंतर त्याविषयीची तक्रार केली. दोन महिन्यांपूर्वी केलेल्या या तक्रारीतील तथ्य मान्य करत खुद्द विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकांनीच तक्रार दूर करत निकाल सुधारून देण्याचे लेखी आश्वासन दिले.

सव्वापाच लाख 'आधार' ठरली निराधार

0
0
एकीकडे आधार कार्ड मिळण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागत असतानाच, दुसरीकडे तयार झालेली महाराष्ट्रातील तब्बल सव्वापाच लाख कार्ड केवळ पत्ता सापडत नसल्याने परत गेली आहेत. देशात सर्वाधिक कार्ड महाराष्ट्रातून परत गेली असून पुणे विभागातील सुमारे ४८ हजार कार्डांचा त्यात समावेश आहे.

त्या स्मृतिंवर जिद्दीची भरारी...

0
0
आपल्या आयुष्याविषयीचा स्वप्ने डोळ्यात साठवत तिच्या आवडत्या जर्मन बेकरीमध्ये ती कॉफीचा आस्वाद घेत होती. मात्र, ती सायंकाळ आपलं अवघं आयुष्यच बदलून टाकेल, याची पुसटशी कल्पनाही तिला नव्हती. तो मोठा स्फोट झाला. ती ५४ टक्के भाजली नि पायही फ्रॅक्चर झाला.

येत्या २ दिवसांत हलक्या पावसाची शक्यता

0
0
शहर आणि परिसरात येत्या दोन दिवसांत हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. पावसाने हुलकावणी दिली, तरी दिवसभर हवा ढगाळच राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शहराच्या पूर्व भागात उद्या पाणी नाही

0
0
बंडगार्डन पाणीपुरवठा केंद्रअंतर्गत जलवाहिनीच्या गळती आणि दुरुस्तीचे काम करायचे असल्याने गुरुवारी (१४ फेब्रुवारी) शहराच्या पूर्व भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापलिकेने कळवले आहे.

‘जर्मन बेकरी’परवान्याचेही नूतनीकरण नाही

0
0
जर्मन बेकरी सुरू करण्यासाठी पोलिसांकडून देण्यात येणाऱ्या हॉटेल परवान्याचे नूतनीकरण झालेले नाही, अशी माहिती कोरेगाव पार्क पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली.

‘CET’ अर्ज भरण्याची मुदत अखेर वाढवली

0
0
इंजिनीअरिंग आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणाऱ्या ‘एमटी-सीईटी’चे अर्ज भरण्याची प्रक्रिया बारावीची परीक्षा संपल्यानंतरही किमान आठवडाभर सुरू ठेवण्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) निश्चित केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ऐन परीक्षेच्या काळात अर्ज भरण्याचा त्रास वाचणार आहे.

‘आयएम’चा फिरोज आणि इरफान आरोपी

0
0
दिघी परिसरातील दुकानांतून बोगस सिमकार्ड घेऊन त्यांचा वापर जंगली महाराज रोडवरील साखळी स्फोट घडविण्यासाठी केल्याचे उघड झाले आहे. ‘एटीएस’ने यापूर्वी एका दुकानदाराला अटक केली असून या गुन्ह्यात आता ‘इंडियन मुजाहिदीन’च्या (आयएम) दोघा सदस्यांना आरोपी करण्यात आले आहे.

आणखी एखाद्या दुर्घटनेची वाट पाहाताय का?

0
0
‘जर्मन बेकरीमध्ये झालेल्या भीषण स्फोटांनंतरही राज्याचे पोलिस अजूनही सुरक्षिततेबाबत निष्काळजी असून, पुण्यात आणखी एखादी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत का,’ असा संतप्त सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी बुधवारी केला.

मारणे गँगचा सदस्य गजाआड

0
0
शरद माहोळ गँगच्या दोघा सदस्यांना फासावर लटकवत त्यांचे मृतदेह जाळून खून करणारा गणेश मारणे गँगमधील मुख्य सूत्रधाराला खंडणीविरोधी पथकाने अटक केली. पोलिसांनी या आरोपींकडून तीन पिस्तुले जप्त केली असून आणखी काही पिस्तुले मिळण्याची शक्यता आहे.

‘स्पीड गन’चा पहारा वाढवा

0
0
‘एक्स्प्रेस वे’वरील जीवघेणे अपघात टाळण्यासाठी कडक नियम करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी तातडीने सुरू करावी; त्याचसाठी लवकरात लवकर संपूर्ण मार्गावर ‘स्पीड गन’चा पहारा देऊन वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी,’ अशा सूचना लोकलेखा समितीने बुधवारी केल्या.

विरुद्ध दिशेची कार एक्स्प्रेसवेवर धडकली

0
0
जीवघेण्या अपघातांचे पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वरील सत्र सुरूच आहे. बुधवारी रात्री दहा वाजता विरुद्धदिशेने आलेली गाडी आदळून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला.

शिक्षण हक्क कायदाच धाब्यावर

0
0
केंद्र सरकारचा शिक्षण हक्क कायदा अल्पसंख्याक शाळांनाही लागू असल्याबाबत राज्य सरकारचे अधिकारी अॅडमिशनचा कालावधी संपेपर्यंत मुद्दाम संभ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप रिपब्लिकन पक्षाने बुधवारी केला आहे. याबाबत राज्य सरकारने तातडीने स्पष्ट आदेश काढावा, यासाठी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images