महिला बचत गटांच्या मेळाव्याच्या उद्घाटनावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महिला लोकप्रतिनिधींमधील मानापमानाचा प्रयोग सुरूच असून त्यामध्ये आता परस्परांच्या निषेधाची अस्त्रे सोडण्यात येऊ लागली आहेत.
मानापमानाच्या प्रयोगात निषेधाची अस्त्रे
↧
↧
पुणेकरांनो, खारीचा वाटा उचला
‘पुण्याला लाभलेली ऐतिहासिक आणि गुणवत्तेची गौरवशाली परंपरा लक्षात घेता, देशासाठी ते एक महत्वाचे शहर आहे. ही बाब लक्षात घेत आपल्या या शहराच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांनीही आपला वाटा उचलायला हवा,’ अशी भावना केंद्रीय केंद्रीय युवक आणि क्रीडा खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी पुण्यात व्यक्त केली.
↧
पाऊस... थेंब... थेंब
गेल्या दोन दिवसांपासूनच्या ढगाळ हवामानापाठोपाठ सोमवारी दुपारनंतर पुणे शहर आणि जिल्ह्यातही काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली. पुढच्या दोन दिवसांत शहरात हवामान ढगाळ राहील, तर मध्य महाराष्ट्रासह कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
↧
शिक्षण एक पदवी भलतीच
सर्वसाधारणपणे विद्यार्थी ज्या विषयामध्ये पदवी वा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करतात, त्याच विषयाचा उल्लेख त्यांच्या पदवी प्रमाणपत्रांवर येणे अपेक्षित असते. मात्र, पुणे विद्यापीठामध्ये नुकत्याच झालेल्या पदवीदान समारंभामध्ये अनेक विद्यार्थ्यांना एका विषयामध्ये पदवी वा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर दुसऱ्याच कोणत्यातरी विषयाचा उल्लेख असलेल्या पदव्या मिळाल्या.
↧
भामरे-हरणावळ यांच्यात धक्काबुक्की
पर्वती दर्शन येथील भामरे शाळेत सोमवारी सायंकाळी गॅदरिंगचे उद्घाटन झाल्यानंतर शाळेबाहेर राजकीय आखाडा रंगला. शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ आणि त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी बाळासाहेब भामरे यांचा मुलगा तुषार यांच्यात धक्काबुक्की झाली.
↧
↧
परिवहन समिती नाही? शाळांना मिळणार ‘छडी’
स्कूलबसपाठोपाठ आता परिवहन सुरक्षितता समिती नसलेल्या शाळांवर शिक्षण खातेच ‘छडी’ उगारणार आहे. समिती कधी नेमली, तिच्या बैठका आणि त्यातून झालेली फलनिष्पती याचा शोध घेतला जाणार आहे. दोषी आढळलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांवरच कारवाई होणार आहे.
↧
विठ्ठलवाडी ते वारजे रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा
सिंहगड रोडवरील वाहतुकीच्या कोंडीवर उपाय म्हणून विठ्ठलवाडी ते वारजे रस्ता तातडीने पूर्ण करावा, अन्यथा आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा येथील नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी सोमवारी दिला.
↧
४ वर्षांनंतर पुन्हा पुण्यात सुगम संगीत संमेलन
फडणीस फाउंडेशन आणि मराठी सुगम संगीत प्रतिष्ठान यांच्यातर्फे पुण्यात येत्या २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान सुगम संगीत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे संध्याकाळी ५ ते १० या वेळात होणाऱ्या या संमेलनात यावर्षी हिंदी गाण्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
↧
डॉक्टरांची साक्ष 'व्हिसी'ने
खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार यांसह विविध प्रकारच्या खटल्यांमध्ये ‘साक्ष’ देण्यासाठी ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांना आता जिल्हा कोर्ट अथवा मुंबईच्या हायकोर्टाची पायरी चढावी लागणार नाही. हॉस्पिटलमध्ये बसूनच ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे आता कोर्टात साक्ष नोंदविली जाणार आहे.
↧
↧
ग्रामीण भागांत सेमी इंग्रजीची क्रेझ
मराठी शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्याचा जिल्हा परिषदेचा निर्णय पहिल्याच वर्षी ‘फळा’ला आला आहे. ग्रामीण भागातील सव्वाशे शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग भरत आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून या उपक्रमाची व्याप्ती वाढणार आहे.
↧
पुरंदर तहसील कचेरीत आंदोलन
सरकार आदेशानुसार अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे पाहणीसाठी गेलेल्या तलाठी प्रफ्फुल साहेबराव व्यवहारे यांना नुकतीच दोघांनी मारहाण करून त्यांच्याकडील कागदपत्रे फाडली. या गुंडांना त्वरित अटक करून त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हा नोंदविण्यात यावा या मागणीसाठी पुरंदर तहसील कचेरीत काम बंद आंदोलन सुरु करण्यात आले.
↧
आरोपींची सुटका नाकारली
जंगली महाराज रस्ता साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना बेकायदेशीररीत्या अटक केली असून त्यांची मुक्तता करण्याची मागणी करणारा अर्ज पुणे सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळला.
↧
कर्जाच्या बहाण्याने तिघांची फसवणूक
पंजाबमधील फायनान्स कंपनीतून कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने तिघांना सुमारे सहा लाख रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
↧
↧
अमेरिकी विद्यार्थी चक्क संस्कृत नाटकात
‘भोहो जनः श्रृण्वन्तू नगरविकासदृष्ट्या एतद् आवश्यकम्! परंतु स्मारकविषये भविष्ये किंकरणीयम् एतस्य उल्लेखोमी सर्वकारस्य कार्यक्रमे न वर्तते!’ हे संस्कृतमधील संवाद चक्क एका अमेरिकी विद्यार्थ्याच्या तोंडून ऐकण्याची संधी मिळाली.. चकित झालेल्या पुणेकरांनी त्याच्या या प्रयत्नांना आवर्जून टाळ्यांची दाद दिली.
↧
परस्परविरोधी सूचनांमुळे ‘डीपी’मध्ये अडचणी
परस्परविरोधी आणि विसंगत उपसूचनांमुळे महापालिकेच्या जुन्या हद्दीचा विकास आराखडा प्रसिद्ध करण्यात प्रशासनासमोर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे, आराखडा प्रसिद्ध करण्यास विलंब होत असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.
↧
... तर १२ वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार
ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांच्या मागण्यांविषयी शासनाने दिलेल्या आश्वासनांवर ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांनी आपले परीक्षांवरील बहिष्काराचे आंदोलन मागे घेतले होते.
↧
शेतीच्या पाण्यात २ टीएमसीची बचत
खडकवासला धरणातून रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडलेल्या पाण्यात एक टीएमसी पाण्याची बचत करण्यात आली आहे. रब्बीच्या चालू आवर्तनात आणखी एक टीएमसी पाण्याची बचत करून ते पुणेकरांसाठी राखीव ठेवले जाणार आहे.
↧
↧
घोरपडीत ६ इमारती जमीनदोस्त
रस्ते आणि फुटपाथवरील अतिक्रमणे काढण्याच्या अतिक्रमण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या कारवाईनंतर आता बांधकाम विभाग सक्रिय झाला आहे. मंगळवारी घोरपडी येथील सहा इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. तसेच वानवडी आणि बिबवेवाडीतील इमारतींवर कारवाई झाली.
↧
अखेर मलकापूर पॅटर्न पुण्यात २ हजार घरांना
ऑटोमेटिक मीटर रीडिंग, पाणीगळतीचा ऑनलाइन शोध आणि प्रेशर कमी झाले तर त्याच क्षणी ऑनलाइन रिपोर्ट....
↧
फक्त निम्म्यांनाच ‘आधार’
विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व गर्भवती महिलांच्या योजनेचे पैसे येत्या १ मार्चपासून थेट बँक खात्यात जमा करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. तथापि, या योजनांच्या फक्त ४८ टक्केच लाभार्थ्यांनाच आतापर्यंत आधार कार्ड मिळू शकले आहे.
↧
More Pages to Explore .....