Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

JEEच्या अर्जात दुरुस्तीची संधी

$
0
0
‘जेईई-मेन’साठी अर्ज केलेल्या ज्या विद्यार्थ्यांच्या नावात किंवा इतर तपशिलात अजूनही काही चुका राहिल्या आहेत, त्यांना त्या दुरुस्त करण्याची अखेरची संधी येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत मिळणार आहे.

विनयभंग करणारा ताब्यात

$
0
0
विनयभंग करून पळून गेलेल्या त्या बिहारी ‘टिनेजर’ला अखेर कॉलेजमधील तरुणीने सहा दिवसानंतर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. भारती विद्यापीठ जवळील पतंग प्लाझामधील पराठा हाउसमध्ये नोकरीस असणारा हा आरोपी अखेर गजाआड झाला.

विद्यापीठाने घडवावेत ‘थॉट लिडर्स’

$
0
0
ऑक्सफर्ड विद्यापीठालाही ‘पुणे ऑफ दी वेस्ट’ म्हणवून घ्यायला आवडेल, एवढे मोठे कार्य पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून व्हायला हवे.

हवा गरम, पारा ३४ अंशांवर

$
0
0
ढगाळ हवा, उन्हाची वाढलेली तीव्रता आणि सकाळी काहीसा गारवा अशा विषम वातावरणाचा अनुभव पुणेकरांनी रविवारी घेतला. शहराचा पारा ३४ अंशांपर्यंत पोहोचल्याने सुट्टीच्या दिवशी तीव्र उष्म्याने चाहूल दिली.

परतफेड न केल्याने अॅसिड हल्ला

$
0
0
उसने पैसे परत न करणा-या पर्वतीगावातील एका नागरिकाला एका विचित्र शिक्षेला सामोरे जावे लागले आहे. पैसे देणा-या आरोपीने आपल्या मित्रांच्या मदतीने या नागरिकाच्या गुप्तांगावर अॅसिडसारखा द्रव पदार्थ टाकला. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लवकरच ‘१००’वर एसएमएस सेवा

$
0
0
समाजातील महिलांवरील अत्याचार आणि छेडछाडीवर अंकुश ठेवण्यासाठी १०० क्रमांकावर लवकरच एसएमएस सेवा उपलब्ध करणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी दिली.

फास्ट ट्रॅक कोर्टांऐवजी ‘आर्मी कोर्टां’ची गरज

$
0
0
पोलिस यंत्रणेच्या कामामधील राजकारण्यांचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. न्यायव्यवस्थाही प्रभावीपणे काम करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळेच गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी होत आहे, असे मत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त जे. एफ. रिबेरो यांनी सोमवारी व्यक्त केले.

‘मराठी साहित्य संमेलन सासवडला भरवावे’

$
0
0
पुढील वर्षी होणारे ८७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी सासवड येथे भरवावे, अशी मागणी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.

सर्वांगीण विकासासाठी हवी ८८ हजार कोटींची गुंतवणूक

$
0
0
महानगराकडे वाटचाल सुरू असलेल्या पुणे शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर येत्या २०४१ पर्यंत तब्बल ८८ हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करावी लागणार आहे.

समाविष्ट ग्रामपंचायतीत बोगस कर्मचारी भरती?

$
0
0
महानगरपालिकेच्या हद्दीत २८ नवीन गावांचा समाविष्ट करण्याच्या निर्णयामुळे या ग्रामपंचायतीमध्ये बोगस कर्मचारी भरती करण्याचे प्रकार वाढले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अचानक वाढत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.

जात पडताळणीची २ लाख प्रकरणे प्रलंबित

$
0
0
जात पडताळणीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी राज्या‌त स्थापन करण्यात आलेल्या पंधरा समित्यांपैकी बारा समित्यांच्या अध्यक्षांची आणि नऊ सदस्य सचिवांची पदे रिक्त असल्याने जात पडताळणीची दोन लाख प्रकरणे प्रलंबित राहिली आहेत.

मिळकतकरात सहा टक्के वाढ

$
0
0
राष्ट्रवादी आणि मनसे असे सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकत्रित मतदानामुळे शहरातील मिळकतकरात सहा टक्के वाढीचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी मंजूर झाला. दरम्यान, महागाईला निमंत्रण देणारी जकातीतील नियोजित वाढ मात्र उपसूचना देऊन फेटाळण्यात आली.

‘एमटी-सीईटी’ प्रवेशाचा यंदा गोंधळात गोंधळ

$
0
0
ऑनलाइन तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रवेशप्रक्रिया विद्यार्थिभिमुख व सुलभ करण्याचा प्रभावी पर्याय उपलब्ध असताना ती किचकट, संभ्रमात टाकणारी आणि वेळकाढूपणाची कशी करावी, याचा ‘आदर्श’ इंजिनीअरिंग-फार्मसी प्रवेसाशाठीच्या आगामी ‘एमटी-सीईटी’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर थोपविला जात आहे.

बार्शीच्या युवकाचा डेंगीने मृत्यू

$
0
0
बार्शी येथील तेवीस वर्षीय वैभव विजयकुमार शिंदे या युवकाचा डेंगीच्या आजाराने सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. शिंदे याला तीन फेब्रुवारीपासून पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला.

अपंगत्व प्रमाणपत्रांचे नुतनीकरण बंधनकारक

$
0
0
शासनाच्या विविध योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेल्या अपंगत्व प्रमाणपत्रांचे ३१ मार्चपर्यंत नुतनीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे बोगस लाभार्थ्यांचे पितळ उघडे पडून त्यांना चाप बसेल, अशी अपेक्षा आहे.

‘सर्वांनी घाबरण्याचे कारण नाही’

$
0
0
म्युच्युअल फंडातील मोठी गुंतवणूक, घराचा व्यवहार झाला असल्यास आणि अशा परिस्थितीत रिटर्न भरले नसल्यास किंवा टीडीएस कापण्यात आला आहे. मात्र, रिटर्न सादर केलेला नाही; तसेच सरकारी यंत्रणेला संबंधित व्यक्तीची संपूर्ण माहिती मिळल्यास इन्कम टॅक्स विभागाकडून रिटर्न का भरला नाही, अशी चौकशी करणारे पत्र येण्याची शक्यता वाटते.

दुष्काळ मदतीसाठी गुरुवारी बैठक

$
0
0
भीषण पाणीटंचाईमुळे मराठवाड्यातील नागरिक महानगरांमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवी संस्था आणि युवकांची येत्या गुरुवारी (१४ फेब्रुवारी) विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे.

अतिक्रमणविरोधी कारवाई आणखी जोरात

$
0
0
पुणे महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईत अतिक्रमण विभाग आणि क्षेत्रीय कार्यालय यांच्या साथीला बांधकाम विभागही आल्याने सोमवारी जोरदार कारवाई झाली.

लठ्ठपणाची ‘NDCP’मध्ये समावेशासाठी शिफारस करू

$
0
0
‘देशभर राबविण्यात येणाऱ्या विविध आजाराच्या नॅशनल डिसीज कंट्रोल प्रोग्राममध्ये (एनडसीपी) लठ्ठपणाच्या आजाराचा समावेश करावा अशी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे शिफारस करू,’ अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या निर्मला सामंत यांनी शनिवारी पत्रकारांना दिली.

‘एक्स्प्रेस वे’वरील अपघातात तिघे जखमी

$
0
0
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर ताजे गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपासमोर कार नाल्यात पडून झालेल्या अपघातात इंडिया टीव्हीच्या दोन कर्मचाऱ्यांसह कारचा चालक जखमी झाला आहे. हा अपघात सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झाला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images