Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

लेखा परीक्षण हा सहकाराचा आत्मा

$
0
0
राज्यातील सहकार चळवळ हा ग्रामीण व्यवस्थेचा कणा असून लेखापरीक्षण हा सहकाराचा आत्मा आहे. लेखापरीक्षण बाजूला सारून सहकार चळवळीची पुढील वाटचाल शक्य नाही, असे मत राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी व्यक्त केले.

फाशीला धार्मिक रंग नको

$
0
0
संसदेवरील हल्ल्यातील प्रमुख आरोपी अफझल गुरुला फासावर चढविल्यानंतर काश्मीरमधील सामान्य लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. आतापर्यंत भोगलेले दिवस पुन्हा वाटेला येऊ नयेत, अशी त्यांची भावना आहे.

जुन्या सांगवीतून २ बांगलादेशींना अटक

$
0
0
पुणे शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींविरूद्ध् पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने धडक मोहिम उघडली असून दोन बांगलादेशींना गजाआड करण्यात आले आहे. तर इजिप्तमधील एका नागरिकाची देशाबाहेर हकालपट्टी करण्यात आली आहे.

शहराच्या सुरक्षेत वाढ

$
0
0
संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी अफझल गुरुला शनिवारी तिहार जेलमध्ये फाशी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि परिसरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

लोणावळ्यातील कचराडेपोला आग

$
0
0
जुन्या मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरसोली टोलनाक्याजवळील लोणावळा नगर परिषदेच्या कचरा डेपोला शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आग लागली. धुराच्या लोटामुळे महामार्गावरील ‍वाहनांना १० ते १५ फूट अंतरावरचा भाग दिसत नव्हता.

४० टक्के डॉक्टरच लठ्ठ

$
0
0
सुदृढ आरोग्यासाठी पेशंटला आहार, व्यायामाचे सल्ले देणा-या डॉक्टरांनाच लठ्ठपणाची (ओबेसिटी) व्याधी जडल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एकूण डॉक्टरांमध्ये ४० टक्के डॉक्टर लठ्ठपणाची शिकार झाल्याचे आढळून आले आहे.

पिण्याचे पाणी उद्योग व शेतीस वापरल्यास वीजपुरवठा खंडीत

$
0
0
राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने पिण्याचे पाणी उद्योग आणि शेतीसाठी वापरणा-यांचा वीजपुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घ्यावा लागणार असल्याचे राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांनी शनिवारी सांगितले.

सुपरकंप्युटर परम युवा-२

$
0
0
पुण्याच्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स कंप्युटिंग या विभागाने परम युवा २ हा सुपरकंप्युटर तयार केला आहे.

‘साहेबां’च्या ‘कारभारी’पदाने काँग्रेसजन धास्तावले

$
0
0
राष्ट्रीय स्तरावरील नेते असल्याचे सांगून स्थानिक विषयांवर एखादे भाष्यही करण्यास नकार देणारे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आता पुण्यातील अतिस्थानिक राजकीय घडामोडींमध्येही लक्ष देऊ लागल्याने ‘राष्ट्रवादी’चा सहकारी असलेल्या काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

सीनिअरसह ज्युनिअरही आघाडीवर

$
0
0
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिलेल्या आदेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शहराध्यक्षपदाच्या निवडीबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या महत्त्वाच्या काळात हे पद मिळविण्यासाठी आजी-माजी पदाधिका-यांसह अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महिला कॅडेट्सना दंडुक्याने मारहाण

$
0
0
येरवडा येथील ‘जेल ट्रेनिंग कॉलेज’मध्ये महिला कॅडेट्सना दंडुक्याने मारल्याप्रकरणी ‘ड्रिल इन्स्ट्रक्टर’ला निलंबित करण्यात आले असून, प्राचार्यांविरोधात तक्रारी आल्याने त्यांनाही सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

पालेभाज्यांचे भाव स्थिर;फळभाज्या वधारल्या

$
0
0
उन्हाची तीव्रता जाणवू लागली असली तरी, यंदा प्रथमच फेब्रुवारीच्या दुस-या आठवड्यापर्यंत भाज्या स्वस्त राहिल्या आहेत. पालेभाज्यांचे भाव टिकून राहिले असून, भेंडी, घेवडा, शिमला ‌मिरची आणि काकडीचे भाव मात्र, वधारले आहेत. किमान आठवडाभर भाज्यांचे भाव स्थिर राहण्याची चिन्हे आहेत.

बहुमत देत नाहीत, तिथेच घोडे पेंड खाते

$
0
0
पुणेकरांच्या पाणीवापरावर गल्ली ते दिल्लीपर्यंतचे नेते तोंडसुख घेत असताना आता पुण्यातील नागरी समस्यांसाठीदेखील कारभारी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांनाच जबाबदार धरले आहे.

यशवंतरावांचे ‘लोकसंस्कृती’चे स्वप्न अडगळीत

$
0
0
लोकसाहित्य, लोकसंगीत, लोककला, लोककथा, अशा लोकसंस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी स्थापन केलेल्या ‘लोकसाहित्य समिती’कडे त्यांच्या नावाने राजकारणाचा वसा घेणा-यांनी पूर्णतः अडगळीत टाकले आहे.

वेगळ्या महापालिकेसाठी विचार सुरू

$
0
0
‘पुणे शहराची हद्द मांजरीपर्यंत गेल्यानंतर काही भागांसाठी वेगळ्या महापालिका स्थापन करण्याची मागणी होत असून, त्या संदर्भात आपण विचार करीत आहोत,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिली.

पवनेत IT चा कर्मचारी बुडाल्याची भीती

$
0
0
सोमाटणे गावच्या हद्दीत असलेल्या पवना नदीत मित्रासोबत पोहण्यासाठी उतरलेला हिंजवडीतील एका आयटी कंपनीचा कर्मचारी बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. ही घटना रविवारी दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली.

निवृत्त ‘डीजीपीं’चे तरी दागिने मिळणार का?

$
0
0
पुणे शहरात गेल्या पंधरवड्यात ‘बॅग लिफ्टिंग’ करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला. कारची काच फोडून ऐवज पळविणा-या टोळीच्या नावावर आतापर्यंत १२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

स्कॉलरशीपच्या परीक्षा आता २३ मार्चला

$
0
0
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणा-या पूर्व माध्यमिक (चौथी) आणि माध्यमिक (सातवी) शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. यापूर्वी परिषदेतर्फे जाहीर करण्यात आल्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, १७ मार्चला होणार होत्या.

‘यूजीसी’ची साद; विद्यापीठाचा प्रतिसाद

$
0
0
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाची गुणवत्ता सुधारत चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी पुणे विद्यापीठानेही आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी कंबर कसली आहे.

टँकर माफियांनो आता उद्योग थांबवा

$
0
0
‘कल्याणीनगर, वडगाव शेरीवाल्यांनी पाण्यातून किती पैसा कमावलाय याची चांगली माहिती मला आहे. दुष्काळाची स्थिती असल्याने हे उद्योग आता थांबवा. आतापर्यंत झाले ते बस्स झाले,’ अशा कडक शब्दात उपमुख्यमं‌त्री अजित पवार यांनी टँकर माफियांना रविवारी सुनावले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images