Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

नंदू माधव, तेजस्विनी लोणारी यांना पुरस्कार

$
0
0
सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ४९ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवातील नामांकने आणि तांत्रिक पुरस्कारांची शनिवारी घोषणा करण्यात आली.

भिगवणजवळ ट्रकला अपघात, ५ ठार

$
0
0
पुणे-सोलापूर रोडवर भिगवण गावाजवळ ट्रकला झालेल्या अपघात पाच जण जागीच ठार झाले. मृतांमध्ये दोन पुरुष, दोन मुले यांच्यासह एका महिलेचा समावेश असल्याचे समजते. दरम्यान, घटनास्थळी पोलीस अधिकारी पोहोचले असून या अपघाताचा तपास सुरू आहे.

माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा

$
0
0
राजकारणातून मला संपवण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव आहे, पण लोकसभेची पुढील निवडणूक मी लढवणारच आहे. कोणाची हिंमत असेल, तर त्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी कोणाचेही नाव न घेता पक्षनेत्यांना दिले.

मठकरी महापालिकेचे स्वीकृत सदस्य

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष विकास मठकरी यांची पक्षाच्या वतीने महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून निवड निश्चित झाली आहे.

दबाव झुगारून गुन्हेगारांवर कारवाई करा

$
0
0
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था टिकविण्यासाठी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलिस खात्याने औद्योगिक परिसरातील वाढती गुन्हेगारी, लॅण्ड माफिया, वाळू माफिया यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या.

इंजिनीअर्स 'डोन्ट वरी'; घरबसल्या मिळे नोकरी

$
0
0
इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेल्या देशभरातील सुमारे २० लाख विद्यार्थ्यांना अक्षरश: घरबसल्या नोकरीचा शोध घेता येणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद अर्थात 'एआयसीटीई'तर्फे विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असलेल्या रिक्रुटमेंटच्या ऑनलाइन अवतारामुळे हे शक्य होणार आहे.

औंधसह ४० गावांचे पाणी तोडणार?

$
0
0
ठेकेदाराने पाच महिन्यांची वीजबिले न भरल्याने औंधसह ४० गावांचा पाणीपुरवठा येत्या मंगळवारपासून बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली असून वारंवार खेटे घालूनही प्रशासनाने त्याची दखल न घेतल्याने कमिट्यांच्या दौऱ्यावर लाखोंचा खर्च झाल्यानंतरही जनतेला मात्र पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.

मानसिक संतुलन बिघडलेल्या पित्याची आत्महत्या

$
0
0
मुलाच्या अपघाती निधनामुळे मानसिक संतुलन बिघडलेल्या बापाने विष पेऊन आत्महत्या केल्याची घटना वेताळवाडी, डोंगरगाव येथे रविवारी (२२ एप्रिल)पहाटे तीनच्या सुमारास घडली आहे.

कॉलेजला दांडी, परीक्षेची कोंडी

$
0
0
अकरावी-बारावीला कॉलेजला दांडी मारत क्लासच्या भरवशावर सर्रास लेक्चर बंक करणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षाही बंक करण्यावाचून पर्याय राहणार नाही. कारण ज्युनिअर कॉलेजमध्ये किमान ७० टक्के हजेरी नसेल, तर यापुढे अकरावीबरोबरच बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेलाही बसता येणार नाही.

ब्रिटिश शिष्टमंडळ शिक्षणसंस्थांना भेटणार

$
0
0
'इंडिया-यूके एज्युकेशन पार्टनरशिप फोरम'अंतर्गत ब्रिटनमधील १३ विद्यापीठांचे १९ प्रतिनिधी पुण्यातील विविध शिक्षण संस्थांना भेट देऊन शैक्षणिक सहकार्याबाबत बोलणी करणार आहेत.

बोगस शेअर्स छपाईत सुधीर मेहताही सामील

$
0
0
बोगस शेअर्स प्रकरणी मुख्य आरोपी शेअर दलाल हर्षद मेहता याचा भाऊ सुधीर मेहता आणि त्याचा साथीदार डॉ. अमित शहा यांनी दोघांनी संयुक्तरित्या बोगस शेअर्सची छपाई केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

शहरात अजूनही टँकरद्वारे रोज ८६ खेपा

$
0
0
शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्यादृष्टीने प्रभागनिहाय बैठका झाल्या. नियोजनाबाबत आदेश दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले. तरी अजूनही शहरात पाणीपुरवठ्यासाठी टँकरद्वारे रोज ८६ खेपा चालू आहेत.

'आयसीट'चे नियम अद्याप अपूर्णच

$
0
0
'पुढच्या वषीर् (सन २०१३) इंजिनीअरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी बारावीचे गुण आणि इंडियन सायन्स इंजिनीअरिंग एलिजिबिलिटी टेस्ट (आयसीट) या परीक्षेचे गुण यांना नेमके किती-किती टक्के महत्त्व असेल, याबाबतचा निर्णय येत्या मेअखेरपर्यंत जाहीर केला जाईल.

...मग झेडपीच्या शाळेत मुले येणार कशी?

$
0
0
'जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकविणा-या शिक्षकांची मुलेच झेडपीच्या शाळांमध्ये शिकत नसतील, तर इतरांची मुले या शाळांमध्ये येणार कशी,' असा प्रश्न उपस्थित करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झेडपीच्या शाळेत दिल्या जाणा-या शिक्षणाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली.

पोलिस कोठडीतून आरोपी पळाला

$
0
0
पोलिस कोठडीत असलेल्या आरोपीने कॉन्स्टेबलची नजर चुकवून पळ काढल्याची घटना विद्यापीठ रोडवरील ई-स्क्वेअर थिएटरजवळ शुक्रवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली.

नंदुरबारचे दोन डॉक्टर बुडाले

$
0
0
नारायणगाव येथे डिंभा धरणाच्या डाव्या कालव्यात नंदुरबार जिल्हा परिषदेचे दोघे डॉक्टर बुडल्याची घटना शनिवारी सकाळी सातच्या दरम्यान घडली. राज्य राजपत्रित डॉक्टर संघटनेच्या अधिवेशनासाठी पुण्यास येत असताना ही घटना घडली.

नेत्रपटलाच्या रोगावर प्रभावी औषध विकसित

$
0
0
डायबेटिस तसेच उच्च रक्तदाबामुळे नेत्रपटलाचा आजार झालेल्या पेशंटसाठी सहा महिन्यांपर्यंत प्रभावी ठरेल, असे औषध विकसित करण्यात आले आहे, असे भारतीय नेत्ररोगतज्ज्ञ संघटनेचे सदस्य आणि मुंबई येथील आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाचे प्रमुख डॉ. एस. नटराजन यांनी सांगितले.

पोलिस कर्मचा-यांकडून आयुक्तांना 'घरचा आहेर'

$
0
0
पोलिस कर्मचा-यांवरील ताण कमी करण्यासाठी त्यांना आठ तासच ड्युटी देण्याचे आदेश पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी दिले होते. उत्साहाने सुरू झालेल्या या योजनेला पोलिस कर्मचा-यांनीच 'कात्रजचा घाट' दाखविला आहे.

पवार समर्थकाला डावलले

$
0
0
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या कार्यकारिणी निवडणूक प्रक्रियेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवतीर्यांना बाजूला ठेवण्यात आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या सर्वसाधारण सभेकडे पवार यांनी पाठ फिरविल्याचे सांगण्यात आले.

अर्बन बँकांना सवलती देण्याचा प्रयत्न

$
0
0
'केंद सरकारमधील काही मंत्री राज्यातील सहकारचळवळीला नावे ठेवतात. अर्थमंत्री असताना पी. चिदंबरम यांनी जाणीवपूर्वक सहकाराविषयी द्वेषभावना ठेवल्यानेच आज अर्बन बँकांना आयकर मोजावा लागत आहे. मात्र, ही सूट पूर्ववत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू,' असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images