Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

मणप्पुरमचे लुटारू सापडले

$
0
0
'मणप्पुरम फायनान्स'च्या भवानी पेठ शाखेतून साडेसतरा किलो सोने आणि साडेसहा लाखांची रोकड चोरीचा २४ तासांत छडा लावत पोलिसांनी कंपनीचा असिस्टंट मॅनेजर सोमनाथ राघु वाघापुरे याच्यासह त्याचा मित्र तेजस भोसले याला अटक केली.

सर्व्हे टेंडरवरून वाद

$
0
0
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीच्या सर्वेक्षणाला सुरुवात होण्यापूवीर्च एजन्सी नेमण्यावरून प्रशासन आणि बोर्डाच्या सदस्यांमध्ये जुंपली आहे. प्रशासनाने मनमानी न करता टेंडर पध्दतीनेच एजन्सी नेमण्याची मागणी सदस्यांनी लावून धरली असून, त्यामुळे नव्या वादाला आता तोंड फुटले आहे.

'पुणे दर्शन'च्या बसमध्ये 'उणे दर्शन'

$
0
0
पुण्याची ऐतिहासिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक परंपरा समजून घेताना थक्क होणाऱ्या पर्यटकांना सध्या 'पुणे दर्शन'ची बस पाहून घाम फुटला आहे.

शाळा १५ जूनपासून सुरू

$
0
0
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा १५ जूनपासून सुरू होणार आहेत. माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण संचालकांनी याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे.

विद्यार्थ्यांची पाण्यासाठी 'परीक्षा'

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या हॉस्टेलमधील पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून विस्कळित झाल्याने ऐन परीक्षेच्या दिवसात अभ्यासाऐवजी विद्यार्थ्यांना पाणी भरावे लागत आहे. दरम्यान, काही विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर शुक्रवारी व्यवस्थापनातर्फे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.

...अखेर अमली पदार्थांची राखरांगोळी

$
0
0
गेल्या सात वर्षांपासून अमली पदार्थांचा नाश करण्याचे अडलेले घोडे अखेर गंगेत न्हाले. नाश करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने शुक्रवारी वडाची वाडी येथे ५१ लाख रुपयांच्या अमली पदार्थांची राखरांगोळी केली. अमली पदार्थांमध्ये गांजा, ब्राऊन शुगर, गर्द पावडर या पदार्थांचा समावेश होता.

चोरीचे सव्वालाख वाघापुरेने बँकेत भरले

$
0
0
'मणप्पुरम गोल्ड'च्या भवानी पेठे शाखेतून साडे सतरा किलो सोने चोरणारा असिस्टंट मॅनेजर सोमनाथ वाघापुरे याने घेतलेल्या कर्ज प्रकरणांची चौकशी गुन्हे शाखेने सुरू केली आहे. चोरलेल्या रकमेपैकी काही रक्कम त्याने कर्जापोटी बँकेत भरली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

जुन्नर शिक्षण मंडळावर राष्ट्रवादीचे वर्चस्व

$
0
0
जुन्नर नगरपालिका शिक्षण मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेचे एक मत फुटल्यामुळे सत्तेच्या चाव्या विरोधक राष्ट्रवादी पक्षाच्या हाती गेल्या आहेत.

पंधरा लाखांचा भेसळयुक्त गुटखा जप्त

$
0
0
नाशिक येथे विक्रीस चाललेला भेसळयुक्त गुटख्याचा ट्रक गुन्हे शाखेने गुरुवारी सकाळी कात्रज येथे पकडला. या ट्रकमधील पंधरा लाख रुपयांचा भेसळयुक्त गुटखा जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.

रखवालदाराला खूनप्रकरणी जन्मठेप

$
0
0
दारु पिण्यास देण्यास नकार दिल्याने तलवारीने वार करून खून केल्याप्रकरणी रखवालदारास शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. पी. कुरेर्कर यांनी हा निर्णय दिला.

सांगलीत भाजयुमो शहराध्यक्षाची हत्या

$
0
0
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष शंकर गवंडी (४२) यांची काल मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय.

एचआयव्हीबाधितांसाठी एसएमएस रिमाइंडर सेवा

$
0
0
एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांना औषधे व गोळ्यांचे वेळापत्रक लक्षात ठेवण्यास मदत व्हावी, यासाठी मुक्ता चॅरिटेबल फाऊंडेशनतर्फे एसएमएस रिमाइंडर सेवा सुरु करण्यात आली आहे. या सेवेमुळे रुग्णांना निर्धास्तपणे उपचार घेता येणार असून एसएमएस सेवेमुळे इतर तपासण्यांचे अपडेटही वेळोवेळी पाठविले जाणार आहेत.

खडकीमध्ये टँकरने पाणी पुरवठा

$
0
0
खडकी कँटोन्मेंट भागामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पाणी येत नसल्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, टँकरची संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक भागामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी बोर्ड प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

अनधिकृत टॉवरमुळे रहिवासी हैराण

$
0
0
एनआयबीएम रोड येथील सद्गुरु हाइट्स या इमारतीवर एका मोबाइल कंपनीने अनधिकृतपणे टॉवर उभारला असून, टॉवर हटविण्यासाठी महापालिका, पोलिस आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रार करूनही त्यांना दाद मिळत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

सांगली ते मुंबई 'लाँगमार्च'

$
0
0
दुष्काळग्रस्तांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आटपाडी ते वर्षा असा धडक 'लाँगमार्च' काढण्यात येणार असून त्याची सुरूवात २४ एप्रिलला होईल, अशी माहिती दुष्काळग्रस्तांसाठी काम करणारे प्रमुख कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.

कोर्टात गोळीबार करणा-यांना अटक

$
0
0
खुनाच्या गुन्ह्यात साक्ष देण्यासाठी आलेल्या साक्षीदाराच्या मित्रावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली.

पायलट प्रोजेक्टला वेटिंगचा सिग्नल

$
0
0
राजीव आवास योजनेचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यासाठी गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) यांना जागा देण्याचा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड महापालिकेने तहकूब ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे तूर्तास या प्रोजेक्टला वेटींगचा सिग्नल मिळाला आहे. या मुद्द्यावरून सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परस्परविरोधी भूमिका दिसून येत आहे.

शिक्षण मंडळ संधीवरून भाजपमधील नाराजी कायम

$
0
0
महापालिकेच्या शिक्षण मंडळावर संधी देण्यावरून भारतीय जनता पक्षामध्ये निर्माण झालेली नाराजी अद्याप शमलेली नाही. पक्षातील नाराज कार्यर्कत्यांनी या प्रकरणी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत.

कोल्ह्याचा गावक-यांवर हल्ला

$
0
0
तारगाव येथे पिसाळलेल्या कोल्ह्याने सात गावक-यांवर हल्ला केला तसेच दहा पेक्षा अधिक जनावरांना जखमी केल्याने गावात खळबळ उडाली. अखेर कोल्ह्यापासून बचाव करण्यासाठी ग्रामस्थांसह तरुणांनी त्याला जेरबंद केलं. परंतु पशु वैद्यकीय डॉक्टर येण्यापूर्वीच त्या कोल्ह्याचा जीव गेला.

परस्परांबाबत विश्वास ठेवावा

$
0
0
'सैन्यदलात घडणा-या घटना, होणा-या आरोपांची शहानिशा न करता आणि त्या प्रकरणांचा निकालही लागला नसताना संबंधित व्यक्तीला दोषी अथवा निर्दोष ठरविण्याचा खटाटोप माध्यमांनी थांबवावा. या घटनांची संवेदनशीलता लक्षात घेऊन सैन्याची मीडिया ट्रायल घेण्याच्या प्रवृत्तीला आळा घालावा,' असे आवाहन एअर चीफ मार्शल (निवृत्त) पी. व्ही. नाईक यांनी शनिवारी केले.
Viewing all 75772 articles
Browse latest View live




Latest Images