Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 75772 articles
Browse latest View live

पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी गजाआड

$
0
0
पोलिस गाडीतून उडी मारून पळालेल्या आरोपीला पुन्हा एकदा गुन्हे शाखेच्या आर्थिक शाखेने अटक केली.

परीक्षा मंडळाचेही धडक इन्पेक्शन

$
0
0
प्रभारी कुलगुरू डॉ. संजय चहांदे यांनी परीक्षा केंद्रांना धडक भेटी दिल्याच्या पार्श्वभूमीवर आता विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्वच परीक्षा केंदांना भेट देऊन परीक्षेतील गैरमार्गांना पायबंद घालण्याचा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने घेतला आहे.

खेडमध्ये १११ घरगुती सिलिंडर जप्त

$
0
0
खेड तालुक्यात घरगुती सिलिंडरचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्या हॉटेल आणि धाब्यांवर अचानक छापा टाकून १११ सिलिंडर जप्त करण्यात आले. घरगुती सिलिंडरचा गैरवापर करणाऱ्यांवर केलेली ही तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई आहे.

स्वस्त पेट्रोलच्या आशेवर पाणी

$
0
0
पेट्रोलवरील जकात दोन टक्क्यांवरून एक टक्का करण्याच्या निवडणुकीपूवीर् दिलेल्या आश्वासनाचा निवडणुका होताच राजकीय पक्षांना विसर पडला आहे.

रोबो इन डिमांड!

$
0
0
लष्करात युद्धभूमीवर शत्रूशी दोन हात करण्यापासून ते वैद्यक क्षेत्रात गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांपर्यंत आज सर्वच क्षेत्रांमध्ये रोबोटिक्सला मोठी डिमांड आहे.

पाण्याच्या बादलीत बुडून दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू

$
0
0
कुदळवाडी-चिखली येथे घराजवळ खेळताना पाण्याच्या बादलीत पडून बेशुद्ध झालेल्या दोन वर्षाच्या मुलाचा रविवारी (२२ एप्रिल) उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोहमंदरयान सराफतहुसेन सिद्दिकी असे या मुलाचे नाव आहे.

'कामे वाढली, कर्मचारी कमी'

$
0
0
'सरकारी ऑफिसमधील रोजच्या कामांचा ताण आणि कर्मचा-यांच्या संख्येत तफावत आहे. ती दूर झाल्यास कामात गतिमानता येईल,' असे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित अभ्यंकर यांनी शनिवारी मांडले. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पुणे शाखेच्या वतीने आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.

स्कायवॉक हवेतच विरले

$
0
0
शिवाजीनगर ते पुणे महापालिका भवन आणि स्वारगेट ते हुतात्मा चौक या दोन मार्गांवर स्कायवॉक करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सोमवारी हवेत विरला.

गीता वीर अपघातावरून पालिकेच्या सभेत गोंधळ

$
0
0
ज्येष्ठ सामाजिक कार्यर्कत्या गीता वीर यांच्या अपघाती निधनाच्या विषयावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

बसस्थानके झाली 'हाऊसफुल्ल'

$
0
0
उन्हाळी सुट्यानिमित्त परगावी जाणा-यांची संख्या वाढू लागल्याने दर दिवसाला होणारी जादा प्रवाशांची वाढ पाच ते सहा हजारापर्यंत जाऊन पोहोचली आहे. स्वारगेट आणि शिवाजीनगर बसस्थानके हाऊसफुल्ल झाली आहेत.

नव्या रूपात 'बालगंधर्व'ची एंट्री

$
0
0
रंगरंगोटी आणि अंतर्गत सजावटीने नवा मुखवटा धारण केलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा पडदा एक महिन्याच्या खंडानंतर शनिवारी उघडला गेला. त्यामुळे नाट्यरसिकांना उन्हाळ्याच्या सुटीत नाटकांचा आनंद घेता येणार आहे.

पवारांच्या संमतीनेच कार्यकारिणी निवड

$
0
0
अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या कार्यकारिणीवर केंदीय कृषिमंत्री आणि संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आणि उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संमतीनेच आणि लोकशाही मार्गाने नावांची निवड करण्यात आल्याचे संस्थेचे सरचिटणीस उत्तमराव पाटील यांनी सोमवारी कळविले आहे

कलिंगड विक्रेत्याला लुटणारे दोघे गजाआड

$
0
0
कलिंगड विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडील दोनशे रुपये घेऊन पळ काढणा-या दोघा तरूणांना चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली.

प्रती टँकर ३५० ऐवजी ७०० रुपयास

$
0
0
लोणावळा नगरपालिका कार्यक्षेत्रातील निवासी क्षेत्रात राजरोसपणे अवैधरित्या सुरू असलेली भंगाराची दुकाने तत्काल बंद करणे, इंदायणी नदीपात्रात व लगतची अवैध बांधकामे व मातीचा भराव करणा-यांच्या परवान्यांना स्थगिती देणे, लोणावळा नगरपालिकेच्या वतीने टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणा-या टँकरची फी दुप्पट करणे आदी विषयांस लोणावळा नगरपालिकेने सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली.

खुर्ची सांभाळण्यात मुख्यमंत्री 'तयार'

$
0
0
'मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे चांगलेच तयार झाले असून, मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुख आणि सुशिलकुमार शिंदे यांनी जी 'ट्रीक' वापरली तीच खेळी आता मुख्यमंत्री चव्हाण खेळत आहेत,' अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी रविवारी केली.

दिवेआगार गणेशमूर्तीचे चोर सापडले, मुख्य आरोपी फरार

$
0
0
दिवेआगर येथील सोन्याची गणेशमूर्ती चोरीप्रकरणी पुण्याच्या विशेष पथकाने सोमवारी औरंगाबाद जिल्ह्यातील पारधी वस्तीतून दोन जणांना ताब्यात घेतल्याचे समजते. पोलिसांच्या हाती लागलेल्यांपैकी एक गाडीचा चालक असून दुस-या व्यक्तीचा चेहरा सीसीटीव्हीतील आरोपीशी जुळत असल्याचे कळते. दरम्यान, याप्रकरणातील मुख्य आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

दागिन्यांची कोंढवा जंक्शनमधून चोरी

$
0
0
बनावट चावीच्या सहाय्याने बंगल्याचा दरवाजा उघडून सतराशे रुपयांची रोकड आणि सोने, चांदी तसेच हि-यांचे ३० लाख ५० हजार रुपयांचे दागिने चोरीस गेल्याची घटना बिबवेवाडी येथे शनिवारी दुपारी उघडकीस आली. या चोरीमागे ओळखीच्याच व्यक्तीचा हात असावा, अशा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कचरा वाहतूक होणार 'स्वच्छ'

$
0
0
शहरात साठणारा कचऱ्यामुळे भरून वाहणाऱ्या कचराकुंड्या..., ओला-सुका कचऱ्याची एकत्रित वाहतूक... अन् कचरा वाहून नेताना येणारी दुर्गंधी... या सर्व गोष्टी आगामी तीन महिन्यांत कदाचित इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.

अखेर शिवाजी रस्त्याने घेतला मोकळा श्वास

$
0
0
पदपथांसह इतरत्र झालेल्या अतिक्रमणांमुळे शहराच्या मध्यवस्तीत श्वास कोंडलेल्या शिवाजी रस्त्याला शनिवारी अखेर मोकळा श्वास घेता आला. विश्रामबागवाडा सहाय्यक आयुक्त कार्यालयातर्फे अतिक्रमणे हटविण्यासाठी शनिवारी धडक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये तब्बल सहा ट्रक माल जप्त करण्यात आला.

खा.उदयनराजे यांचा 'NCP'लाइशारा

$
0
0
राजकारणातून मोहिते-पाटलांना संपवले तसेच मला, संपवण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. मी कोणालाही घाबरत नाही, असे खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. तसेच लोकसभेची निवडणूक मी लढवणारच आहे. जिल्ह्यात माझ्याविरोधात कुणाचीही निवडणुक लढविण्याची हिम्मत नाही. कोणाची हिंम्मत असेल तर त्यांनी माझ्या विरोधात लढवून दाखवावी, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Viewing all 75772 articles
Browse latest View live


Latest Images